विकास नको (अ)धर्म हवा…
चर्चच्या जमावाचा पोलिसांवर हिंसक हल्ला; छत्तीस पोलीस जखमी
भारताच्या एकूण बेरोजगारी दरापेक्षा केरळचा बेरोजगारी दर पुष्कळ अधिक आहे. तेथे साक्षरता १०० प्रतिशत असली, तरी उद्योगधंदे अत्यल्प आहेत; कारण एखादा उद्योग चालू झाला की, लगेचच तेथे कम्युनिस्ट पार्टीच्या नावाच्या युनियनचे झेंडे लागतात. ‘काम कमी आणि मागण्या अधिक’ अशी त्यांची गुंडशाही असते.अशा स्थितीत उद्योग उभे राहतील तरी कसे ? त्यामुळे शिकलेल्या केरळवासियांना नोकर्या मिळत नाहीत. बहुतांश शिकलेले केरळी लोक आखाती (gulf) देशांमध्ये नोकर्या स्वीकारतात. आखाती देशांमध्ये केरळी लोक प्रामुख्याने परिचारिका (nurse), स्टेनोग्राफर (stenographer )वाहनचालक (driver), तंत्रज्ञ (technical skilled labor) ही कामे करतात. त्यांचा विदेशी प्रवास सुलभ व्हावा यासाठी छोट्याशा केरळमध्ये ४ आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत.
केरळमधील लॅटिन कॅथोलिक चर्चच्या नेतृत्वाखाली ख्रिश्चनांच्या जमावाने रविवारी (२७ ऑक्टोबर २०२२) रात्री उशिरा विझिंजम पोलिस स्टेशनवर हल्ला केला. या घटनेत ३६ पोलीस जखमी झाले आहेत.अदानी समूहाकडून बंदराचे कामकाज सुरु होते,त्या विरोधात परिसरात हिंसक निदर्शने सुरू होती, त्यानंतर पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतले होते. पोलिसांच्या या कारवाईनंतर पोलीस स्टेशनवर दगड-काठ्याने हल्ला करण्यात आला.समोर आलेल्या व्हिडीओमध्ये, बेकायदेशीर जमाव कसा लाठ्या मारत आहे आणि स्टेशनसमोर ठिकठिकाणी दगडफेक करत आहे. एका हिंदी दैनिकाच्या वृत्तानुसार, या जमावाने पोलिसांना जखमी केले. यासह पोलिसांच्या अंदाजे १४ जीप, ८ व्हॅन आणि ३० मोटारसायकलींचेही नुकसान झाले.सोबतच पोलीसस्टेशन मधील काही फर्निचर व कागदपत्रांचीही नासधूस करण्यात आल्याची माहिती मिळते.
पोलिसांचे म्हणणे काय ?
एडीजी म्हणाले की, “गेल्या १२० दिवसांहून अधिक काळ निदर्शनं सुरू आहेत. आम्ही जास्तीत जास्त संयम दाखवला. पण रविवारी जमावानं पोलीस स्टेशनची तोडफोड केली आणि अधिकाऱ्यांवर हल्ला केला.” परिसरातील संवेदनशील परिस्थिती लक्षात घेता केरळ सरकारनं लष्कराला पाचारण केले आहे.
माध्यमांच्या प्रतिनिधींवरही हल्ला
आंदोलकांनी केरळमधील स्थानिक चॅनल ‘ACV’ शेरीफ एम जॉन यांच्या कॅमेरामनवरही हल्ला केला आणि त्यांच्या कॅमेराचं नुकसान केलं. त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. सध्या कॅमेरामन शेरीफ एम जॉन यांना तिरुअनंतपुरम मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
फादरविरुद्ध तक्रार दाखल
केरळ उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही विझिंजममध्ये सुरू असलेला अदानी समूहाचा प्रकल्प थांबवण्यासाठी आंदोलकांनी बंदर बांधकाम साहित्य घेऊन जाणाऱ्या वाहनांचा मार्ग अडवला. रविवारी याप्रकरणी १५ फादर (धर्मगुरू) विरोधात तक्रार करण्यात आली. त्यांच्यामध्ये आर्चबिशप थॉमस जे. नेट्टो, फादर क्रिस्टुदास, फादर यूजीन परेरा यांच्यासह अनेक लोक होते. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी २०० हून अधिक अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत.
अदानी समूहाकडून बंदर बांधले जात आहे
अदानी समूहाकडून सुरू असलेल्या बंदराचे बांधकाम न्यायालयाच्या निर्णयानंतर करण्यात येत आहे. मात्र, तब्बल १२० दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे येथे योग्य पद्धतीने काम होत नाही. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, त्यांनी उच्च न्यायालयातही निर्णय घेतला असून त्यांच्या बाजूने निर्णय आला आहे.न्यायालयाने कंपनीला काम सुरू करण्यास सांगितले. पण धर्मगुरूंच्या नेतृत्वाखाली अनेक ख्रिश्चन त्यांचा मार्ग अडवत राहिले. या बंदराच्या उभारणीमुळे त्यांच्या रोजगारावर परिणाम होणार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे, तर न्यायालयाने सर्व युक्तिवाद ऐकून घेत प्रकल्पाचे काम कोणत्याही परिस्थितीत स्थगित करता येणार नाही, असा निर्णय दिला आहे.
आज ३५ लाख केरळी लोक आखाती देशांत रहातात. त्यांच्यामुळे परकीय उत्पन्न केरळ राज्याला मिळते आणि तेथील अर्थव्यवस्था चालते. उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात नसूनही केरळ परकीय उत्पन्नाच्या भरवशावर या राज्याची अर्थव्यवस्था टिकून आहे. त्यात केरळच्या कम्युनिस्टांचे योगदान शून्य आहे.
हमालांची गुंडगिरी
केरळ मधील मोठ्या शहरांमध्ये सर्वत्र निळे वस्त्र परिधान केलेले हमाल दिसतात. या लोकांना ‘नोक्कू कुली’ म्हणतात. कुठल्याही प्रकारच्या ट्रक मधील सामान उतरवायचे असेल, तर त्यांनाच बोलवावे लागते. किंवा आपण स्वतःहून उतरवणार असू, तरी त्यांना त्यांचे मोल द्यावे लागते. मालकाने त्यांना पाहिले, तरी त्यांचे मूल्य ते जे मागतील, ते देण्याची ‘कम्युनिस्ट’ कुप्रथा तेथे आहे. अनेक सुशिक्षित तरुण मुलांची चौकडी निळ्या रंगाचा कुलीचा ड्रेस घालून शहरात फिरत आणि खंडणी वसुल करत असतात. कम्युनिस्ट पक्षाचे संरक्षण असल्याने कुणीही त्यांना विरोध करत नाही. कम्युनिस्टांचे राज्य कसे असते, याचे हे ज्वलंत उदाहरण आहे..
केरळमध्ये सत्ताप्राप्तीसाठी अल्पसंख्यांकांना म्हणजेच मुस्लिमांना आणि ख्रिश्चनांना चुचकारणे अपरिहार्य होऊन बसले आहे, साम्यवाद्यांनी हे गणित बरोबर ओळखले आहे. त्यामुळे अल्पसंख्यांकांच्या धार्मिक संस्थांना हाताशी धरून साम्यवादी पक्ष स्वतःचा स्वार्थ साध्य करतात. धार्मिक संस्थांच्या ‘उपकारां’ची परतफेड म्हणून चर्च आणि चर्चप्रणीत धार्मिक संस्थांनी, त्यांच्या प्रमुखांनी केलेल्या कुकृत्यांविषयी मूग गिळून गप्प बसणे किंवा त्यांचे छुपे समर्थन करणे हे प्रकार ओघाने आलेच.
चर्चमध्ये चालणारा अनागोंदी कारभार, अनाचार, पाद्र्यांकडून होणारे लैंगिक शोषण आणि सर्रास होणारी हिंदूंची कत्तल यांविषयी ठाऊक असूनही साम्यवादी सरकार मूग गिळून गप्प आहे, फक्त आणि फक्त “सत्तासुखासाठी”..