
औरंगाबाद, दि. १३ नोव्हेंबर – औरंगाबाद तालुक्यात राधा गोविंद सेवा मिशन आश्रमातील प्रियशरण महाराजांवर बुधवार, ११ नोव्हेंबर रोजी अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला आहे. या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून जखमींवर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
औरंगाबाद येथील चौका शिवारात राधे गोविंद सेवा मिशन नावाच्या आश्रमात प्रियशरण महाराज व त्यांचे साधक निवास करतात. बुधवारी पहाटे दोन-अडीचच्या सुमारास सात हल्लेखोरांनी या आश्रमाची कडी तोड़ून प्रवेश केला आणि त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्याचप्रमाणे शिवीगाळ करीत, जीवे मारण्याच्या धमक्या देत घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून फुलंब्री पोलीस या अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. प्रियशरण महाराज आणि त्यांच्या साधकांवर सध्या औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जखमी अवस्थेतील प्रियशरण महाराजांचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून या घटनेमुळे समाजात संतापाची लाट पसरली आहे. भाजपा राम कदम यांच्यासह अनेकांनी हा व्हिडिओ शेअर ककरून समाजमाध्यमाद्वारे सरकारचे लक्ष या प्रकरणाकडे वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
एप्रिल महिन्यात पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे पंच दशनाम जुना अखाडाचे महंत कल्पवृक्ष गिरी आणि सुशील गिरी तसेच त्यांचा वाहनचालक निलेश तेलगडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता व त्यात त्या तिघांनीही प्राण गमावले होते. हिंदू साधूमहंतांवर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असली तरी राज्य सरकारने याबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही.
**