मृत्युकडून जीवनाकडे नेणारा प्रवास – पंचगव्य उपचारांच्या साथीने
अमित वैद्य या उच्चविद्याविभूषित आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न अशा या तरुणाचे आयुष्य हे एखाद्या स्वप्नासारखे चालले होते. मात्र वयाच्या अवघ्या २७ वर्षी कर्करोगाचे(CANCER) निदान झाले आणि संपूर्ण चित्रच पालटून गेले. सर्वसामान्य अमेरिकन माणूस जसे स्वप्न पाहतो तसे त्यांचे जीवन होते. अमित वैद्य हा अमेरिकेत जन्मलेला आणि मोठा झालेला एक गुजराती युवक. अर्थशास्त्रात पीएचडी प्राप्त करणारे ते मनोरंजन क्षेत्राच्या व्यावसायिक विभागात कार्यरत होते.
अमित सांगत होते, कमी वेळात खूप काही मिळवले होते. माझे आयुष्य व्यस्त होते पण ते आरोग्यपूर्ण मात्र अजिबात नव्हते. माझ्या वडलांचे निधन झाले आणि काही महिन्यांतच मला जठराच्या कर्करोग(फर्स्ट स्टेज) झाला असल्याचे समजले आणि मी हादरलो. वयाच्या केवळ २७व्या वर्षी मी खूप उंचावर जाऊन पोहोचलो होतो, तिथून मी धाडकन खाली कोसळलो होतो.’
न्यू योर्क मध्ये असताना ऑपरेशन करण्याऐवजी त्यांनी आक्रमक केमो आणि रेडियेशनचा पर्याय निवडला. दोन वर्षांनंतर ते बरेही झाले. रिकव्हर झाल्यानंतर दोन महिन्यात त्यांच्या आईला थर्ड स्टेज ब्रेन ट्युमर झाला असल्याचे लक्षात आले. ते भावूक होऊन सांगत होते, “बरेच काही करण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. मी तिलाही गमावले. एकुलता एक मुलगा असणारा मी परदेशात अक्षरशः एकाकी जीवन जगत होतो. हे कमी होते म्हणून अठराच महिन्यात स्कॅनिंगमध्ये मला पुन्हा कर्करोग झाल्याचे दिसून आले. यावेळी माझ्या लिव्हरला त्याने पकडले होते. २०११ साली साधारण नऊ महिन्यांनी माझे शरीर उपचारांना जुमानत नसून आता तो फुफ्फुसांपर्यंत पसरल्याचे लक्षात आले.
डॉक्टर म्हणाले की तुमच्याकडे आता फार कमी वेळ उरला आहे. मला माझ्या मित्रांवर कोणतीही जबाबदारी टाकायची नव्हती म्हणून मी माझ्या अंत्यसंस्कारांचीही तयारी करून ठेवली होती.”
लवकरच त्यांनी भारतात परतण्याची तयारी केली. त्यांच्या आत्याने त्यांना गुजरातमधील एका आयुर्वेदिक रुग्णालयाची माहिती दिली होती. हे रुग्णालय अकरा दिवसात कर्करोग बरा करते ते ही नाममात्र शुल्कात असेही त्यांनी सांगितले. अमित यांच्या मते त्यांच्याकडे आता गमावण्यासारखे काही उरलेच नव्हते. एवढे केलेच आहे तर मग हे ही करून पाहू असे त्यांनी ठरवले.
ते सांगत होते, मी रुग्णालयात पोहोचलो. तेथील उपचारांमध्ये योग आणि प्राणायाम याचा समावेश होता. मला देशी गायीचे दूध, दही, तूप, शेण आणि गोमुत्र यांचे(PANCHGAVYA ) मिश्रण पिण्यास देण्यात आले. मला ते अनशापोटी घ्यायचे होते. अनेक वर्षे केमो घेतल्याने तोंडाची चव केव्हाच गेली होती. त्यामुळे मला ते जसे होते पिणे सोपे गेले. त्याचा वास, चव काही लागले नाही. तिथे असणाऱ्या बाकीच्या मंडळींना ते मिश्रण पिणे हे संकट वाटत असे. पण मी विश्वास ठेवला आणि ते पीत गेलो. मला काही वेगळे वाटले नाही पण त्रासही झाला नाही.
अमित यांच्या स्कॅनिंगच्या रिपोर्टमध्ये कर्करोग पसरणे थांबल्याचे लक्षात आले. ते परत रुग्णालयात आले आणि तिथे सलग ४० दिवस राहिले. पुढच्या रिपोर्ट्समध्ये कर्करोग बरा होत असल्याचे लक्षात आले. त्यांनी उपचार पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. तेथील एका शेतकऱ्याने अमित यांना आपल्या घरात राहण्याची परवानगी दिली. ते सांगत होते, त्यांनी मला त्यांच्या शेतात छोट्याच्या झोपडीत राहू दिले. तिथे एक खाट होती, एक गोशाळा, देशी गायी, एक विहीर आणि स्वच्छतागृह होते. उपचार घेतल्यानंतर काही दिवसांनी मला चालता येऊ लागले. पुढे जॉगिंग, धावणे हे ही हळूहळू सुरु झाले आणि माझ्या मनाला या सगळ्यातून आनंद मिळू लागला. माझ्या उपचारादरम्यान मला जेव्हा कोणाचीतरी गरज होती तेव्हा गावकऱ्यांकडे माझ्यासाठी वेळ होता ही केवढी आनंददायी बाब होती.”
१८ महिन्यांच्या उपचारानंतर मी हे कर्करोगमुक्त झालो असा अमित यांचा दावा आहे. “कधी काळी स्वतःच्याच अंत्यसंस्काराची तयारी करणाऱ्या मला आता भविष्याचा विचार करावासा वाटत होता. आज मी लोकांना माझ्या प्रवासाबद्दल सांगतो आणि त्यांना बरे करण्याचा प्रयत्न ही करतो. कर्करुग्णांसोबत वेळ घालवतो. हे सगळे नि:शुल्क असते. हिलिंग वैद्य(Healing Vaidya) या नावाने मी एक स्वयंसेवी संस्था सुरु केली आहे.”
आता त्यांना अमेरिकेत परत जावेसे वाटत नाही. ते सांगतात, “या देशाने मला खूप काही दिले. जे मिळते त्याची येथील लोकांना किंमत नाही”
“Holy Cancer – How A Cow Saved My Life” या नावाचे पुस्तक अमित यांनी लिहिले असून याचे नुकतेच प्रकाशन झाले आहे. याविषयी अधिक माहितीसाठी healingvaidya.org या संकेतस्थळाला भेट द्या. गुजरातमधील आर एम धारिवाल या रुग्णालयात पंचगव्याच्या आधारे उपचार केले जातात आणि ते ही केवळ एका रुपयात असे अमित आवर्जून सुचवितात.
(दै. ‘द हिंदू’ मधील ‘A Journey from death to life’ या लेखाचा स्वैर अनुवाद.)