NewsRSS

केरळातील हिंदू द्वेष पुन्हा प्रकटला, संघशाखेच्या मुख्य शिक्षकाची निर्घृण हत्या

अलपुर्झा, दि. २५ फेब्रुवारी – संघाच्या शाखेतील मुख्य शिक्षकाच्या हत्येने केरळातील हिंदूद्वेष पुन्हा एकदा प्रकाशात आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वायावर येथील शाखेचे मुख्य शिक्षक नंदू उर्फ राहुल कृष्णा यांची सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया(एसडीपीआय)च्या सदस्यांनी बुधवारी सायंकाळी निर्घृण हत्या केली. २२ वर्षीय नंदू हे वायावर येथील रहिवासी होते व गेली अनेक वर्षे संघात सक्रिय होते.

प्राप्त माहितीनुसार मुस्लीम कट्टरपंथी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची राजकीय कक्षा असणाऱ्या एसडीपीआयच्या सदस्यांनी बुधवारी वायावर येथे मोर्चा काढला होता. या मोर्चात प्रक्षोभक घोषणा देण्यात येत होत्या. या विरोधात हिंदूत्ववादी विचारांचे कार्यकर्ते आंदोलन करत होते. आंदोलनास विरोध करण्याच्या प्रयत्नात झालेल्या मारामारीत जखमी झालेल्या नंदू यांना एर्नाकुलम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. या मारामारीत अन्य सात जण जखमी झाल्याचे समजते. नंदू यांच्या एका सहकाऱ्यावरही तीक्ष्ण चाकूने हल्ला करण्यात आला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

केरळात हिंदू विचारांच्या व्यक्तीवर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नाही. अखिल भारतीय हिंदू महासभेचे तामिळनाडू राज्याचे कार्यवाह नागराज यांची २२ नोव्हेंबर रोजी कृष्णगिरी येथे भरदिवसा हत्या करण्यात आली  होती. तत्पूर्वी भाजपाचे युवा नेते रंगनाथन यांचीही कृष्णगिरी जिल्ह्यातील केलमंगलम येथे अशाच प्रकारे सप्टेंबर महिन्यात हत्या करण्यात आली होती.

Back to top button