कोविड-१९ महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतातील परिस्थिती अत्यंत गंभीर व भयंकर झाली असून लोक रुग्णालयात बेड्स, औषधे आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी संघर्ष करत आहे. विशेषकरून आपल्या समाजातील निम्न वर्गाला याची मोठ्या प्रमाणावर झळ बसत आहे. त्यांचे हे हाल .अशातच अवाडा फाउंडेशन वैद्यकीय उपकरणे प्रदान करण्यासाठी निरंतर कार्य करीत आहे ज्यामध्ये वेंटीलेटर्स, ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन काँसेंट्रेटर्स आणि खाद्य पदार्थ यांचा समावेश आहे. परंतु या कठीण परिस्थिती मदत करून अधिक योगदान देण्यासाठी अवाडा फाउंडेशन महाराष्ट्र आणि राजस्थानमधील विभिन्न ठिकाणी २-ऑक्सिजन प्लांट्स, वेंटीलेटर (BiPAP) , ऑक्सिजन काँसेंट्रेटर्स, आणि ३०० बेड्स सह ४ हॉस्पिटल सुरु करण्याची योजना करीत आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वैद्यकीय सुविधा आणि रुग्णालयांवरील ताण वाढत चालला आहे. विशेषत: सामान्य नागरिकांना याची मोठ्या प्रमाणावर झळ बसत आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर तातडीने औषधोपचार व्हावेत, तसेच त्यांना व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरसारख्या वैद्यकीय सुविधा तात्काळ उपलब्ध व्हाव्यात म्हणून अवाडा फाउंडेशनच्यावतीने महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांमध्ये ३०० बेड्सची चार रुग्णालये तसेच दोन ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करण्यात येत आहे. या उपक्रमाकरिता सीआयआय फाउंडेशनचेही सहकार्य लाभणार आहे.
महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात १०० विलगीकरण बेड्स तसेच ऑक्सिजन प्लांट, ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर आणि व्हेंटिलेटर उपलब्ध केले जाणार असून सोलापूर जिल्ह्यात ५० विलगीकरण बेड्स तसेच ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर आणि व्हेंटिलेटर उपलब्ध केले जाणार आहे. तर राजस्थानातील बिकानेर जिल्ह्यात १०० विलगीकरण बेड्स तसेच ऑक्सिजन प्लांट, ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर उपलब्ध केले जाणार असून कोलायत शहरात ५० विलगीकरण बेड्स तसेच ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर उपलब्ध केले जाणार आहे.
याच्याशिवाय अवाडा फाउंडेशनने काही आवश्यक ठिकाणी रुग्णालये आणि कोविड विलगीकरण सेंटर सुरु करण्याचाही निर्णय घेतला आहे. याकरिता अवाडा फाउंडेशनमार्फत आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी जिल्हा प्रशासन, स्थानिक प्रशासन, मुख्यमंत्री कार्यालयाशी सतत संपर्क साधला जात आहे.
गुजरात येथील सुंदरनगर मधील तलसाना गावात ‘कोविड केअर सेंटर’ करिता येथील प्रथमोपचार केंद्रास मदत करण्यात येत आहे. तसेच या आरोग्य केंद्रात अत्याधुनिक अतिदक्षता विभाग सुरु करण्यात येणार आहे. अवाडा फाउंडेशन ग्रामीण क्षेत्रांत वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशील असून विलगीकरण बेड्स, नाश्ता-जेवण, ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन प्लांट, ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर आणि व्हेंटिलेटर उपलब्ध करण्यावर त्यांचा अधिक भर असणार आहे.
मुंबईतील सेवावस्त्यांमध्येही मोठ्या प्रमाणात शिधावाटप करण्यात येत असून यामध्ये तांदूळ, गव्हाचे पीठ, डाळ, साखर, हँडवॉश आदींचा समावेश आहे.
अवाडा फाउंडेशन या समाजसेवी संस्थेच्या वतीने समाजाच्या विकासासाठी निरनिराळे उपक्रम राबविले जातात. यामध्ये लहान मुलांना शिक्षण, ग्रामीण क्षेत्रांत वैद्यकीय सुविधा पुरविणे, कौशल्य विकास, महिलांचे सबलीकरण आदी महत्वपूर्ण उपक्रमांचा सहभाग आहे.
**