News

‘स्वामीनिष्ठ’ :- मंगोलिय घोडे

मंगोलिय घोडे जग जिंकण्याचं प्रतिक, तसेच ‘स्वामीनिष्ठ’ म्हणून देखील ओळखले जातात.

मंगोलिया (Mongolian) हा चीन आणि रशिया या देशांच्या सीमांनी वेढलेला देश आहे. तो चंगेज खानचा देश म्हणून ओळखला जातो. १२ व्या शतकात मध्य आशियामध्ये या मंगोल शासकाची दहशत शिगेला पोहोचली होती.मंगोल सैनिकांनी घोड्यावर बसून शेकडो मैलांचा प्रवास केला,मोठा प्रांत त्यांनी जिंकला. चंगेज खानचे सैन्य घोड्यावर बसून आशियातील विविध भागांत, अगदी आपल्या सिंधू नदीपर्यंत आलं. घोड्यांशिवाय मंगोल हे पंख नसलेल्या पक्ष्यासारखे आहेत, असं त्यांच्याबद्दलच मत अनेक इतिहासकारांनी नोंदवलं आहे.

मंगोलियातील अजूनही घोड्यांना सांभाळण्याची संस्कृती टिकून आहे. एका अहवालानुसार मंगोलियामध्ये ३० लाखांहून अधिक घोडे आहेत. विशेष म्हणजे मंगोलियाची लोकसंख्या २०२० मध्ये ३२ लाखांच्या घरात होती, म्हणजेच लोकसंख्ये इतकेच घोडे.अशा परिस्थितीत जेव्हा परदेशी पाहुणे येतात तेव्हा मंगोल लोक त्यांची सर्वात मौल्यवान वस्तू भेट देतात. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) सध्या मंगोलियात आहेत. राष्ट्रपतींनी त्यांना खास पांढरा घोडा भेट दिला आहे. त्याचे तेज पाहून राजनाथ यांनी त्याचे नाव ‘तेजस’ ठेवलं आहे.

मंगोलियाचे राष्ट्रपती, राजनाथ सिंह यांना घोड्यावर बसवताना दिसले. सोशल मिडीयावर व्हायर झालेल्या त्या छायाचित्रात पारंपरिक पेहरावात दिसणारा एक मंगोलियन माणूस घोडा घेऊन आला होता. त्याचा पोशाख चंगेज खानच्या काळातील पोशाखासारखाच होता. भारतातही बनवलेल्या पेंटिंगमध्ये चंगेज खान अशाच पोशाखात दाखवला आहे आणि घोडे मंगोलियन माणसांच्या मनामनात आहे. राजनाथसिंह यांनी ट्वीट करुन याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, “मंगोलियातील माझ्या खास मित्रांकडून खास भेट. मी या सुंदर घोड्याचे नाव ‘तेजस’ ठेवले आहे.” हे ट्वीट करत राजनाथ सिंह यांनी मंगोलियन राष्ट्राध्यक्ष अध्यक्ष खुरलसुख आणि मंगोलियाचे आभार मानले.

नेहरुंपासून मोदींपर्यंत सर्वांना मंगोलियन घोडे भेट देण्यात आलेत

मंगोलियाचे नाव विशेषतः तिथल्या जातीच्या घोड्यांवरून चर्चेत आहे. २०१५ मध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगोलियाला गेले होते तेव्हा त्यांच्या समकक्ष नेत्याने त्यांना तपकिरी घोडा भेट दिला होता. भारत आणि मंगोलिया यांच्यातील मैत्रीत घोडे महत्त्वाची भूमिका बजावतात. संयुक्त टपाल तिकिटात घोड्यालाही स्थान देण्यात आलं. अनेकदा नेहरू यांना भेट दिलेल्या मंगोलियातील घोड्यासह छायाचित्रात पहायला मिळाले. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनाही मंगोलियन घोडे भेट म्हणून मिळाले होते. ती १९५८ सालची गोष्ट आहे, त्यावर्षी १६ डिसेंबरला मंगोलियन घोड्यासोबत चाचा नेहरूंचा फोटो नेहमी व्हायरल होतो. मंगोलियाच्या तत्कालीन राष्ट्रप्रमुखांनी नेहरूंना तीन मंगोल घोडे भेट दिले होते.

मंगोल सैन्याची ताकद होते मंगोलियन घोडे

चंगेज खानच्या काळापासून, मंगोल घोडे जगातील सर्वोत्तम घोड्यांपैकी एक मानले जातात. त्यांच्याबद्दल प्रसिद्ध गोष्ट म्हणजे या घोड्यांवर बसून जग जिंकणं सोप्प आहे. मंगोलांचं विस्तृत साम्राज्य याची साक्ष देतं. मंगोल अन्न, पाणी, प्रवास, शूज, चिलखत,खेळ, संगीत, शिकार, मनोरंजन, आध्यात्मिक शक्ती यासाठी त्यांच्या घोड्यावर अवलंबून असतात. मंगोल घोड्यांना कमी पाणी लागतं आणि युरोपियन जातीच्या घोड्यांपेक्षा कमी दैनंदिन अन्नधान्यावर ते गुजारा करतात , अत्यंत ‘स्वामीनिष्ठ’ अशी त्यांची ओळख आहे.

सिंधू नदी पार करू शकले नाही,

आता चंगेज खान या मंगोल शासकाबद्दल असं बोललं जातं की त्याचे सैनिक ज्या वाटेने जात असत त्या रस्त्यावर मृतदेहांचा ढीग साचलेला असतो. चंगेज खाननं ख्वारिज्मी साम्राज्य उद्ध्वस्त केलं. मोहम्मद शाहचा उत्तराधिकारी जलालुद्दीन आपला जीव वाचवण्यासाठी भारताकडे धावला तेव्हा चंगेज त्याच्या मागे गेला पण सिंधू नदीपर्यंत थांबला. सिंधू नदी पार करून ‘सोने की चिडिया’ भारतावर हल्ला करण्याचा विचार त्याने का केला नाही? या प्रश्नावर इतिहासकार वेगवेगळी कारणं देतात. त्यावेळी मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चौहानाचा पराभव करून बरीच लूटमार केली होती.असं मानले जाते की चंगेजचे सैन्य आणि त्याचे घोडे थकले होते. हवामान आणि भारतातील विपरीत राजकीय परिस्थिती याचे आकलन असल्याने चंगेज खानची हिम्मत झाली नाही असे देखील म्हटले जाते.

मंगोल घोड्यांनी सिंधू पार केली नसेल पण आमच्या भीमथडी जनावराने ( घोड्याने ) मात्र सह्याद्री पासून सिंधूतीरा पर्यंतचा अत्यंत बिकट असा प्रवास केला होता.

भारतावर प्रभाव

त्यावेळी दिल्लीचा सुलतान इल्तुतमिश होता. चंगेज खान आणि त्याच्या सैन्यानं भारतात प्रवेश केला नसेल पण त्याच्या आक्रमणांमुळे अनेक इस्लामी विद्वान, कवी, इतिहासकार, सुफी भारताकडे वळले आणि आश्रय घेतला. जलालुद्दीन खिलजीच्या काळात अनेक मंगोल लोक दिल्लीत स्थायिक झाले होते. मंगोलपुरी हे नाव आज त्याची आठवण करून देते.

Back to top button