‘ग्रेटा’ या नावाचा महिमा सर्वदूर दुमदुमतो आहे. त्यात आणि आता ही निकीता कुठून टपकली?… तर ग्रेटाने ‘गोपनीय गोष्टी उघड केल्याने’ ( नको त्या गोष्टीत ‘रिहाना आणि मियाची’ कॉपी कशाला करायची?) ही ‘बिचारी निकीता जेकब’ अडकली.
ही उपद्व्यापी महिला मुंबई हायकोर्टात वकील आहे. शिवाय ती ‘आप’ पार्टीची लीडर आहे. ‘ग्रेटा’चं सुप्रसिद्ध Updated Toolkit वारंवार एडिट करुन त्यात आवश्यक ते बदल/सुधार करण्याचं, त्याला ‘अंतिम स्वरुप देण्याचं’ महान कार्य ही निकीता 21 जानेवारीपासून करत होती. (याचे स्क्रीनशॉटस् नेटवर उपलब्ध आहेत.)
थोडक्यात या परदेशी सेलिब्रेटींना ‘रसद पुरवण्याचं’ काम भारतातूनही चालू होतं.
अर्थात ‘निकीता’ हे हिमनगाचं फक्त टोक आहे. यात असंख्य व्यक्ती सामील असतील. दिशा रवी या 22 वर्षीय तथाकथित पर्यावरणवादी तरुणीलादेखील दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने बंगळुरूहून अटक केली आहे. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी तयार करण्यात आलेलं वादग्रस्त टुलकिट गुगल दस्ताऐवज सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी पोलिसांनी तिला अटक केली आहे. ग्रेटा थनबर्गने हेच टुलकिट दस्ताऐवज सोशल मीडियावर शेअर केले होते. या ‘कट-सागराचा’ थांग चटकन लागेलच असं नाही. एक गोष्ट मात्र सिध्द झाली की, या आंतरराष्ट्रीय कारस्थानाला भारतातील अनेकांची फूस आहे.
सध्याचं तंत्रज्ञान हे ‘डेंजरस’ प्रकरण आहे… दुधारी तलवारीसारखं. या तंत्रज्ञानाच्या सहाय्यनंच हा ‘कट’ सिध्दीस नेला आणि हेच तंत्रज्ञान हाताळण्यातली छोटीशी चूक ‘बूमरँग’ सारखी अंगावर शेकली.
नाव उघडकीला आल्यावर ‘निकीतानं’ आपलं twitter account लगोलग डिलीट केलं आहे. तिच्यावर लवकरच FIR दाखल होईल. LRO ने तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या बाबतीत उचित कारवाई होईलच. पण सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ही वकीलीण बाई कायद्याची वस्त्रं पांघरुन, ‘कायद्याचे रक्षक’ म्हणून मिरवून देशातील ‘कायदा सुव्यसस्थेला’ सुरुंग लावण्याचं काम करीत आहे.
नाव उघडकीला आल्यावर ‘निकीतानं’ आपलं ट्वीटर खातंही लगोलग डिलीट केलं आहे. तिच्यावर लवकरच FIR दाखल होईल. LROने तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या बाबतीत उचित कारवाई होईलच. पण सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ही वकीलीण बाई कायद्याची वस्त्रं पांघरुन, ‘कायद्याचे रक्षक’ म्हणून मिरवून देशातील ‘कायदा सुव्यसस्थेला’ सुरुंग लावण्याचं काम करीत आहे.
**