Health and WellnessNews
अमृतप्रेरणा सामाजिक संघटना आयोजित रक्तदान शिबिर संपन्न

नवी मुंबई, दि. २६ एप्रिल : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुरस्कृत अमृतप्रेरणा सामाजिक संघटनेच्या वतीने नुकतेच कोपरखैरणे सेक्टर 19 येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले. या रक्तदान शिबिरांमध्ये 115 जणांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 75 लोकांनी रक्तदान केले
कार्यक्रमाची सुरुवात नवी मुंबई जिल्ह्याचे संघचालक कमलेश पटेल यांनी केली. तर नवी मुंबई जिल्ह्याचे कार्यवाह योगेश जी साळुंखे, कोपरखैरणे पोलीस स्टेशनचे PSI धुमाळ साहेब, संत मंडळींपैकी कोपरखैरणे नगराचे प्रल्हाद महाराज सुपेकर, ज्ञानराज महाराज म्हात्रे, गणेश गनोबा मंदिराचे अध्यक्ष दिनेश विटा आदी मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते.