News

भारतीय मजदूर संघाच्या वतीने पेन्शनमध्ये वाढ तसेच अन्य मागण्यांकरिता पीएफ कार्यालयात निवेदन सादर

ठाणे, दि. २५ जानेवारी :  भारतीय मजदूर संघाच्या वतीने  संपूर्ण देशभरात भविष्य निर्वाह निधी कार्यालयांमध्ये निवेदन देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानुसार भारतीय मजदूर संघ ठाणे जिल्ह्याच्या वतीने, ठाणे येथे विभागीय प्राँव्हीडड फंड आयुक्तांना  पी एफ पेंशन एक हजार रुपयांवरून  पाच हजार  रुपये करण्याबाबतचे आणि  शेवटच्या पगाराच्या ५०% रक्कम पेंशन म्हणून देण्यात यावी या बाबतचे निवेदन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे सुपूर्द करण्यासाठी देण्यात आले.  

महाराष्ट्र प्रदेशात इपीएस – ९५ योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पेन्शन मध्ये वाढ करणे तसेच अन्य मागण्यांकरिता धरणे आंदोलन करून  निवेदन देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व इपीएफओ प्रादेशिक कार्यालयात निवेदन देण्यात आले.  त्यानुसार बांद्रा (१४),  कांदिवली  (१२), ठाणे (८),  वाशी (६),  पुणे – गोळीबार मैदान (२२),  पुणे (आकूर्डी) ३८,  कोल्हापूर (४२),  सोलापूर (७),  नाशिक (६),  औरंगाबाद (१०) या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात  एकूण  १६५ कार्यकर्ते  सहभागी झाले होते.  

ठाणे जिल्हा रिजनल कमिशनर यांच्या वतीने शिवानंद सेठ असिस्टंट कमिशनर यांनी निवेदन स्वीकारले,याप्रसंगी  भारतीय मजदूर संघ ठाणे जिल्हा अध्यक्षा शोभा अंबरकर,  कल्याण जनता सहकारी बँक कर्मचारी संघ युनिट कार्याध्यक्ष मिलिंद रेडे, प्रमोद सोळंके, अनंत भुंडेरे, श्रीकांत बेणारे, उर्जिता जोशी ,देगवेकर उपस्थित होते

औरंगाबाद येथिल प्रॉव्हिडंड फंड कार्यालयात  रिजनल आयुक्त रमेश कुमार यांनी निवेदन स्वीकारले. याप्रसंगी  भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष दीपक भालेराव,  प्रदेश संघटनमंत्री  श्रीपाद कुटासकर,  प्रकाश कुलकर्णी,  बाबुराव शिंदे, बंडू फड, सुरेश कोंडके, अनिल जीवरग,  बी बी पाडळकर,  वसंत पवार  उपस्थित होते.

पुणे येथे अर्जुन चव्हाण, उमेश विश्वाद, सचिन मेंगाळे, निलेश गादगे, निलेश खरात आदी व औद्योगिक कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुंबईत प्रदेश महामंत्री मोहन येणुरे, बापू धडस, श्रीमतीअग्रवाल उपस्थित होते.

Back to top button