14 वर्षांखालील विम्बल्डन टेनिस स्पर्धेसाठी देशातून एकमेव निवड झालेल्या कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधवला पराभव स्वीकारावा लागला. मात्र, तिने पहिल्याच प्रयत्नात दाखवलेला खेळ आणि आत्मविश्वास नक्कीच तिची भावी वाटचाल दाखवणारा आहे. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या रोमानियाच्या अन्ड्रिया सोरविरुद्ध तिला संघर्षपूर्ण लढतीत पराभव स्वीकारावा लागला.
देशातून एकमेव निवड झालेली कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधवला विम्बल्डनमध्ये पराभव स्वीकारावा लागला, असला तरी पण आत्मविश्वास तिचा चांगलाच दुणावला आहे. पहिल्या सेटमध्ये ऐश्वर्याने अन्ड्रियाविरुद्ध 3-0 अशा आघाडीवर होती, पण पुढे अन्ड्रियाने आक्रमक खेळ केल्याने ऐश्वर्या प्रतिकार थोडा कमकुवत ठरला आणि तिला 6-3,6-2 असा पराभव स्वीकारावा लागला.
पहिल्याच प्रयत्नात दमदार करून लक्ष वेधणाऱ्या ऐश्वर्याने प्रतिक्रिया देताना सांगितले की, “खेळ चांगला झाला, पण दुर्दैवाने पराभव झाला, पण मी माझ्यासोबत घडलेल्या चांगल्या तसेच नकारात्मक बाबीही पाॅझिटिव्हपणे सोबत घेऊन जात आहे. विम्बल्डनमध्ये ग्रास कोर्टवर खेळण्याचा अनुभव सर्वोत्तम होता. मी पहिल्यांदाच ग्रासकोर्टवर खेळले.”
ऐश्वर्याची प्रशिक्षक अमृता बॅनर्जी यांनी सांगितले की,14 वर्षांखालील विम्बल्डन अजिंक्यपदासाठी निवड झालेली कोल्हापूरची ऐश्वर्या ही एकमेव खेळाडू होती. स्पर्धेचा भाग होणे हे आमच्या सर्वात महत्त्वाचे होते. तिला या ठिकाणी पाहणे हा रोमांचकारी अनुभव होता. ऐश्वर्या सातत्याने ऐतिहासिक कामगिरी करत आहे. फॉर्ममध्ये सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर 13 वर्षीय ऐर्श्वयाने अंडर-14 श्रेणीमध्ये प्रथम क्रमांकावर पोहोचण्याची कामगिरी केली आहे.
दोन महिन्यांपूर्वी आयटीएफ जागतिक 14 वर्षाखालील मुलींची टेनिस स्पर्धा झाली होती. या स्पर्धेत भारतीय संघातून सहभागी झालेल्या ऐश्वर्याने 4 सामने जिंकत सेमी फायनलला धडक मारली होती. त्याच कामगिरीच्या जोरावर तिला विम्बल्डनचे तिकिट मिळाले.