सिंधुदुर्गनगरी दि. ३ जून – सेवा इंटरनॅशनलच्या मदतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, जिल्हा सिंधुदुर्ग, प्राणवायू योजने अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये, कोविड सेंटर सह जिल्ह्यातील काही खाजगी रुग्णालयांना ४७ अत्याधुनिक ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर मशिन्स नुकतेच वितरित करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात सदर ४७ ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटरपैकी दहा ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांना सुपुर्द करण्यात आले. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी रा. स्व. संघ जनकल्याण समिती संचालित रुग्णोपयोगी साहित्य केंद्र – १०, जिल्हा रुग्णालय, ओरोस – १०, ग्रामीण रुग्णालय, दोडामार्ग – ३, उपजिल्हा रुग्णालय, शिरोडा – २, होमगार्ड कोविड केंद्र, ओरोस – २, वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालय – २, डॉ दिघे, मालवण – २, ग्रामीण रुग्णालय, वैभववाडी – २ डॉ प्रशांत मडव, जांभवडे – २ कणकवली नगरपरिषद कोविड केंद्र – २, उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी – २, आपटे मेडीकल, फोंडाघाट- १, डॉ प्रसाद मालंडकर, खारेपाटण – १, डॉ जी टी राणे -२, डॉ विवेक रेडकर रिसर्च हॉस्पिटल, मालवण – २ आणि श्री साई डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, कारीवडे, सावंतवाडी – २ इत्यादी ठिकाणी हे ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर वितरित करण्यात आले.