छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष सांगणाऱ्या प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याला अफजल खानाच्या (afzal khan ) कबरीलगतचे अनधिकृत बांधकाम प्रशासनाने हटवले.हे अतिक्रमण हटवल्यानंतर या ठिकाणी अफजल खान कबरीसोबत अजून ३ कबरी आढळून आल्या आहेत. या कबरी नेमक्या कोणाच्या?त्या कधी बांधण्यात आल्या? याचे काही पुरावे आहेत का? याचे गूढ वाढले आहे.
आता या प्रकरणावरून देखील गलिच्छ राजकारणाला सुरवात झाली आहे, संभाजी ब्रिगेडने याला धार्मिक रंग देण्याचा चंग बांधला आहे. अफजल खान कबरी शेजारी सय्यद बंडा यांची कबर, सेवेकाऱ्याची कबर आणि एक कबर कृष्णाजी भास्करांची असल्याचे बिनडोक ब्रिगेडी सांगताहेत. त्याला कसलाही ऐतिहासिक पुरावा त्यांच्याकडे नाही. फक्त आपले राजकारण त्यांना साधायचे आहे. त्यामुळे ही कबर शिवकालीन नाही मग ही कबर नेमकी आहे तरी कोणाची आणि ही कधी बांधण्यात आली यांची माहिती प्रशासन जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.
ह्या कबरींमुळे उद्भवलेले काही प्रश्न :-
ह्या कबरी शिवकालीन नाही मग ह्या कबरी नेमक्या बांधल्या कधी ? आणि कोणी ?
मूळ कबरीच्या आजूबाजूला दुसऱ्या कोणत्याही कबरी नसताना आताच या कबरी कुठून उपटल्या ?
या मागे धर्मांध मुस्लिमांचे काही कारस्थान तर नाही ना ?
स्थानिक ग्रामस्थांनी यांनी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कारवाईचे स्वागत केले आहे. ते म्हणाले की, प्रशासनाने जे काही अनधिकृत बांधकाम होते ते काढले ती चांगली गोष्ट आहे. खूप वर्षांपासून अतिक्रमणाचे हे भिजत घोंगडे पडले होते.अतिक्रमण काढताना ज्या दोन कबरी आढळून आलेल्या आहेत. त्या कोणाच्या आहेत याबाबत माहिती मिळणे गरजेचे आहे. अफजल खानाच्या भक्तांकडून या याठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात उरूस केला जात होता. खूप वर्षांपासून याचे उदात्तीकरण चालले होते. हे प्रशासनाने थांबवले ही चांगलीच गोष्ट आहे.
प्रशासनाने केलेल्या कारवाईबाबत जिल्हाधिकारी रुचेल जयवंशी यांनीही माहिती दिली. ते म्हणाले की, “अफजलखानाच्या कबरी जवळ एकाच खोलीत आणखी तीन कबरी सापडल्या आहेत.एक कबर सय्यद बंडाची असल्याचे सांगितले जात आहे.अन्य दोन कबरी अनोळखी असून त्या कोणी आणि कधी बांधल्या याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे. या कबरीचे कुठलेही प्रकारचे नुकसान न करता अनाधिकृत बांधकाम हटवण्यात आले” असल्याचे जयवंशी यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला या कबरीच्या आजूबाजूला असलेले जे अतिक्रमण काढले आहे त्याचा अहवाल मागितला आहे. हा अहवाल देते वेळी प्रशासनाला या दोन नव्याने सापडलेल्या कबरी बाबत सुद्धा माहिती द्यावी लागणार आहे. त्यामुळे सातारा जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी मात्र वाढली आहे.प्रशासनाने स्थानिकांच्या सहकार्याने काम केल्यास अश्या अनेक अनधिकृत मजारी,दर्गे, मशिदी आपल्याला हटवता येतील.गरज आहे ती फक्त हिंदूंनी सजग राहण्याची..
समस्त देशांत अश्या अतिक्रमणाच्या घटना सोशल मीडिया मुळे उजेडात येत आहे. संघटित धर्मांध मुस्लिम संघटना मुद्दाम प्राचीन मंदिरांभोवती,ऐतिहासिक स्थळांभोवती,गडकिल्ले आता तर अगदी रेल्वे स्टेशन,बसस्टॅण्ड,समुद्रकिनारपट्टीच्या आजू-बाजूला अनधिकृत मजारी, दर्गे,मशिदी बांधत आहे.आज आपण या विरोधात आवाज नाही उठवला तर भविष्य काळ फार कठीण आहे
मुस्लिम कट्टरपंथीयांनां देशात अराजक माजवायचे आहे,त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची मानसिकता आहे. नुपूर शर्मा प्रकरण आपल्याला आठवते ना? आपल्या सवयी नुसार आपण विसरतो आणि त्याचाच फायदा हे देशविरोधी उचलतात.
समर्थ म्हणतात ना…
सावध चित्ते शोधावे, शोधोनी अचूक वेचावे !
वेचोनी उपयोगावे, ज्ञान काही !!
अखंड सावधान असावे ! दुश्चित कदापी नसावे !
तजविजा करीत बैसावे ! येकान्त स्थळी !!
आपल्या संस्कृतीचे रक्षण आपण नाही करणार तर मग कोण करेल ?
हर हर महादेव…