HinduismNews

राममंदिर निधी संकलनात सक्रिय बजरंग दल कार्यकर्ता रिंकू शर्मा यांची निर्घृण हत्या

देशभरात संतापाची लाट, विहिंपची तात्काळ कारवाईची मागणी

नवी दिल्ली, दि. १२ फेब्रुवारी – मंगोलपुरी परिसरातील बजरंग दलाचा कार्यकर्ता रिंकू शर्मा यांची बुधवारी, १० फेब्रुवारी रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांच्या हल्लेखोरांची ओळख पटली असून मोहम्मद इस्लाम, दानिश नसरूद्दिन, दिलशान आणि दिलशाद इस्लाम यांना अटक करण्यात आली आहे. रिंकू शर्मा यांचा श्रीरामजन्मभूमी निधी समर्पण अभियानात सक्रिय सहभाग होता. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. रामजन्मभूमी निधी संकलनावरून हा वाद झाल्याचे सांगितले जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, रिंकु शर्मा दिल्लीच्या मंगोलपुरी परिसरात आपल्या परिवारासमवेत राहत होते. आई राधा देवी, पिता अजय शर्मा तसेच अंकित आणि मनु शर्मा हे भाऊ असा त्यांचे कुटुंब आहे. हे सगळेच जण परिवार बजरंग दलाशी संबंधित असून रिंकू संघटनेच्या विविध कार्यक्रमात सहभागी होत असत.

रिंकू राममंदिर अभियानाशी संबंधित होता व भाजपाच्या विविध कार्यक्रमातही सहभाग घेत असे, म्हणूनच त्याला लक्ष्य करण्यात आले असे त्यांच्या भावाने माध्यमांना सांगितले. रिंकू शर्मा यांच्या भावाने पोलिसांना या प्रकरणी अधिक माहिती दिली. त्यानुसार रिंकू हे लॅब टेक्निशिअन म्हणून काम करीत होते. आरोपींशी त्यांचा पूर्वीपासून वाद होता. बुधवारी सायंकाळी एका जन्मदिनाच्या पार्टीवरून परत येत असताना घराजवळीस परिसरात आरोपींनी त्यांना हटकले व भांडण उकरून काढले. वाद वाढत गेल्यावर रिंकू तेथून घरी निघून आले. हातात काठ्या व सुरे घेऊन आलेल्या आरोपींनी त्यांचा घरापर्यंत पाठलाग गेला आणि घरी जाऊन त्यांना शिविगाळ केली. त्याचप्रमाणे त्यांच्यावर चाकूने निर्घृण हल्ला केला. अत्यवस्थ शर्मा यांना मंगोलपुरीतील राजीव गांधी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु गुरुवारी दुपारी त्यांचे निधन झाले.

ज्यांच्यासाठी केले रक्तदान त्यांनीच केला हल्ला

ज्या आरोपींनी शर्मा यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्या त्यांच्यापैकी एकाच्या पत्नीला गरोदरपणात गरज होती तेव्हा रिंकू यांनीच रक्तदान केले होते. मंगोलपुरी परिसरात जानेवारीमध्ये राममंदिर जनजागृती यात्रेचे आयोजन करण्यात आले, त्यावेळीही आरोपींनी शर्मा यांच्याशी वाद घातला होता. रिंकू शर्मा यांच्यावरील हल्ल्याचे तीव्र पडसाद देशभर उमटले आहेत. स्थानिक नागरिकांचा उद्रेक थोपविण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. #JusticeForRinkuSharma या हॅशटॅगचा वापर करून रिंकू शर्मा यांच्यावरील हल्ल्याचा निषेध तसेच आरोपींना फाशी देऊन शर्मा यांना तात्काळ न्याय देण्याची मागणी समाजमाध्यमांवर करण्यात येत आहे. समाजमाध्यमांवर सक्रिय असणाऱ्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी या संबंधी ट्विट केले आहे.

विश्व हिंदू परिषदेची तात्काळ कारवाईची मागणी

निधी समर्पणाच्या अभियानात सहभागी होणाऱ्या एका कार्यकर्त्याची अशी नृशंस हत्या होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संयुक्त महामंत्री डॉ. सुरेंद्र जैन यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि आता दिल्लीतही निधी समर्पणाच्या कार्यक्रमाबाबत हिंसक प्रतिक्रिया दिसून आल्या आहेत. श्रीरामविरोधी सेक्युलर मंडळी आणि काही मुस्लिम नेते वैमनस्य तयार करत आहेत. रिंकू शर्माची आत्महत्या जिहादींच्या मनात पेरलेल्या या विषातूनच झाली आहे. या आरोपींना लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी जैन यांनी विहिंपच्या वतीने केली आहे.

**

Back to top button