National SecurityNews
सैन्याला मिळणार रणगाडे विरोधी क्षेपणास्त्रे
नवी दिल्ली, दि. २० मार्च : संरक्षण मंत्रालयाने भारतीय लष्करासाठी सुमारे ४ हजार ९६० रणगाडे विरोधी क्षेपणास्त्रे खरेदी करण्यासाठी ‘भारत डायनामिक्स लिमिटेड’ (बीडीएल) या सरकारी कंपनीशी सुमारे ११८८ कोटी रुपयांचा करार केला.
‘संरक्षण मंत्रालयाच्या खरेदी विभागाने लष्कराला ४९६० ‘मिलान-२ टी’ रणगाडे विरोधी गायडेड क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण उपक्रम भारत डायनामिक्स लिमिटेडशी सुमारे ११८८ कोटी रुपयांचा करार केला,’ अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे दिली.
‘मिलन-२ टी’ क्षेपणास्त्रे १८५० मीटरपर्यंतचे आपले लक्ष्य अचूक भेदण्यासाठी ओळखले जातात. ते जमिनीसह वाहन-आधारित लाँचरवरूनही डागता येतात. या क्षेपणास्त्रांना येत्या ३ वर्षांत लष्कराच्या ताफ्यात सामावून घेण्याची योजना आहे, ’असे मंत्रालयाने म्हटले आहे.