देवी कालीच्या हातात सिगारेट, LGBT झेंडा!

‘काली’ या डॉक्यूमेंट्री फिल्मच्या पोस्टरवरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
अनुष्का शर्माच्या बुलबुलपासून ते सैफ अली खानच्या तांडवपर्यंतच्या अनेक चित्रपट आणि वेब सिरीजवर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट य मुख्य भूमिका असलेल्या ब्रह्मास्त्र या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये रणबीर मंदिरात बूट घालून प्रवेश केल्याचं दिसलं. त्यावरून नेटकऱ्यांनी खूप ट्रोल केलं. निर्मात्यांवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला. पुन्हा एकदा असंच प्रकरण समोर आलं आहे. चित्रपट निर्मात्या लीना मनिमेकलाई यांच्या डॉक्युमेंटरी पोस्टरवरून ट्विटरवर वाद निर्माण झाला आहे. दिग्दर्शिका, कवयित्री आणि अभिनेत्री लीना मनिमेकलाई यांनी त्यांच्या माहितीपटाचं पोस्टर शेअर केलं आहे, ज्यामध्ये ‘मां काली’च्या वेशातील अभिनेत्री सिगारेट ओढत असताना दिसतेय.
भारतीय चित्रपट निर्मात्या लीना मनिमेकलाई यांच्या ‘काली’ या डॉक्यूमेंट्री फिल्मच्या पोस्टरवरून मोठा वाद निर्माण झालाय. या फिल्मच्या पोस्टरवर मॉं कालीला सिगारेट ओढताना दाखवण्यात आले आहे. त्यामुळे हे पोस्टर वादात सापडले असून लीना मणिमेकलाई यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरतेय.
पोस्टरमध्ये काय?
लीना मनिमेकलाई यांनी २ जुलै रोजी ‘काली’ या डॉक्यूमेंट्री फिल्मचे पोस्टर प्रदर्शित केले होते. या चित्रपटात मॉं कालीला सिगारेट ओढताना व तिच्या एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात एलजीबीटी समुदायाचा रंगीत ध्वज दाखवण्यात आला आहे. त्यामुळे या पोस्टरवरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
कोण आहेत लीना मणिमेकलई?
लीना मणिमेकलाई चा जन्म तामिळनाडूतील मदुराईमधला आहे. सिनेमाचं दिग्दर्शन करण्यासोबतच ती कविता देखील लिहिते,तिनं जास्त डॉक्युमेंट्री फिल्म्स बनवल्या आहेत. तिच्या डॉक्युमेंट्रीना बऱ्याच परदेशी फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आलं आहे. लीनाने काही दिवसांसाठी मेनस्ट्रीम सिनेमांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून भूमिका पार पाडलेली आहे. यानंतर तिची पहिली डॉक्युमेंट्री ‘महात्मा’ प्रदर्शित झाली होती. त्यानंतर लीनाने दलित,महिला,ग्रामीण आणि LBGTQ समाजाच्या समस्यांवर शॉर्ट फिल्म्स आणि डॉक्यूमेंट्री बनवल्या. लीना स्वतःला बाय-सेक्शुअल असल्याचं सांगते. अभिनेत्री म्हणून लीनाने ४ शॉर्ट फिल्म ‘चेलम्मा’, ‘लव्ह लॉस्ट’, ‘द व्हाइट कॅट’ आणि ‘सेनगडल द डेड सी’ मध्ये काम केलं आहे.
नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया,
सतत हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या जातात. ते आ संयमाची परीक्षा घेत आहेत, असं एका युजरने लिहिलं. इतकंच नाही तर संबंधित युजरने अमित शाहांपासून पंतप्रधान कार्यालयालाही टॅग करत पोस्टर आणि चित्रपटावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. इतर धर्माच्या देवदेवांना अशा प्रकारे धूम्रपान करताना दाखवण्याची हिंमत कराल का, असा सवाल एका युजरने केला. अशा दुष्कर्माची शिक्षा स्वत: माँ काली तुम्हाला देईल, अशा शब्दांतही नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
अटकेची मागणी,
सोशल मीडियावर नेटकरी चित्रपट निर्मात्या लीना मनिमेकलाई यांच्यावर संताप व्यक्त करत आहेत.पोस्टरमध्ये निर्मात्यांनी माँ कालीचा अपमान केल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे. तसेच लीना मनिमेकलाई यांच्यावर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे आता या प्रकरणी लीना मणिमेकलाई याच्यावर अटकेची मागणी केली जात आहे.सोशल मीडियावर #arrestleenamaninekalai ट्रेंड झाला आहे.
नुपूर शर्मा प्रकरणात ज्या प्रकारे मुस्लिम बांधव एकत्रित झाले,आता सहिष्णु हिन्दू देखील मोठ्या प्रमाणात एकत्र होवून लीना मनिमेकलाई यांच्या विरोधात आवाज उठवत आहे.