OpinionWorld

लहान वयात अशोकचक्र मिळवणारी नीरजा भानोत

आज आपल्यापैकी अनेक जणांना नीरजा भनोत (Neerja Bhanot) कोण हे देखील माहित नसेल.नीरजा भनोत ही एक भारतीय विरांगना होती.1986 साली तिने आपल्या साहसाने आणि बुद्धिचातुर्याने 400 जणांचे जीव वाचवले आणि वयाच्या 23 वर्षी हुतात्मा झाली. ती भारतातील सर्वात लहान वयाची अशोक चक्र वीरता पुरस्कार(Ashoka Chakra Award) मिळवणारी पहिली भारतीय ठरली होती. पण नंतर आपण आपल्या सवयी प्रमाणे या विरांगनेला देखील विसरून गेलो.

कोण आहे ही नीरजा भानोत(Neerja Bhanot)

नीरजा भनोत ही हरीश भनोत या हिन्दुस्थान टाइम्समध्ये असणाऱ्या पत्रकाराची मुलगी आणि Pan Am 73 या एयरलाइन्स कंपनीमध्ये सीनियर अटेंडंट म्हणून काम करणारी एक सर्वसामान्य मुलगी. पण आपल्या साहसाने, वीरतेने त्यांनी आपली असामान्य ताकद दाखवून दिली.

5 सप्टेंबर 1986 मध्ये पाकिस्तानातील कराची या विमानतळावर मुंबई ते अमेरिका जाणाऱ्या Pan Am 73 एयरलाइन्सच्या विमानाला चार अतिरेक्यांनी हायजॅक केले. त्या विमानात 400 प्रवासी होते .नीरजा सुद्धा याच विमानात सेवारत होती.अतिरेक्यांना ते विमान त्यांना इस्राइल मधल्या कोणत्या तरी इमारतीला धड़कावयाचे होते.पण विमानात पायलट नसल्यामुळे अतिरेकी विमान घेवुन जाऊ शकत नव्हते.अतिरेक्यांनी पाकिस्तान सरकारला एका पायलट ची मागणी केली . पण पाकिस्तान सरकारने ती मागणी भारताच्या भीतीने फेटाळली.अतिरेक्यांनी पाकिस्तान सरकारला वेठीस धरण्यासाठी प्रवाश्यांना मारायची धमकी दिली.आणि नीरजाला सर्व प्रवाश्यांचे पासपोर्ट गोळा करायला सांगितले.अमेरिकन प्रवाश्यांना निवडून मारायची धमकी देवून पाकिस्तानवर आणि अमेरिकेवर दबाव टाकू इच्छित होते .

नीरजाने पासपोर्ट गोळा केले पण शिताफिने त्यातील अमेरिकन प्रवाश्यांचे पासपोर्ट लपवून बाकीचे पासपोर्ट अतिरेक्यांना दिले. त्यानंतर त्या अतिरेक्यांनी एका ब्रिटिश प्रवाश्याला मारायची धमकी देवून पाकिस्तान सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.पण नीरजाने त्या अतिरेक्यांना समज देऊन त्या ब्रिटिश प्रवाश्याचे प्राण वाचविले .

नीरिजाला त्या क्षणी असे लक्षात आले की आता विमानातील इंधन संपेल आणि विमानात पूर्ण अंधार होईल.या परिस्थितीचा फायदा उठवायचा असे निरजाने ठरविले त्याप्रमाणे तिने प्लानिंग सुरु केले.तिने प्रवाश्यांना जेवण देण्याच्या बहाण्याने विमानातील आपत्कालीन दरवाजा बद्दल माहिती देणारी पत्रक प्रवाश्यांपर्यंत पोहोचविले. नीरजाने जसा विचार केला होता तसेच घडले.थोड्या वेळाने विमानातील इंधन संपले आणि विमानात पूर्ण पणे अंधार पसरला या परिस्थितीचा फायदा घेवुन नीरजाने विमानाचे सर्व आपत्कालीन दरवाजे उघडले.आणि प्रवाश्यांचे प्राण वाचवले .

अतिरेक्यांच्या लक्षात ही गोष्ट आली त्यांनी बेछूट गोळीबार सुरु केला .काही प्रवाश्यांना गोळ्या लागल्या पण ते बचावले .सर्व प्रवासी विमानातून बाहेर पड़ेपर्यंत नीरजा विमानातच थांबली होती.आता ती विमानातून बाहेर पडणार इतक्यात तिला एका लहान मुलांचा रडण्याचा आवाज ऐकायला आला . एवढ्या वेळात पाकिस्तानी कमांडोज पण विमानात पोहोचले होते.त्यांनी त्या चार अतिरेक्यांपैकी तीन जणांना मारून टाकले.नीरजा त्या मुलांना शोधून विमानाच्या बाहेर पडत होती तेव्हड्यात तो चौथा अतिरेकी निरजाच्या समोर आला.नीरजानी त्या मुलांना आपत्कालीन दरवाजाच्या बाहेर काढले पण त्या अतिरेक्याने झाडलेल्या गोळ्या अंगावर झेलल्या पण त्या लहान मुलांना,प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. परंतु गोळ्या लागल्याने तीचा दुर्दैवी अंत झाला .17 तास अतिरेक्यांशी झुजंत चारशे प्रवाश्यांना वाचवुन नीरजाचा झालेला अंत सर्व जगाला दुखी करून गेला.

नीरजाने वाचविलेल्या त्या लहान मुलां पैकी एक जण मोठा झाल्या वर वैमानिक झाला . त्याने त्याच्या भावना व्यक्त करताना म्हणाला ‘माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणावर निराजाचा हक्क आहे.’

नीरजाला मिळालेले पुरस्कार :

भारताने निरजाला अशोक चक्र हां सर्वोच्च नागरी पुरस्कार देवून सन्मानित केले.

पाकिस्तानने तमगा-ए-इन्सानियत हां सर्वोच्च पुरस्कार दिला .

अमेरिकेने जस्टिज फॉर विक्टम ऑफ क्राइम अवार्ड हां वीरता पुरस्कार देवून सन्मानित केले .

स्त्रियांना हतोत्साहित करणारे वर्तन करून, त्यांचा जीवनस्तर उंचावण्याकडे दुर्लक्ष करण्यापासून ते त्यांचा छळ आणि अत्याचार करण्यापर्यंत अनेक प्रकारे हीनत्वाची वागणूक स्त्रीजातीला मिळत राहिली आहे. हा भेदभाव दूर करून स्त्रियांच्या प्रगतीस पोषक वातावरणाची निर्मिती आणि त्याचे सुचालन करणे आणि लैंगिक समतेद्वारे (जेंडर इक्वॅलिटी) समाजाचे संतुलन साधणे यासाठी पुरोगामी आणि विवेकी समाजाने बाळगलेला दृष्टिकोन केलेली कृती यांचा समुच्चय म्हणजे स्त्री सक्षमीकरण करणे,हीच नीरजाला खरी आदरांजली ठरेल.

‘वसुधैव कुटुम्बकम’ हे काही फक्त फुशारकी मारण्यासाठी नव्हे तर ही आमची जीवन पद्धती आहे.भारतीयांसमवेत अमेरिकन आणि ब्रिटिश नागरिकांचा जीव देखील नीरजाने वाचवला.भारतीयांच्या सेवा वृत्तीचा परिचय संबंध जगाला करवून दिला. नीरजाचा संघर्ष समस्त भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे. आशा निराशेच्या गर्तेत न अडकता आपल्याला जमेल तेवढे राष्ट्रकार्य करणेआणि समाजाला त्यासाठी प्रेरित करणे हेच आपले उद्दिष्ट असले पाहिजे.

नीरजाचा हा प्रेरणादायी संघर्ष २०१६ मध्ये चित्रपट माध्यमातून देखील जनतेसमोर आला आहे.

Back to top button