समुद्राच्या पाण्याचे पिण्यायोग्य पाण्यात रुपांतर करण्याचे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित;

लक्षद्वीप बेटावर यशस्वी प्रयोग,
पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण अधिक असले तरी त्यात गोडे पाणी कमी आणि खाऱ्या पाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे हे खारे पाणी पिण्यासाठी वापरता यावे यासाठी मागील कित्येक वर्षांपासून यावर संशोधन सुरु आहे.भारताला जवळपास सात हजार किलोमीटर लांबीची समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पावसाचे पाणी पुरेनासे झाले आहे. धरण बांधणे फार खर्चिक असल्याने आपल्याला वेगवेगळे स्वदेशी पर्याय शोधणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी इस्राएलचे तंत्रज्ञान आपल्याला किफायतशीर आहे.
National Institute of Ocean Technology-NIOT यांच्या संशोधनाला यश मिळाले असून समुद्राचं खारं पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालयानं स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केलं आहे. त्यामुळे आता समुद्राच्या पाण्याचे पिण्यायोग्य पाण्यात रुपांतर होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह (Dr.Jitendra Singh) यांनी दिली आहे.

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था (National Institute of Ocean Technology-NIOT) या आपल्या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे पिण्यायोग्य पाण्यात रुपांतर केले आहे. खाऱ्या पाण्याचे पिण्यायोग्य गोड्या पाण्यात रुपांतर करण्यासाठी लो प्रेशर थर्मल डीसालायनेशन (LTTD) हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
दर दिवशी 1 लाख लिटर पिण्यायोग्य पाणी बनवण्याची क्षमता,
पृथ्वी विज्ञान मंत्रालयानं राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान या आपल्या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे पिण्यायोग्य गोड्या पाण्यात रुपांतर करण्यासाठी लो प्रेशर थर्मल डीसालायनेशन (LTTD) तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पिण्यायोग्य पाण्याचा यशस्वी प्रयोग लक्षद्वीप बेटावर यशस्वीपणे करण्यात आला आहे. केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपच्या कावारात्ती, अगाती आणि मिनीकॉय बेटांवर LTTD तंत्रज्ञानावर आधारित तीन डीसलायनेशन प्लांट विकसित करण्यात आले आहेत.

प्रत्येक LTTD प्लांटची दर दिवशी 1 लाख लिटर पिण्यायोग्य पाणी बनवण्याची क्षमता आहे.या प्लांट्सच्या यशाच्या आधारावर गृह मंत्रालयाने केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपच्या माध्यमातून अमिनी, अन्द्रोथ, चेटलेट, कादमात, काल्पेनी आणि किलतान या ठिकाणी दिवसाला 1.5 लाख लिटर क्षमतेच्या आणखी 6 LTTD प्लांट्सची स्थापना करण्याचे काम सोपवले आहे. LTTD तंत्रज्ञान लक्षद्वीप बेटांसाठी योग्य आढळून आले असून समुद्राच्या पृष्ठभागावरील पाणी आणि खोल समुद्राचे पाणी यांच्या तापमानातील सुमारे 15⁰C इतका आवश्यक फरक आतापर्यंत केवळ लक्षद्वीप किनारपट्टी परिसरातच आढळून आला आहे.
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करणाऱ्या निर्मिती प्रकल्पाची (डीसालायनेशन प्लांट) किंमत अनेक घटकांवर अवलंबून आहे. या प्रकल्पासाठी वापरण्यात आलेले तंत्रज्ञान आणि प्रकल्पाचे स्थान याचा यात समावेश आहे. लक्षद्वीप येथील सहा प्लांटची एकूण किंमत 187.75 कोटी रुपये इतकी आहे.