हेडगेवार रुग्णालयाला मिळाले सिटी वॉकर
हेरीकोज व्हेन्स आजारावर हे वॉकर उपयुक्त
औरंगाबाद, दि. २३ फेब्रुवारी – पुण्याच्या सुश्रुत डिजाइन्स यांनी व्हेरिकोज व्हेन्स या आजारासंबंधी केलेल्या संशोधनातून “सिट-वॉकर” तयार केले आहेत. येथील हेडगेवार रूग्णालयाला रुग्णसेवेसाठी देणगी-स्वरूपात हे सिट वॉकर नुकतेच भेट देण्यात आले. रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. अनंत पंढरे यांना ते उत्पादन सुपूर्द करण्यात आले. या उत्पादनाला भारतात पटेन्ट मिळाले असून अमेरिका, युरोप आदी क्षेत्रांमध्ये पेटंट मिळवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.
बैठे काम करणाऱ्या कित्येक लोकांना चाळीशीच्या पुढे व्हेरीकोस् व्हेन्स (शिराजाल) हा विकार जडतो – त्यामुळे पायावरील शिरा विद्रुप दिसतात व पायात रक्त साठून राहिल्याने पुढेही खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते. त्यातून मुक्त होण्यासाठी आमचे उत्पादन अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास सुश्रृत डिजाइनचे अतुल खेरडे यांनी व्यक्त केला. रूग्णालयात शल्य चिकित्सा व फिजीओथीरपीसाठी येणारया रूग्णांना ह्या यंत्राचा लाभ घेता येईल. या प्रसंगी सुशत डिजाइनच्या वैद्यकीय मार्गदर्शक डॉ. शिल्पा गोसावी (सह-पेटन्ट धारक), तसेच सुश्रुत डिझाइन्सचे मार्गदर्शक मिलिंद पोहनेरकर उपस्थित होते.
सामाजिक कार्याचे प्रचंड मोठे प्रतीक असलेल्या हेडगेवार रूगणालयाला हे उत्पादन देतांना सुश्रृत डिजाइन्सच्या दोन्ही संस्थापकांनी “खूपच आनंद होत असल्याचे” सांगितले. श्री अतुल खेरडे व डॉ शिल्पा दोघेही मूळचे औरंगाबादचेच आहेत व काही वर्षांपासून पुण्यात स्थायिक आहेत.