२६/११चा हल्ला करणारे दहशतवादी आमचेच – पाकिस्तानची कबुली
नवी दिल्ली, दि. १२ नोव्हेंबर – मुंबईत २००८ साली झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा समावेश असल्याचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था एफआयएच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. हा हल्ला करणारे दहशतवादी आपल्याच देशातील असल्याचे पाकिस्तान सरकारने(PAKISTAN GOVERNMENT) मान्य केले असून त्यामुळे इतके दिवस सभ्यपणाचा आव आणणाऱ्या पाकिस्तानचे दात त्यांच्यात घशात गेले आहेत.
एफआयएने या प्रकरणी ८०० पानी अहवाल तयार केला असून ११ दहशतवाद्यांची नावे या अहवालात नमूद केली आहे. त्यांची नावे संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादी संघटनांच्या लष्कर-ए-तय्यबाचे दहशतवादी यादीत समाविष्ट आहेत. पाकिस्तानच्या मुलतान प्रांतातील मोहम्मद अमजद खान याचे नाव दहशतवाद्यांना घेऊन भारतात येणाऱ्या नावेच्या खरेदी व्यवहारात समाविष्ट होते. याचेही नाव या अहवालात आहे. अहमदने यामाहा मोटर बोट, लाईफ जॅकेट्स, इन्फ्लेटेबल बोटींची खरेदी एआरझेड वॉटर स्पोर्टकडून केली होती. अल फौज नाव असलेल्या या बोटीचा वापर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी केला होता.
हे होते २६/११मधील दहशतवादी
या यादीत दहशतवादी हल्ला करणाऱ्या क्रू मेंबर्सचा समावेश होता. अहवालात समाविष्ट करण्यात आलेले दहशतवादी – मोहम्मद उस्मान(साहिवाल), अतीक-उर-रहमान(लाहोर), रियाज अहमद(हाफिजाबाद), मुहम्मद मुश्ताक(गुजरांवाला), मुहम्मद नईम(डेरा गाजीपुर), अब्दुल शकूर(सरगोधा), मुहम्मद साबिर(मुल्तान), मोहम्मद उस्मान(लोधरान), शकील अहमद(रहीम यार खान).
या यादीत १२१० देशातील कुप्रसिद्ध आणि मोस्ट वाँटेड अतिरेक्यांचाही समावेश करण्यात आला आहे. हाफिज सईज, मसूद अजहर आणि दाऊद इब्राहिमचा मात्र या यादीत समावेश नाही. वास्तविक हाफिज सईद हा मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार मानला जातो. जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरचे (MASOOD AZHAR) नाव भारतातील पुलवामाच्या हल्ल्यातही समोर आले होते. या हल्ल्यात भारताचे ४० जवान हुतात्मा झाले होते. त्याचप्रमाणे या यादीत राष्ट्रपती परवेज मुशर्रफ आणि माजी पंतप्रधान शौकत अजीज यांच्यावर हल्ला करणाऱ्या अल्ताफ हुसैन या दहशतवाद्याचेही नाव आहे. अल्ताफ हुसैन हा मुत्तहिदा कौमी मुव्हमेंट या संघटनेचा प्रमुख असून सध्या लंडनमध्ये राहात आहे.
**