News

‘झूम’चा दम….आतंकवादी खतम

दोन गोळ्या लागूनही निकराने लढत राहिला लष्कराचा हा श्वान

{जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सोमवारी सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचा एक प्रशिक्षित कुत्रा गंभीर जखमी झाला. खरं तर, रविवारी रात्री उशिरा दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील तंगपावा भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर कारवाई सुरू करण्यात आली. या शोध मोहिमेत लष्कराने आपला प्रशिक्षित कुत्रा ‘झूम’ (zoom) याला शोध मोहिमेसाठी सोबत घेतले. यावेळी दहशतवादी लपलेल्या घरात घुसून झूमने दहशतवाद्यांवर हल्ला केला. दरम्यान झटापटीत झूमला दोन गोळ्या लागल्या आणि तो गंभीर जखमी झाला.झूम पूर्वीही अनेक सक्रिय मोहिमांचा एक भाग होता.या धाडसी कुत्र्याला लष्कराच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.झूमला दहशतवाद्यांना शोधून त्यांचा खात्मा करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या चकमकीत लष्कर-ए तैयबाचे दोन दहशतवादी ठार झाले, आणि दोन जवानही जखमी झाले आहेत.}

सैनिक आणि त्यांच्या श्वानांमध्ये खूपच जिव्हाळ्याचं नातं असतं. युद्धभूमी असो वा दहशतवादी घुसखोरी, बॉम्ब डिफ्यूझिंग किंवा सर्जिकल स्ट्राइक,सगळीकडे हे ‘कूल ब्रेव्हर’ जीव स्वतःला सिद्ध करतात. या प्रशिक्षित श्वानांना शत्रूसोबत कसं लढायचं हे माहिती असते. ते बचाव कार्यातही मदत करतात.कुत्रा म्हटलं की पहिल्यांदा समोर येते ती त्याची इमानदारी, प्रामाणिकपणा.लष्कराचे कुत्रे सैनिकांप्रमाणेच काम करतात.भारतीय लष्कर या कुत्र्यांना खास ट्रेनिंग देत.बाँब हुंगणे आणि धोका ओळखण्याची त्यांची क्षमता वाढवली जाते.भारतीय सैन्याकडे जास्तीत जास्त लॅब्राडॉर,जर्मन शेफर्ड, बेल्जियन शेफर्ड हे कुत्रे आहेत.’डॉग स्क्वॉड’ चा वापर लष्कर विस्फोटक पदार्थ तसेच ते भूसुरुंग किंवा बॉम्ब शोधण्यात मदत करतात.कुत्रे अशा ठिकाणी जाऊन शोध घेऊ शकतात, जिथे सैनिक पोचू शकत नाही.लष्करी कुत्र्यांचे मुख्य काम शोध आणि बचाव हे आहे. ‘डॉग स्क्वॉड’ ने आपली जबाबदारी पार पाडली नाही तर अनेक लष्करी मोहिमा धोक्यात येतील इतकं त्यांचे काम महत्वपूर्ण आहे.आणि मुख्य म्हणजे या धाडसी कुत्र्यांमुळे पुष्कळ जवानांचे प्राण वाचले आहेत.

डॉग युनिटमध्ये सामील होण्यासाठी, सखोल लष्करी प्रशिक्षण घ्यावे लागते. प्रत्येक कुत्र्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आज्ञा दिल्या जातात. त्यांना वेगवेगळ्या परिस्थितीत भुंकण्याचे आणि वेगवेगळे आवाज काढण्याचे प्रशिक्षण दिले जाते. यासोबतच शत्रूचा ठावठिकाणा शोधण्याचे प्रशिक्षण दिले जाते.लष्कराच्या श्वान पथकाने २०१६ च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये प्रथमच भाग घेतला होता. Remount Veterinary Corps सेंटर आणि कॉलेज मेरठ कॅंटमध्ये या कुत्र्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले जाते.लष्कराकडे असे १०००प्रशिक्षित श्वान आहेत, त्यांचे आरोग्य, संख्या हाताळण्याची जबाबदारी Remount Veterinary Corps (RVC) वर सोपवण्यात आली आहे.

याच वर्षी ३० जुलै रोजी जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात लष्कराच्या स्निफर डॉग ‘एक्सल’ला दहशतवादविरोधी मोहिमेत वीर मरण आले होते. भारतीय सैनिक त्यांना कुत्रा समजत नाही तर एक लढवय्या सैनिकच समजतात त्यांना शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातात.एक्सेलला यंदाच्या शौर्य पुरस्कारांमध्ये ‘मेन्शन-इन-डिस्पॅच’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

स्वदेशी ‘मुधोळ’ हाऊंड

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) देण्यात येणाऱ्या SPG सुरक्षाव्यवस्थेतील श्वान पथकात आता मुधोळचे श्वान समाविष्ट करण्यात आले आहे. मुधोळ हाऊंड्स (Mudhol Hounds) नावाने कुत्र्यांची ही जात सुप्रसिद्ध आहे. मुधोळ हाऊंड हे आधीच भारतीय हवाई दल आणि इतर सरकारी विभागात सेवा देत आहेत परंतु आता पंतप्रधानांच्या सुरक्षा दलात (Security Force) त्यांचा समावेश झाला आहे.

आज स्वतंत्र होवून जवळपास ७५ वर्षे झाली तरी जम्मू-काश्मिरातील आतंकवाद अधून मधून डोके वर काढतच असतो, या आतंकवादामुळे लाखों निष्पाप नागरिक आणि जवानांचे प्राण गेले आहेत. कलम ३७० रद्द केल्यामुळे आतंकवादाला बरीच वेसण बसली आहे. तरीही पाकिस्तानचे छुपे समर्थक,दहशदवादी अश्या भ्याड कारवाया करतच असतात.काश्मिरातील मोठ्या प्रमाणावर होत असलेला विकासाने पाकिस्तान नामोहरम झाला आहे.

आपण हनुमंताप्रमाणे बालाकोट एअर स्ट्राईक करून पाकिस्तानला सळो की पळो करून सोडले होते. १९७१ च्या युद्धानंतर पहिल्यांदा भारताकडून पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करण्यात आला होता. बालाकोट हवाई हल्ल्यात जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांचे कॅम्प उद्ध्वस्त करण्यात आले होते. या हल्ल्यानंतर पाकिस्तानचा थरकाप उडाला होता. बालाकोट एअर स्ट्राईक पाकिस्तानला विसरू न देणे ही आपली जबाबदारी आहे

आतंकवादी,जिहादी आणि त्यांना पोसणार्यांनी हे सदैव ध्यानी ठेवावे की भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची प्रचंड मोठी किंमत चुकवावी लागेल. तुम्हाला आमचे कुत्रेच पुरेसे आहेत हे सदैव याद ठेवावे.गरिबी,भूकमरी आणि आता पुराच्या नावावर संपूर्ण जगात भीक मागणार्यांनी आम्हाला डिवचू नये,नाहीतर त्याचा परिणाम म्हणजे पाकिस्तान नावाचा देश या जगाच्या नकाशावरून कायमचा नाहीसा झालेला दिसेल.

Back to top button