संत पदयात्रा अंबुज वाडीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न
संत पदयात्रेस ठिकठिकाणी प्रारंभ
मुंबई, दि. 28 डिसेंबर : शहरी भागात वस्तीत तर ग्रामीण भागातील गाव / पाडा या ठिकाणी साधु आणि संत यांनी प्रत्यक्ष जाऊन हिंदूभाव जागरणाचे काम करावे, याकरिता संत पदयात्रेस ठिकठिकाणी प्रारंभ झाला अहे. याअनुषंगाने नुकतेच मालाड, मालवणी येथील अंबुज वाडी मालवणी येथे संत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात ही पदयात्रा संपन्न झाली.
या ठिकाणी महामंडलेश्वर श्री श्री 1008 स्वामी काशिदास महात्यागी जी यांच्या सान्निध्यात ही संत पदयात्रा संपन्न झाली. स्वामीजींचे शिष्य रामदास पदयात्रेत सम्मिलित होते. अंबुज वाडीच्या कारगिल येथील मंदिरातून ही शोभायात्रा प्रारंभ झाली. अंबुजी वाडीचे विविध मंदिर घेत हनुमान मंदिर अंबुजं वाडी येथे समाप्त झाली दोन तास चाललेल्या या मिरवणुकीमध्ये वाडीतील हिंदू समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. सुमारे पाचशे हून अधिक जण या यात्रेत सहभागी झाले होते. महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात या यात्रेत सहभागी होती. समापन कार्यक्रमांमध्ये स्वामी काशी दास महात्यागी जी महाराज यांनी संबोधन केले. यावेळी ओमच्या लॉकेटचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात दोनशेहून अधिक जण उपस्थित होते.
कोकण प्रांत धर्मजागरण समन्वय गतीविधी तसेच काही धार्मिक व सामाजिक संस्थांच्या प्रयत्नांनी पालघर( मोखाडा, जव्हार, विक्रमगड ) ठाणे ( वसई शहर, शिरसाट ) रायगड ( अलिबाग, कर्जत ) मुंबई महानगरातील ( गोरेगाव, बोरीवली, मार्वे, मुलुंड, घाटकोपर ) आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी संत यात्रा संपन्न झाल्या आहेत. एकूण २५ ठिकाणी संत पदयात्रा संपन्न होणार असून संत पदयात्रा दि. २० डिसेंबर २०२१ ते १० जानेवारी २०२२ पर्यंत ठिकठिकाणी संपन्न होणार आहे.