
मुंबई, दि. २३ फेब्रुवारी – स्वा. सावरकर पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, सावरकरांचे जीवनदर्शन घडविणारे ‘अनादि मी, अनंत मी’ हे नाटक दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रक्षेपित केले जाणार आहे. शुक्रवार, २६ फेब्रुवारी दुपारी २:३० आणि पुनःप्रक्षेपण त्याच दिवशी सायंकाळी ७:३० वाजता होणार आहे. ज्येष्ठ माधव खाडीलकर यांनी या नाटकाचे लेखन दिग्दर्शन केले असून आशा खाडीलकर यांचे संगीत आहे. ओंकार खाडीलकर यांनी या नाटकाची पुनर्निर्मिती केली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने १९८३ साली माधव खाडीलकर यांनी हे नाटक लिहिले. १९९० साली या नाटकाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङमयनिर्मितीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. नाटकाच्या मूळ संचात सावरकरांची भूमिका माधव खाडीलकर यांनी तर माई सावरकर यांची भूमिका आशा खाडीलकर यांनी केली होती. आता त्यांची पुढची पिढी या नाटकात सक्रिय झाली आहे. उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्टचा या उपक्रमात विशेष सहभाग आहे.