News

गोदावरीतील प्राचीन कुंडाच्या पुनर्जीवनाची आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात दखल


नाशिक, दि. २८ जून : दक्षिणगंगा म्हणून देशात परिचित असलेल्या गोदावरी नदीपात्रातील सिमेंट कॉंकीटीकरणाचा मुद्दा हा सर्वांच्या दृष्टीने डोकेदुखी बनला होता. याच कॉकीटीकरणामुळे पवित्र अशी प्राचीन कुंडा लृप्त झाली होती, मात्र पर्यावरणप्रेमीच्या पाठपुराव्यामुळे १७ पैकी ५ कुंडे पुर्नर्जीवित झाली आहे. लंडनमध्ये नुकत्याच भरलेल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात नाशिकच्या या प्राचीन कुंडाची दखल घेतली आहे. स्मॉल इज ब्युटीफुल या तत्वांवरील प्रदर्शनात नाशिकच्या या कुंडाचा डंका वाजला आहे असे म्हटलं तर वावगे ठरणार नाही.

‘शुद्ध पाणी’ यातंर्गत गोदावरी नदीपात्र काँक्रिटीकरणमुक्त करून जिवंत जलस्रोत पुनर्जीवन करण्याचा अनोखे अभियान पर्यावरण प्रेमींच्या पाठपुराव्यानंतर आणि न्यायालयाच्या दणक्यानंतर महापालिकेने राबवावे लागले, न्यायालयाने महापालिकेला खडसावल्यानंतर गोदापात्रातील क्रॉकीटीकरणाचे काम हाती घेतले. यातही लृप्त झालेली प्राचीन कुंड पुन्हा पुनर्जीवित करावी,अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी लावून धरली. अखेर १७ पैकी ५ कुंडांचे पुनर्जीवन करण्यात आले. सर जॉन सोरेल आणि बेनेई लान्स यांनी २०१६ मध्ये लंडन डिझाइन बिनाले या प्रदर्शनाचा आरंभ करत आंतरराष्ट्रीय पातळीवर डिझाईनच्या माध्यमातून विविध प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे.

अनोख्या रचनेमुळे उपक्रमांची निवड

यावर्षीचे प्रदर्शन ‘रेझोनन्स अनुवाद’ या संकल्पनेवर आधारित आहे. यासाठी जगभरातून अशा प्रकल्पांची निवड झाली. जिवंत पाणी पुरातन कुंडात प्राप्त होऊन नदी पुनःप्रवाही होऊ शकते. या संकल्पनेला आणि त्यासाठी लागू केलेल्या काँक्रिट काढण्याच्या प्रकल्पाला दुजोरा मिळाला असल्याची माहिती, काँक्रिटीकरणमुक्त गोदावरी नदीसाठी लढा देणारे याचिकाकर्ते व गोदाप्रेमी देवांग जानी यांनी दिली. नदी परिसरातील जिवंत जलस्त्रोतसाठी संशोधन अहवाल डॉ. प्राजक्ता बस्ते यांनी दिला आहे.

चौकट
आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावली मान अन् शान ज्यांच्यामुळे मूलभूत बदल घडू शकतो आणि ज्यांचे नुकरण केल्याने विविध प्रश्नांना उत्तरे मिळू शकतात. साधारण ५० देशांमधून या बिनाले प्रदर्शनासाठी पर्यावरणस्नेही कामे मागवण्यात आली. भारतातून पर्यावरणस्नेही विषयांच्या अंतर्गत झालेल्या असाधारण मौलिक कामांच्या निवडीची जबाबदारी बेंगळुरू येथील आर्किटेक्ट निशा मेथ्यु-घोष व त्यांच्या टीमने उचलली. गोदावरी नदीपात्रातील उर्वरित सिमेंट-काँक्रिटचे थर काढणे गरजेचे असून, ते काढल्यास नदीत सर्गिकरित्या पाणी उपलब्ध होऊ शकते.

Back to top button