
मुंबई, दि. २४ मार्च – शिवसेनेची सत्ता असणाऱ्या मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी होळी आणि धुळवड सार्वजनिक आणि खासगी स्वरुपात साजरी करण्यावर प्रतिबंध घातला आहे. कोविड१९च्या वाढत्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेने संबंधित परिपत्रक काढले आहे. दुसरीकडे २९ तारखेला साजऱ्या होणाऱ्या शब्-ए-बारातच्या बाबतीत मात्र राज्य सरकारने निर्बंध लादताना बोटचेपे धोरण स्वीकारल्याचे दिसून येते.
पालिकेच्या परिपत्रकात म्हटले आहे की, २८ रोजी होलिकोत्सव आणि दुसऱ्या दिवशी अर्थात धुळवडीला कोणत्याही पद्धतीने सण साजरा करण्यास परवानगी देण्यात येणार नाही. माझे कुटुंब, माझी जबाबदारी या अभियानाचे महत्त्व लक्षात घेऊन लोकांनी सण साजरा करणे टाळावे. मुंबईत अनेक सोसायट्यांमध्ये हा सण साजरा करण्यात येतो. यावर्षी होळी साजरी न करण्याचे सहकार्य रहिवाशांनी करण्याची विनंतीही या परिपत्रकात करण्यात आली आहे. तसे न केल्यास साथीचा रोग कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि भादसं १८६० अंतर्गत संबंधितांवर कारवाई करण्याचे संकेतही यात देण्यात आले आहेत.

दुसरीकडे शब्-ए-बारातचा सण साधेपणाने साजरा करण्याची विनंती अन्यधर्मियांना महाविकास आघाडी सरकारने मार्गदर्शक सूचनांद्वारे केली आहे. नागरिकांनी आपल्या घरातूनच प्रार्थना करावी. मशिदींमध्ये ४०हून अधिक नागरिकांना प्रवेश करता येणार नाही. शब्-ए-बारातचा सण मोकळ्या जागी, गर्दी न करता, सुरक्षित अंतर ठेवून साजरा करावा असेही या नियमावलीत म्हटले आहे.
हिंदू सणांच्या बाबतीत कोविड संक्रमणाचे कारण सांगून निर्बंध लादणारे सेक्युलर विचारांचे प्रशासन अन्यधर्मियांच्या सणांच्या बाबतीत मात्र मऊ धोरण स्वीकारताना दिसत आहे. मागील वर्षी गुढीपाडव्यापासून ते सध्या सुरू असणाऱ्या शिमगोत्सवापर्यंत हिंदू धर्मियांना आपली जबाबदारी ओळखून सर्व सण साधेपणाने साजरे केलेले सर्वांनी पाहिले आहे. पण प्रशासनाच्या ठराविक समुदायांना सूट देणारे धोरणाबद्दल तुम्हाला काय वाटते?
**