News

… यह तो बस शुरुआत है !

२० वर्षांत प्रथमच दिवाळी आठवड्यात रोख चलन वापरात घट:- SBI रिपोर्ट

दिवाळी सण आनंदाचा,उत्सवाचा,प्रेमाचा आणि डिजिटल पेमेन्टचा असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

{२००२ नंतर प्रथमच म्हणजे तब्बल २० वर्षांनंतर दिवाळीच्या आठवड्यात चलनात असलेल्या रोख चलन वापरात घट झाली आहे, असे SBI Ecowrap च्या अहवालात म्हटले आहे. तथापि, आर्थिक मंदीमुळे २००९ मध्ये याच कालावधीत दिसलेली किरकोळ वाढ वगळता,रोख चलन वापरात वाढच होत राहिली होती.}

“भारतीय अर्थव्यवस्थेत संरचनात्मक परिवर्तन होत आहे. तंत्रज्ञानातील नवनवीन शोधांमुळे भारतीय पेमेंट प्रणाली आता बदलली आहे.वर्षानुवर्षे, भारतीय रोख-चलनाची अर्थव्यवस्था आता स्मार्टफोनच्या नेतृत्वाखालील डिजिटल पेमेंट इकॉनॉमीमध्ये बदलली आहे,” SBI अहवालात म्हटले आहे की, हा एक उल्लेखनीय विकास प्रवाह आहे.

भारत किती झपाट्याने बदलतोय, याचा अंदाज तुम्हाला अनेक गोष्टींमधून येऊ शकतो, याच बदलांची साक्ष म्हणजे डिजिटल पेमेंट सिस्टिम (Digital Payment) ही आहे. वर्ष २०१३-१४ मध्ये डिजिटल पेमेंट सिस्टिमचा भारतात फारसा प्रसार झाला नव्हता. मात्र २०१४ साली भारतात नवे,कार्यक्षम सरकार स्थापन झाले आणि डिजिटल पेमेंटमध्ये मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळाले.पूर्वी भारतात जे आर्थिक व्यवहार व्हायचे त्यातील अनेक आर्थिक व्यवहार किंवा पैशांची देवणा-घेवाण ही चेक किंवा रोखीच्या स्वरुपात व्हायची तेव्हापण ई-पेमेंटचा (E-payment) पर्याय उपलब्ध होता. मात्र त्याचा उपयोग फार थोडे लोक करत होते. २०१३-१४ च्या आकडेवारीवर नजर टाकल्यास आपल्याला असे दिसून येते की, आर्थिक वर्षात एकूण २२० कोटी रुपयांचेच आर्थिक व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने झाले होते. रोख पद्धतीने करण्यात येणाऱ्या पैशांच्या देवाण-घेवाणीमुळे टॅक्सची चोरी वाढते. त्यामुळेच केंद्रात सत्तेत येताच भारत सरकारने जास्तीत जास्त व्यवहार हे डिजिटल पद्धतीने कसे होतील यावर भर दिला.

आज जवळपास भारतातील एक मोठा वर्ग पैशांच्या देवण घेवाणीसाठी डिजिटल पेमेंट पद्धतीचाच वापर करत आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका राहिली ती म्हणजे स्मार्ट फोनची,स्मार्ट फोनमुळे ऑनलाईन पद्धतीने पैशांचे व्यवहार करणे अधिक सोपे झाले. पैशांचे डिजिटल व्यवहार वाढल्यामुळे टॅक्स चोरीला मोठ्याप्रमाणात आळा बसला. याच बरोबर सर्वसामान्य जनतेचे ४५ कोटी जनधन खाते उघडण्यात करण्यात आले(७० वर्ष लागली खाते उघडायला ) या जनधन बँक खात्यांमुळे डिजिटल पेमेंट सिस्टिम अधिक मजबूत झाली. २०२०-२१ च्या आकडेवारीवर नजर टाकल्यास या आर्थिक वर्षात जवळपास ५,५५४कोटी रुपयांचे व्यवहार हे डिजिटल मार्गाने झाले आहेत. तर २०२१-२२ मध्ये हाच आकडा वाढून ७,८९०कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

भारतामध्ये डिजिटल पेमेंटचा एवढ्या वेगाने प्रसार होत आहे की, आर्थिक वर्ष २०२० – २०२१ मध्ये भारताने चीन, दक्षिण कोरिया आणि अमेरिका सारख्या देशांना देखील डिजिटल व्यवहारांमध्ये कधीच मागे टाकले आहे. २०२० मध्ये भारतात चीनच्या २५.४ बिलियनच्या तुलनेत ३०.५ बिलियन डिजिटल व्यवहार झाला आहे. गेल्या वर्षी भारतात झालेल्या डिजिटल व्यवहारांचे प्रमाण हे चीनच्या २.६पटीने अधिक होते. तज्ज्ञांच्या मते २०२५ पर्यंत भारतात जवळपास ७१.७ टक्के पैशांचे व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने होऊ शकतात. सध्या पैशांचे व्यवहार हे युपीआय यूनिफाइड पेमेंट इंटरफेसच्या माध्यमातून होत आहे.ज्याची सुरुवात भारत सरकारने २०१६ मध्ये केली होती.

एखादी वस्तू विकत घ्यायची असेल तर खिशातून कॅश काढून देण्याचे दिवस आता मागे पडतायत. आपण फोन काढतो, कोड स्कॅन करतो आणि झालं पेमेंट.

UPI, इंटरनेट बँकिंगचा वापर देशात वाढत चाललाय.२०१६ मध्ये डिजिटल पेमेंट ११% असताना, २०२२ मध्ये ते ८०% पर्यंत पोहोचले. २० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच, लोकांनी स्मार्टफोनच्या माध्यमातून जास्त पैसे भरल्यामुळे दिवाळीतही बाजारात रोखीचा ओघ वाढला नाही.जेथे १६% यूपीआयद्वारे, १२% आयएमपीएसद्वारे आणि १% ई-वॉलेटद्वारे होते. ५५% पेमेंट एनईएफटीद्वारे केले. या वर्षी ऑक्टोबरमध्येच यूपीआयद्वारे १२ लाख कोटी रुपये भरण्यात आले. एसबीआयच्या अहवालात असे भाकीत केले आहे की २०२७ पर्यंत देशातील केवळ १२% व्यवहार रोखीने होतील.

८८% व्यवहार विविध माध्यमातून ऑनलाइन होतील. सरकार आणि आरबीआय दोघांसाठी ही परिस्थिती चांगली आहे. यामुळे चलन छपाई आणि चलनाचा खर्च कमी होईल. जेथे क्रेडिट-डेबिट कार्ड पेमेंट गेल्या ६ वर्षांत वाढलेले नाही, त्याच ६ वर्षांत चेकद्वारे पेमेंट ४६% वरून १२.७% वर आले आहे.

रिझर्व्ह बँकेने ‘डिजिटल रूपी’ हे नवं डिजिटल चलन लागू केलं आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहाराचं एक नवं माध्यम उपलब्ध झालं आहे.

बिटकॉईन, इथिरियम, रिपल, लाईटकॉईन ही नावं तुम्ही ऐकली असतील. ही सगळी क्रिप्टो चलनं म्हणजे क्रिप्टोकरन्सीची रूपं आहेत.क्रिप्टोकरन्सी हे डिजिटल चलन कुठल्याही केंद्रीय बँक किंवा सरकारच्या नियंत्रणाशिवाय जगभरात एकाच पातळीवर मॅनेज केलं जातं. त्यासाठी डिस्ट्रिब्युटेड लेजर आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.पण दुसरीकडे बेकायदेशीर किंवा छुप्या व्यवहारांसाठीही त्याचा वापर केला जाऊ शकतो.एका बिटकॉईनचं मूल्य लाखोत असतं आणि कधीही वरखाली होऊ शकतं.ही अनिश्चितता टाळण्यासाठीच डिजिटल रुपीसारखी चलनं आणली जात आहेत.

वरील विवेचनावरून आपल्या लक्षात आलेच असेल की, भारत आता डिजिटल होतोय.लिबरल,सरकारविरोधी लोकांनी “डिजिटल इंडिया” या मोहिमेवर मोठ्याप्रमाणात आगपाखड केली होती. पण भारत राष्ट्राने आता पुढे जायचे ठरवले आहे. त्यास रोखणार तो कोण… ?

विश्वगुरू भारताची ही तर फक्त सुरुवात…

Back to top button