छत्रपती शिवाजी जयंती विशेष माहिती श्रृंखला – 11
भारतावरील परकीय आक्रमणात पहिला बळी गेला तो स्त्रीयांचा! भारतातही आपापासात युध्द होत असत पण या युध्दात स्त्रीयांच्या अब्रुचे धिंडवडे निघाले असे प्रसंग दूर्मिळच आहेत. उलट स्त्रीयांचा अपमान झाला म्हणून युध्द घडल्याची उदाहरणे भारतात आहेत.
इसवी सन 712 मध्ये भारतात इस्लामचे आक्रमण झाले,तेव्हापासून हिंदु स्त्रीयांची अब्रु असुरक्षित झाली.
मुघल अथवा अन्य मुस्लिम राजवटींनी केवळ जनतेवर अत्याचार केले एवढेच नाही. तर युध्दात मिळालेल्या हिंदु स्त्रीयांची विटंबनाही केली. मुहम्मद तुघलकाने तर हिंदू मुली आपल्या लोकांना वाटुन ईदचा सण साजरी केल्याची नोंद इब्न बतुताने केली आहे.
“युध्दात हाती आलेल्या स्त्रीयांशी मुसलमान निकाह करु शकतात” असा कुराणाचाच स्पष्ट आदेश आहे. (पहा – कुराण सूरह 4- आयत -24)
बादशाह अकबरने गढकटांगाचे राज्य जिंकण्यासाठी 1564 साली सैन्य पाठवले.तिथला राजा मृत्यू पावल्यानंतर तेथील राणी दुर्गावती कारभार करत होती.मुघल सैन्याचा प्रतिकार करतांना ती जखमी झाली आणि शत्रुच्या हाती सापडू नये म्हणून तिने पोटात खंजीर खुपसून मरण पत्करले. तिची सून आणि बहीण मुघलांच्या हाती सापडल्या.त्या दोघींना अकबराच्या जनानखान्यात डांबण्यात आले. ही सर्व हकीकत अबुल फजल याच्या अकबरनामा या समकालीन ग्रंथात लिहीलेली आहे.
वरील घटना फक्त उदाहरणे आहेत,अशा असंख्य घटनांनी मुस्लिम आक्रमकांची पानेच्या पाने भरलेली आहेत.
मुस्लिम आक्रमकांनी हिंदु स्त्रीयांवर अत्याचार केले,परंतु आमच्या राज्यकर्त्यांनी नेहमीच महिलांचा सन्मान केला. मेवाडवर आक्रमण करण्यासाठी आलेल्या अब्दुल रहीम खानखाना याच्या जनानखान्यातील बायकांना जेव्हा कैद करुन महाराणा प्रताप यांच्यासमोर आणण्यात आले,तेव्हा त्यांनी त्या स्त्रीयांची क्षमा मागुन त्यांना सन्मानाने परत पाठवले. हाच आदर्श छत्रपति शिवाजीमहाराजांसमोर होता आणि राजमाता जिजाऊसाहेबांचे संस्कारही असेच होते.
छत्रपति शिवाजीमहाराजांची एक गोष्ट यासंदर्भात खूप मोलाचा संदेश देणारी आहे.
सुरत शहरात मोहनदास पारेख नावाचा व्यापारी होता, तो खूप श्रीमंत आणि धर्मपरायण होता. तो डच लोकांचा हिंदु दलाल होता. शिवरायांनी सुरतेवर स्वारी केली,त्यावेळी तो नुकताच निधन पावला होता, शिवाजीमहाराजांचे लोक आता आपल्याला लुटणार अशी भीती त्या परिवाराला वाटत होती,पण या धामधुमीतही शिवरायांनी मोहनदास पारेखच्या बायकामुलांना त्रास होऊ नये,याची काळजी घेतली होती.
पुढे चिमाजी अप्पा यांनीही पोर्तुगीजाविरुध्दच्या वेढ्यात पोर्तुगीज स्त्रीचा असाच सन्मान राखला होता. स्त्रीयांना विवस्त्र करुन अपमानित करणार्या अब्दुल कादरचे डोळे आमच्या श्रीमंत महादजी शिंदे यांनी फोडुन टाकले होते. कारण या लोकांसमोर आदर्श होता तो शिवाजीमहाराजांचाच !! स्त्रीयांचा सन्मान करणारे हे लोक शिवरायांच्या स्वराज्याचे पाईक होते.
हा आमच्या राजांचा विचार आणि आचार होता, हा जिजाऊ आऊसाहेबांचा संस्कार होता. त्यासाठीच तर बालशिवबाला त्यांनी रामायण-महाभारत शिकवले होते. स्त्रीयांच्या सन्मानाचे रक्षण करणारा राजा असल्यामुळेच स्त्रीयांवर अत्याचार करणारांचे हातपाय तोडले जात होते आणि दुसरीकडे स्वत : मुस्लिम राज्यकर्तेच स्त्रीयांची अब्रु घेत त्यांना जनानखान्यात कोंबत होते.
बंधु-भगिनींनो,हाच फरक असतो परकीयांच्या राज्यात आणि आपल्या स्वराज्यात!!
आज दररोज वर्तमानपत्रात बलात्कार,विनयभंगाच्या बातम्या आपण वाचतो,त्याचे कारण म्हणजे आम्ही आमचा इतिहास विसरलो, स्त्रीयांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होण्यासाठी पुन्हा पुन्हा शिवचरित्राचे वाचन,स्मरण आणि अनुसरण गरजेचे आहे.
- रवींद्र सासमकर
संदर्भ
1) जाणता राजा-नाटक
2) दिव्य कुराण
3) छत्रपति शिवाजीमहाराज झाले नसते तर – श्री.गजानन भास्कर मेहेंदळे