स्वदेशी जागरण मंचातर्फे 23 ते 25 सप्टेंबर “अर्थ चिंतन 2021” ऑनलाइन परिसंवाद

स्वदेशी जागरण मंच मागील ३० वर्षांपासून आपल्या शोध, उपक्रम आणि अन्य माध्यमांच्या योगदानातून देशाच्या आर्थिक स्थितीला दिशा देण्यासाठी तसेच देशाच्या उत्थानासाठी प्रयत्नशील आहे. भारताचे हित हे स्वदेशी दृष्टिकोनाचे मुख्य सूत्र आहे.
कोरोना महामारी आणि जलदगतीने बदलणाऱ्या अन्य भू राजकीय घटनाक्रमांमुळे केवळ देश, जगाचीच अर्थव्यवस्था कोलमडली नसून नव-तरुणांच्या भारत देशात पूर्वीपासूनच विषम परिस्थितीत असलेला रोजगार कोरोना मुळे अधिकच डगमगला आहे.
अशा कठीण परिस्थितीत देशाच्या आर्थिक आणि रोजगाराच्या दिशेने आगामी सकारात्मक पाऊल काय असू शकते? या विषयावर व्यापक चिंतन स्वदेशी जागरण मंच ने केले आहे.
भविष्यात भारताचा मार्ग काय असू शकतो ? यावर देशव्यापी चर्चा करण्याकरिता स्वदेशी शोध संस्थान आणि असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजने (८५० भारतीय विद्यापीठांचा संघ) एका उपक्रमाचे आयोजन केले आहे.
याअंतर्गत दि. २३ ते २५ सप्टेंबर २०२१ रोजी ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर विभिन्न अर्थशास्त्रज्ञ, राजकीय नेते, विद्वान, कृषी विशेषतज्ञ, उद्योगपती आणि अन्य सामाजिक संघटना चर्चा करणार आहेत. दररोज संध्याकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादाचे विभिन्न प्लॅटफॉर्मवरील लाईव्ह प्रसारण Joinswadeshi च्या फेसबुक आणि यूट्यूब पेज वर करण्यात येणार आहे.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती (२५ सप्टेंबर) दिवशी या चर्चेचा पहिला भाग पूर्ण होणार आहे. याचशिवाय ही चर्चा महानगर, प्रांताच्या राजधान्या, जिल्हा केंद्र आणि गावांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत.
सगळ्यांचा सहभाग आणि सहमती मधून देशासाठी एक आगामी लक्ष्य निर्धारित करणे आणि एकजुटीने लक्ष्य प्राप्तीच्या कार्यात एकवटले जावेत, हे या राष्ट्रीय परिसंवादाचे उद्दिष्ट आहे.
स्वदेशी जागरण मंचाच्या प्रेरणेने हे परिसंवाद ‘अर्थ चिंतन २०२१’ अंतर्गत देशभरात चालविण्यात येणार आहे.