अ. भा. वि. प. मुंबई महानगराची नूतन कार्यकारणी घोषित
मुंबई, दि. ३ सप्टेंबर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मुंबई महानगराची नूतन कार्यकारणी रुइया महाविद्यालय येथे छात्रसत्ता या अभाविपच्या वार्षिक कार्यक्रमामध्ये घोषित करण्यात आली.
सदर कार्यकारिणी ही वर्ष 2020-21 या वर्षाची असून मुंबई महानगर अध्यक्ष म्हणून वैद्य कैलास सोनमंकर यांची करण्यात आली आणि मुंबई महानगर मंत्री म्हणून सुश्री गौतमी अहिरराव यांची निवड करण्यात आली आहे. तसेच उपाध्यक्ष म्हणून प्रा. दिग्विजय मिश्रा व प्रा. रुपाली बोरीकर आणि सहमंत्री म्हणून सागर पांडे, गुरदीत वोहरा, प्रेम तिवारी व गार्गी वारुंजीकर यांची घोषणा करण्यात आली.
छात्रसत्ता या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून अभाविप पश्चिम क्षेत्राचे क्षेत्रीय संघटन मंत्री देवदत्त जोशी उपस्थित होते, त्यांनी नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.