Opinion

गोंद्या आला रे!

१८९६-९७ चा काळ. हाँग-काँगसारख्या शहरातून एक रोग झपाट्याने भारतात फैलावत होता. उंदरांच्या मार्फत पसरणाराहा ‘प्लेग’ नामक रोग झपाट्याने आपले हातपाय पसरत होता. महाराष्ट्रात प्लेगचे थैमान सुरु झाले होते. पुण्यातील प्लेगची साथ वाढत असताना ब्रिटिश सरकारने रँड नावाच्या एका अधिकाऱ्याला अधिकारी म्हणून प्लेगचे निर्मूलन करण्यासाठी पुण्यात नेमले. त्याच्या जोडीला आयर्स्ट नावाचा एक अधिकारीही होता. प्लेगच्या रोग्यास प्रथम काखेत, जांघेत गाठ येत असे. नंतर ताप वगैरे लक्षणे दिसून प्लेगच्या रोग्यास विलग करावे लागत असे. रँड पुण्यात आला तसे त्याने हळूहळू आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली. पुण्यात सर्वत्र घरात घुसून कोणी प्लेगचे रोगी असल्यास तपासणी सुरु झाली.

हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर इंग्रज सोजिरांनी घरातील सामान तपासताना त्यातील काही सामान चोरायला देखील सुरुवात केली. पुढेपुढे अंधारी घरे असल्याची कारण देऊन सर्वांना घरातून बाहेर काढले जात असे व मगच तपासणी होत असे. यात महिलांसाठी विशेष कोणी परिचारिका , तपासणी अधिकारी न देता सरसकट सर्व महिलांना देखील इंग्रज सोजिरच तपासात असत. यातून अनेक ठिकाणी स्त्रियांच्या अब्रूवर देखील घाला घालण्यात आला व काही स्त्रियांनी आपला जीवही दिला. पुढेपुढे रँडच्या हाताखालचे सैनिक घरातील देवघरही उलथून टाकू लागले. संपूर्ण पुणेच यामुळे त्रस्त झाले होते. चापेकर बंधू – याचवेळी कीर्तनकार चापेकरांची मुले हे सर्व बघत होती. चिंतन करत होती. मोठा दामोदर , मधला बाळकृष्ण व धाकटा वासुदेव अशी तीन हरि चापेकर यांची मुले. त्यांचे वास्तव्य चिंचवड येथे होते. तिघेही बंधू राष्ट्रवादी बाण्याचे होते. पुण्यातल्या मित्रमंडळीबरोबर त्यांनी आपला एक गोफण वर्ग चालवला होता. तिथेच त्यांनी एका मारुतीची स्थापना करुन त्याला गोफण्या मारुती असे नाव दिले होते. त्या तिघांनाही रँडचे अत्याचार डोळ्यासमोर दिसत होते. त्या सर्वांचे मन पेटून उठले. दामोदरांनी सुचवल्याप्रमाणे दोघा थोरल्या भावांनी सैन्यात शिरुन १८५७ सारखे लष्करी उठाव परत घडवून आणावेत अशी योजना आखली. यासाठी त्यांनी इंग्रज सरकारच्या सैन्यात प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न केला तसेच अनेक संस्थांनिकांनाही पत्रे पाठवली. परंतु कोणाचकडून अपेक्षित उत्तर न आल्याने शेवटी त्यांच्यात विचार विनिमय होऊन त्यांनी लोकमान्य टिळकांची भेट घेण्याचे ठरवले. शिवराज्याभिषेकदिनाच्या कार्यक्रमात टिळक येणार आहेत असे त्यांना कळले तेव्हा त्यांनी त्या कार्यक्रमात एक कविता सादर केली.तिचे बोल होते :-

या भरतभूमीचे ठायी कोणी पुरुषच उरला नाही ! पुरुष तो बहु मिश्या भारवाढविला ! म्हणूनकाय हो झाला ! पुरुष तो!लेंढारपशुसमव्याला. म्हणूनकाय हो झाला ! पुरुष तो!तेवढ्यात अचानकच दामोदर म्हणाला – पुरुष ती झाशीचीराणी ! महामर्दानीरंगलीरणी, निजराष्ट्राच्याप्रित्यर्थ जो अचाटकरी पुरुषार्थ , पुरुष तो!निजधर्माच्याप्रित्यर्थ जो अचाटकरी पुरुषार्थ , पुरुष तो!यातच पुढे ते बोलून गेले युद्ध न करता नुसतेच तळतळाट करणं म्हणजे नुसती बोटे मोडणं आहे! टिळकांनी त्यांची निष्ठा ओळखली. चापेकर व टिळक यांची भेट झाली. या भेटीतच टिळकत्यांना म्हणाले ” जर नुसते बोलणे जर बोटे मोडणे आहे तर मग रँड अजून कसा जिवंत आहे?” या कानपिचक्यानी चापेकरांचा निश्चय दृढ झाला. बंदुका , पत्रे व बेत -पुण्यातील प्लेगची साथ काहीशी कमी झाली तरी तपासणी मात्र कमी झाली नव्हती. लकडीपुलावर कायम २ हत्यारबंद पोलीस असत. दामोदर चापेकर चारपाच वेळा तिथे पुजाऱ्याचा वेष घेऊन गेले. एक दिवस त्यांनी तिथल्या शिपायांच्या बंदुका चोरून आणल्या. त्यावेळी भारतीयांना शस्त्रबंदी असल्याने चापेकरांना निजामाच्या मुलुखातून बंदुका आणाव्या लागल्या. हे करत असतानाच चापेकर रँडला त्याची दुष्कृत्य थांबवण्यासाठी पत्रे देखील पाठवत असत. पण एकही पत्र रँडने विचारात घेतले नाही. मध्यंतरीच्या काळात सर्व चापेकर कुटुंब चिंचवडहुन पुण्यात भोपळेवाडा येथे राहत होते.त्यावेळी इंग्लंडच्या राणीचा अमृतमहोत्सवी वाढदिवस संपूर्ण हिंदुस्थानने साजरा करण्याचे ठरवण्यात आले होते. वास्तविक तीवेळ कुठलाही उत्सव साजरा करण्याची नव्हतीच. कारण मुंबई येथे तापाची साथ होती, कोलकाता येथे भूकंप आला होता तसेच पूर्ण देशात दुष्काळ पडला होता. तरीही अन्यायी ब्रिटिश सरकारनेहा उत्सव घ्यायचाच ठरवले.

गणेशखिंडीजवळ (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जवळ) त्यावेळी कलेक्टरचा बंगला होता. तिथे सर्व इंग्रज अधिकाऱ्यांचा हा उत्सव साजरा होणार होता. हे ठिकाण तेव्हाच्या पुण्याच्या बऱ्यापैकी बाहेर होते. या उत्सवाला रँडही जाणार हे साहजिकच होते. रँडला मारायची संधी आयती हातात आली होती. चापेकरांनी तिथल्या जागेची पाहणी केली. आडोशाची जागा , रिकामे बंगले बघून ठेवले. येताना जवळच असलेल्या चतुरसिंगी(सध्याचेचतु:श्रुंगी देवस्थान) येथे जाऊन देवीची प्रार्थना केली. त्याठिकाणी दामोदरपंत यांनी एक छोटे पद रचले ते असे–आई अंबे जगदंबे जातो सत्कर्मी जय देरिपूदमनाचा आई भवानी आम्हाला वर देआम्हानाहीतुजवाचूनीकोणी जगी आसरापुण्यपत्तनी धर्म बुडविलारँडाने सारात्यामाराया, अविचारा, हातीआमुच्यागे अंबे धैर्य शौर्य मग दे आई।।घरी आल्यावर त्यांनी हत्यारांची विभागणी केली. प्रत्येकी एक तलवार व एक बंदूक असे बरोबर घेण्याचे ठरले. पैकी दामोदर यांच्याकडे जी बंदूक होती तिचा एकच बार एका वेळी होत असे तर बाळकृष्ण यांच्याकडे मोठी नळी असलेली एक बंदूक होती. धाकटा भाऊ हा रँडच्या बग्गीच्या मागे धावत येऊन बाकीच्या दोघांना इशारा करणार होता. बेत आखला गेला होता. इशारा करताना परवलीचा शब्द ठरला होता, “गोंद्याआला रे!”.. आणि दिवस ठरला – २२ जून १८९७राणी लाखेटरांची माळ – संपूर्ण पुणे रोज अत्याचार सहन करत असताना राज्यकर्ते मात्र आपल्या राणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी काही कसर होऊ देत नव्हते. २१ जून रोजी चापेकर बंधूंनी हिंडून जुन्या चपला मिळविल्या. त्या प्रत्येक चपलेस राणीचे एक चित्र अशा १० चपलांची माळ चापेकरांनी बुधवार पेठेच्या रस्त्यावर लावली. व तिथून निघून घरी आले. रँडचा वध – २२ जून रोजी ठरलेल्या बेताप्रमाणे चापेकर बंधू गणेशखिंडीत पोचले. अंधारातही त्यांनी रँडची बग्गी ओळखली. ती कलेक्टरच्या बंगल्यात गेली. आजूबाजूला आतिषबाजी बघायला आलेली पुण्यातील मंडळी असल्याने त्यांच्यासमोर तलवार घेऊन वावरणे अवघड होते त्यामुळे तिघांनी आपल्या तलवारीजवळच असलेल्या दगडीपुलाच्या खाली ठेवून दिल्या. कलेक्टरच्या बंगल्यातील राणीच्या वाढदिवसाचा उत्सव रंगात आला होता. हळूहळू आतिषबाजी बंद झाली तशी लोकांची गर्दी पांगली. काहीवेळाने सर्व इंग्रज अधिकारी बाहेर पडू लागले. वासुदेव चापेकररँडच्या बग्गीच्या मागे धावत येत होता.मधूनच आपला परवलीचा शब्द म्हणत होता. बाळकृष्ण व दामोदर दोघे सावध होते.

तेवढ्यात एक बग्गी त्यांच्याजवळ आली व मागून “गोंद्या आला रे” असा वासुदेवाचा आवाज आला. बाळकृष्ण यांनी त्या बग्गीवर झेप घेऊन त्यात गोळी झाडली. बालकृष्णाचे दुर्दैव हेच की त्या बग्गीत रँड नसून त्याच्याबरोबर असलेला अधिकारी आयर्स्ट होता. बाळकृष्ण बग्गीवरून खाली उतरला तेव्हाही मागून एका बग्गीचा आवाज आला व पुन्हा एकदा “गोंद्याआला रे” ही आरोळी ऐकू आली. आता दामोदर चापेकर पुढे धावले व रँडच्या बग्गीत शिरून त्याला गोळी घातली. कामगिरी फत्ते झाल्यावर तिघे बंधू घरी गेले व दुसऱ्या दिवशी मुंबईला निघून गेले. वधाचा तपास व शिक्षा – वधाचा तपास ‘ब्रुईन’ नावाच्या एका अधिकाऱ्याला सोपविण्यात आला. तत्पूर्वी गणेशखिंडीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रँड आणि आयर्स्ट यांना ‘सर डेविड ससून’ रुग्णालयात हलविण्यात आले. आयर्स्ट त्याच दिवशी मरण पावला पण रँड मात्र काही दिवसांनी मेला. त्याच्याही आधी चापेकरांनी ‘वेलणकर’ नावाच्या एका धर्मांतर करणाऱ्या माणसाला चांगलाच चोप दिला होता.या वेलणकराने चापेकरांना पाहिले असल्याने ब्रुईनने राणीचा पुतळा, वेलणकर व रँडचा वध याची सांगड घालून तिन्ही प्रकरणात एकच आरोपी असल्याचे ताडले व त्या दिशेने तपास नेला. चापेकरांच्या ‘गोफणक्लब’ मध्ये द्रविड नावाचे दोन बंधू येतअसत. त्यातले गणेश द्रविड व रामचंद्र द्रविडयांनी फितुरीकरुन दामोदर चापेकरांचे नाव घेतल्याने त्यांना अटक करण्यात आली. दामोदरांना पोलिसांनी नेल्यावर बाळकृष्ण व वासुदेव दोघेही भूमिगत झाले. कालांतराने वासुदेव परत घरी आले तर बाळकृष्ण हे निजामाच्या मुलुखात जाऊन राहिले. तिथेही फितुरी झाल्याने ते पकडले गेले. वासुदेवाच्या विरोधात काही पुरावा नसल्याने त्याला काही शिक्षा झाली नाही मात्र बाकी दोन्ही भावांना मात्र फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. द्रविडांचा वध -द्रविडबंधू हे सध्याच्या ‘खुन्या मुरलीधर’ देवालयापाशी राहत. त्यांनी फितुरी केल्याने वासुदेव चापेकर व त्यांचा सहकारी महादेव रानडे या दोघांनी ब्रुईनने बक्षिसाची रक्कम घेण्यासाठी बोलावले आहेअसे कारण सांगून त्यांचा गोळ्या झाडून वध केला. तसेच रामा पांडू नावाच्या एका आरक्षीचादेखील वध करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यानंतर रानडे व चापेक रदोघांनाही फाशीची शिक्षा देण्यात आली.

फाशी – या तपासात सर्व आरोपींना येरवडा येथे कारागृहात ठेवण्यात आले होते. तसेच टिळकांना देखील तिथेच अटक करुन ठेवले गेले होते. दामोदर चापेकर यांना आधी १८ मार्च रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. परंतु काही कारणानेत्यांना १ महिना उशिराम्हणजे १८ एप्रिल १८९८ रोजी फाशी देण्यात आली. फाशीस जाताना त्यांनी टिळकांना भेटण्याची अनुमती मागितली. टिळकांकडून त्यांची ‘गीता’ हातात घेऊन स्तोत्र म्हणत ते वधस्तंभाकडे गेले. फाशीदिल्यानंतर त्यांच्या हातातील गीता काढताना सर्वांना अवघड झाले होते. बाळकृष्ण चापेकर यांना १२ मे १८९९ रोजी फाशी देण्यात आली. आदल्यादिवशी त्यांनी कडकडीत उपवास केला व फाशी देताना ‘जय शंकर’ असा घोष करुन ते फाशी गेले. वासुदेव चापेकरांना ८ मे १८९९ रोजी रात्री फाशी देण्यात आली. या तिघा बंधूंचे अंत्यसंस्कार घाईत उरकण्यात आले व त्यांची रक्षा देखील कुटुंबियांना देण्यात आली नाही. महादेव रानडे हा तरुण विज्ञान शाखेचे शिक्षण घेत असे. त्याचे मामा वैजनाथ राजवाडे यांनी त्याला माफी मागण्यास सांगितल्यावर त्यांचा धिक्कार करुन त्यानेही फाशीचा स्तंभ स्वीकारला. स्मृतिस्थळ -रँड व आयर्स्ट या दोघांच्यामृत्यूनंतर त्यांना जेथे पुरण्यात आले तिथे त्यांचे छोटेखानी स्मारक बनवण्यातआले होते. ही तीच जागा होती जिथेदोघांचा वध केला गेला. स्वातंत्र्यानंतरही हे स्मारक तसेच होते. हॉटसन या अधिकाऱ्यालामारणारे ‘वासुदेव बळवंत उर्फ हॉटसनगोगटे’ यांनी याच ठिकाणी चापेकरांचे स्मारक बांधले. आजही औंध रस्त्यावर खैरेवाडीच्याजवळ हे स्मारक आहे. तेव्हाची व आत्ताचीस्थळे -चापेकरांच्या राहत्या वाड्याचे आज ‘क्रांतीतीर्थ’ असे नामकरण केले गेलेआहे. ‘भोपळेवाड्यावर’ आता गजानन कृपा नावाची इमारत उभी आहे.

संदर्भ – १) हुतात्मा दामोदर हरि चापेकरयांचेआत्मवृत्त.

२) चापेकर पर्व – श्री सच्चिदानंद शेवडे , अभिजात प्रकाशन.

  • सुमेध श्रीवर्धन बागाअीतकर (लेखक ब्लॉगर आहेत. )

Back to top button