HinduismOpinion

श्रीशिवछत्रपतींनी केले मंदिराचे पुनर्निर्माण

छत्रपती शिवाजी जयंती विशेष माहिती श्रृंखला – १

छत्रपती शिवाजीमहाराज यांनी हिंदुंच्या स्वाभिमानाचे रक्षण केले.परकिय आक्रमकांनी जेव्हा जेव्हा  आपल्या देशावर आक्रमणे केली,तेव्हा  त्यांनी येथील मठ-मंदिरे उध्वस्त करुन येथील समाजाचा तेजोभंग करण्याचा प्रयत्न केला. बाबराने अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवरील मंदिर पाडून मशिद बांधणे किंवा औरंगजेबाने काशीविश्वनाथ आणि मथुरेतील मंदिर तोडणे ही अशा तेजोभंगाची उदाहरणे आहेत. या मंदिरांच्या जागी मुस्लिम आक्रमकांनी ज्या वास्तु उभ्या केल्या,त्या आमच्यासाठी अत्यंत अपमानास्पद आहेत.  सुप्रसिध्द इतिहासकार श्री.अर्नोल्ड टाॅयन्बी यांनी दिल्लीतील 1960 साली झालेल्या एका भाषणात सांगितले की ” तुमच्या देशात औरंगजेबाने उभारलेल्या मशिदी  तर अत्यंत अपमानास्पद असूनही तुम्ही टिकवल्या आहेत.”  एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात रशियाने जेव्हा पोलंड जिंकला तेव्हा त्यांनी पोलंडवरील विजयाचे स्मारक म्हणून वाॅर्सा शहराच्या मधोमध एक रशियन आॅर्थाडाॅक्स चर्च उभे केले. पहिल्या महायुध्दानंतर जेव्हा पोलंड स्वतंत्र झाला तेव्हा पहिले काम कुठले केले असेल तर रशियाने बांधलेले ते चर्च पाडले आणि रशियन वर्चस्वाचे चिन्ह नष्ट केले. कारण पोलंडवासीयांना ते चर्च आपल्या अपमानाची सतत आठवण करुन देत होते. भारतातील राष्ट्रीय विचारांच्या संघटनांनी याच कारणासाठी श्रीरामजन्मभूमीचे अांदोलन सुरु केले होते.
   खरेतर छत्रपती शिवाजीमहाराज यांनी या कार्याची सुरुवात पूर्वीच केली आहे.तिरुवन्नामलाई येथील शिव मंदिर म्हणजेच सोनाचलपती मंदिर आणि समोरत्तीपेरूमल येथील विष्णू मंदिर आक्रमकांनी बाटविले होते आणि ही मंदिरे पाडून त्या ठिकाणी मशिदी उभ्या केल्या होत्या. शिवाजी महाराजांनी ह्या दोन्ही मशिदी पाडून त्यांचे पुन्हा मंदिरामध्ये रुपांतरण केले.ही सारी हकीकत “शिवचरित्र साहित्य खंड -8 ,लेखांक 15 आणि पृष्ठ क्र 55-56 वर आली आहे. या गोष्टीला आधार म्हणून आणखी एक प्रत्यक्ष शिवकालीन पुरावा मिळतो. तो म्हणजे रघुनाथ नारायण हणमंते यांनी लिहीलेल्या “राजव्यवहारकोश” या ग्रंथात. त्यात ही मंदिरे पुन्हा उभारावी, अशी आज्ञा शिवरायांनी  रघुनाथपंताला दिल्याचे  लिहिले आहे.
“उत्सादितां चिरतरं यवनै प्रतिष्ठाम् शोणाचलेशितुरयं विधिवदविधाय lश्रीमृष्णवृध्दगिरिरुक्मसभाधिपानाम् पूजोत्सवान्प्रथयति स्म सहात्मकीर्त्या ll80
तुम्ही जर आमची मंदिरे पाडुन आमच्या स्वाभिमानाचा अपमान कराल,तर आम्हीही हट्टाने त्यांचे पुनर्निर्माण करु असा संदेशच शिवाजीमहाराजांनी मुस्लिम आक्रमकांना आपल्या कृतीतुन दिला.
छ.शिवाजीमहाराजांनी कल्याण- भिवंडी येथील मशिदी उध्वस्त केल्याचा उल्लेख कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर यांच्या शिवभारत ग्रंथातही येतो ( अध्याय 18, श्लोक 52) शिवभारत हा ग्रंथ शिवरायांच्या आज्ञेनेच लिहिला गेला आहे.

जेझुईट पाद्री आंद्रे फैर यांचे 1678 चे एक  पत्र Historical  miscellanypublished by BISM ,pune ( 1928,p 113) यात छापलेले आहे,त्यातही शिवाजीमहाराजांनी मुसलमानांच्या मशिदी भ्रष्ट केल्याचे तो या पत्रात लिहीतो.
कोणत्याही देशापासून त्याचा धर्म आणि संस्कृती हिरावून घेता येत नाही.स्वाभिमान हिरावून घेता येत नाही. परकीय आक्रमकांनी जर आमच्या स्वाभिमानाची छेडछाड केली तर त्याला जशास तसे उत्तर द्यावे आणि  गुलामीची चिन्हे मिटवून पुन्हा आपल्या मानबिंदुंची पुनर्प्रतिष्ठापना करणे हाच शिवचरित्राचा बोध आहे

– रवींद्र गणेश सासमकर

Back to top button