वसईत संत रविदास जयंती उत्साहात संपन्न

वसई, दि. २२ : वसई पूर्व एवरशाईन सिटी येथील ब्रॉडवे सर्कल परिसरात संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. समाजातील सर्व घटकांनी मिळून ही जयंती एकत्रितपणे साजरी केली. यावेळी रा.स्व. संघाचे वसई जिल्हा संघचालक नरेंद्र पितळे यांनी संत शिरोमणी श्री रविदास महाराज यांचे पूजन केले.
संत रविदास जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले. त्यात असंघटित कामगारांबद्दल असलेल्या योजना आणि ई-श्रम कार्ड यांच्या बद्दलची माहिती वसई जिल्ह्याचे पर्यावरण सहप्रमुख विकास माकोणे यांनी यावेळी दिली. संत रोहिदास महाराज यांचे चरित्र कथन कोकण प्रांत समरसता गतिविधी संयोजक नागेश धोंडगे यांनी केले. वंदे मातरम गायन आणि त्यानंतर संत रोहिदास महाराज यांच्या आरतीने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमास सुमारे शंभराहून अधिक जण उपस्थित होते.