Health and WellnessNews
महाराष्ट्रात ५४ लाख कोरोना लसींपैकी फक्त २३ लाख लसींचा वापर
प्रकाश जावडेकरांचा दावा
नवी दिल्ली, दि. १७ मार्च : महाराष्ट्राला १२ मार्चपर्यंत ५४ लाख कोरोना लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. मात्र दिलेल्या ५४ लाख लसींपैकी केवळ २३ लाख लसींचाच वापर झाला आहे. याचाच अर्थ महाराष्ट्रात ५६ टक्के लसींचे डोस अजूनही पडून असल्याचा दावा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्वीटरद्वारे केला आहे.
राज्यात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी ताळेबंदीही लावण्यात आली आहे. मात्र तरीही कोरोनाचा प्रसार कमी होताना दिसत नसून कोरोना संक्रमीत रुग्णसंख्येतही वाढ होत चालली आहे. अशा गंभीर परिस्थितीत जावडेकर यांनी कोरोना लसीसंबंधी केलेल्या ट्वीटवरुन लसीकरणाकरिता योग्य व्यवस्थापन होत नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.