News

Business is always business !.. रशिया-युक्रेन युद्धात भारताची चांदी..

भारत रशिया कडून स्वस्तात तेल खरेदी करून अमेरिकेला विकतोय महागात

तब्बल २६० दिवसांपासून पासून रशिया (russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine ) युद्ध सुरू आहे. या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. या युद्धामुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे.अमेरिकेसारखे पाश्चात्य देश रशियाच्या विरोधात गेले आहेत. त्यांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. मात्र, पाश्चात्य देशांनाही या निर्बंधांचा मोठा फटका बसत आहे.सध्या भारत अमेरिकेला व्हॅक्यूम गॅस ऑइल( vacuum gas oil) निर्यात करत आहे.तुम्हाला वाचून धक्काच बसला असेल खरंतर आपला देश कायमच तेल आयात करणारा देश आहे त्यासाठी मोठया प्रमाणात परकीय गंगाजळी आपल्याला खर्च करावी लागते,आणि महत्वाचे म्हणजे, हे व्हॅक्यूम गॅस ऑइल भारताने रशियाकडून स्वस्त दरात खरेदी केले असून, ते अमेरिकेला महागड्या दरात विकत आहे, यातून नफाही कमवतोय.One man’s loss is another man’s gain हे आता आपण अमेरिकेला शिकवावे का ?

पाश्चात्य देशांना युद्ध काळात रशियाला पर्याय हवा आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर, अमेरिका आणि कॅनडाने रशियन तेल आयातीवर निर्बंध लादले. रशियन कच्च्या तेलाच्या उत्पादनांच्या आयातीवर युरोपीयन संघाने देखील आयातीवर निर्बंध लादले.त्यामुळे यूरोपात (Europe) आणि अमेरिकेत तेलाचे भाव ४०% ने वधारले आहेत, पर्यायाने महागाई प्रचंड वाढली आहे.

भारत हा तेलाची आयात करणारा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. सध्या भारत रशियाकडून पूर्वीच्या तुलनेत फारच मोठया प्रमाणावर तेलाची खरेदी करतोय आणि पेट्रोलियम उत्पादने (product) मात्र अधिक मार्जिनने पाश्चात्य देशांना एक्सपोर्ट करत आहे.

आंतरराष्ट्रीय राजकारणात राष्ट्र प्रथम (nation first) हेच तत्व अंगिकारले जाते. अलिप्तते चे धोरण एकतर्फी स्वीकारल्यामुळे आपले आंतरराष्ट्रीय राजकारणात अतोनात नुकसान झाले.राष्ट्र सर्वोपरी मानणारे सरकार स्थापन झाल्यापासून आपला राष्ट्रीय स्वाभिमान जागा झाला आहे.

जो पर्यंत तुम्ही बलशाली होत नाही तोपर्यंत जगात तुम्हाला कोणीही किंमत देत नाही.

व्हॅक्यूम गॅस ऑईल (vgo ) म्हणजे काय ?

व्हीजीओ हा खनिज तेलाचा एक प्रकार आहे.पेट्रोल आणि डिझेल सारख्या इतर उत्पादनांच्या उत्पादनासाठी VGO चा वापर मुख्यतः रिफायनरी फीडस्टॉक म्हणून केला जातो.

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, ग्लोबल ऑईल ट्रेडर्स Vitol आणि Trafigura नं भारतीय रिफायनिरी नायरा एनर्जीकडून ( Nayara Energy) १० ते १५ डॉलर प्रति बॅरलच्या दरानं व्हॅक्यूम गॅस ऑईलची (VGO) खरेदी केली आहे, हे तेल भारताच्या वादिनार बंदरातून डिसेंबरमध्ये अमेरिकेला जाईल. यापूर्वी, Aframax tanker Shanghai Dawn नं रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जामनगर तेलशुद्धीकरण कारखान्यातून ८० हजार टन व्हीजीओ खरेदी केलं होतं. हा साठा ऑक्टबरच्या शेवटी अमेरिकेला पोहोचला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भारतानं अमेरिकेला पुरवठा केलेल्या व्हीजीओचं प्रमाण खूप जास्त आहे.

अमेरिकेत स्वतःचे शेल ऑइल मोठया प्रमाणावर उपलब्ध आहे पण चुकीच्या धोरणामुळे ते सगळेच मुसळ केरात गेले आहे. त्यात युद्धामुळे अजूनच अडचण झाली आहे. समस्त जगाचे निर्बंध झूगारून भारताने रशियाकडून ऑइल खरेदी केली आहे,त्यामुळे भारतात तेलाचे दर स्थिर आहेत.भारत सरकारने प्रयत्नपूर्वक महागाईवर नियंत्रण ठेवले आहे.

धोरणात्मक निर्णय कश्या आणि कोणत्या नीतीने,रीतीने घ्यावे ? याचा अमेरिकेस विसर पडल्याची शंका येते..

“वक्त बदलते देर नही लगती” हे अमेरिकेने सदैव ध्यानी ठेवावे.. अन्यथा कपाळमोक्ष निश्चित..

Back to top button