City of lights or…riots ?
पॅरिसच्या वैभवाला उतरती कळा…
आठवड्याभरात दोनदा भीषण दंगल
फुटबॉल वर्ल्डकप आणि हार
हार पचवायलाही मोठी ताकद लागते पण सगळ्यांनाच ते जमते असे नाही. मुळातच फ्रान्सची टीम अर्जंटिना विरुद्ध कमी मोरक्को विरुद्धच जास्त लढत होती. अर्जेंटिना कडून झालेल्या पराभवानंतर मोरक्कन मुसलमानांनी पॅरिस मध्ये जल्लोष साजरा केला. कारण फक्त एकच फ्रान्सचा झालेला पराभव त्यामुळे सहाजिकच पॅरिस मधील नागरिक( ख्रिश्चन ) विरुद्ध मोरक्कन मुसलमान असा संघर्ष पॅरिस मध्ये झाला.त्यात सरकारी संपत्तीचे मोठे नुकसान झाले.
झाले असे की , फिफा(fifa) विश्वचषक फायनल पाहण्यासाठी फ्रान्सच्या (france) विविध शहरांमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. येथे मोठ्या पडद्यावर विश्वचषकाचा अंतिम सामना पाहिला जात होता. सामन्याचे वातावरण जसेजसे अधिक रोमहर्षक होत होते, तसेतसे चाहत्यांच्या काळजाचे ठोकेही वाढत होते. मात्र पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सला पराभवाला सामोरे जावे लागताच चाहत्यांचा संयम सुटला अन् परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.पॅरिसमध्ये मोरोक्कोच्या समर्थकांनी आनंदउत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तेथे फ्रान्स समर्थक आणि मोरोक्को समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी सुरु झाली,त्यानंतर विविध शहरांतून हिंसाचाराच्या बातम्या समोर येऊ लागल्या.
पॅरिसशिवाय(paris) लायनमध्ये पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, चाहत्यांनी वाहने पेटवली आणि जोरदार राडा घातला. फ्रान्सच्या वेगवेगळ्या शहरांमधून काही व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत. ज्यात लोक गाड्यांची तोडफोड करताना आणि त्यांना आग लावताना दिसत आहेत. पॅरिसमध्ये आधीच मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते, मात्र त्याचा कोणताही परिणाम दिसून आला नाही.
मोरोक्को आणि फ्रान्स संबंध :-
मोरोक्को (morocco)भौगोलिक दृष्ट्या महत्वाचा आहे कारण.अटलांटिक महासागर व भूमध्य समुद्र ह्या दोन्हींवर किनारे असलेला मोरोक्को हा फ्रान्स व स्पेन व्यतिरिक्त एकमेव देश आहे.मोरोक्कोचा समुद्रकिनारा अटलांटिक महासागरापासून भूमध्य समुद्रापर्यंत पसरला असून जिब्राल्टरची सामुद्रधुनी ह्या दोन समुद्रांना जोडते व मोरोक्कोला स्पेनपासून वेगळे करते.त्यामुळेच मोरोक्कोवर अधिसत्ता असणे यूरोपच्या व्यापारी सत्त्तांना आवश्यक होते.
मोरोक्को हा आफ्रिका आणि यूरोप तसेच अरब लोक आणि कृष्णवर्णीय आफ्रिकी यांच्यातील सांस्कृतिक आदान–प्रदानाचा देश म्हणता येईल. बर्बर जमातीचे लोक हे येथील मूळचे रहिवासी. फ्रेच आणि स्पॅनिश वसाहतींचा कालखंड मोरोक्कोच्या इतिहासात महत्त्वाचा आहे. फ्रान्सने अल्जीरिया आधीच ताब्यात घेतला होता. मोरोक्कोतील अंतर्गत संघर्षाचा फायदा घेऊन फ्रान्सने हा देश घेण्याचा प्रयत्न केला. १९०६ मध्ये यूरोपीय साम्राज्यवादी सत्तांची बैठक होऊन मोरोक्कोचे स्वातंत्र्य अबाधित राखण्याचा व सर्व यूरोपीय सत्तांना समान व्यापारी हक्क देण्याचा निर्णय घेण्यात आला.
तरीपण फ्रान्सने १९०७ साली व स्पेनने १९११ साली मोरोक्कोत लष्करी आक्रमण केले,जर्मनीने विरोध दर्शवला. मात्र ग्रेट(सध्या भिकारी) ब्रिटनने फ्रान्सला पाठिंबा दिला. १९१२ मध्ये फ्रान्स व मोरोक्कोचा सुलतान यांच्यात फेज येथे तह झाला आणि त्यानुसार मोरोक्कोतील शासन, अर्थव्यवस्था यांवर फ्रान्सचे नियंत्रण आले. फ्रेंचानी शेती, उधोगधंदे,खाणींच्या माध्यमातून मोरोक्कोची मोठया प्रमाणात लूट केली,बर्बर जमातीच्या अज्ञानाचा फायदा घेऊन अनिर्बंध सत्ता राबवली.
हे तर झाले वर्ल्डकपचे आता ख्रिसमसकडे येऊया ;
संपूर्ण जगात ख्रिसमसची(chrismas) धामधूम सुरु असताना पॅरिसमध्ये मात्र कुर्दीश समुदायाने हिंस्र धुमाकूळ घातला होता..
पॅरिसमध्ये मधील कुर्दिश निर्वासितांची संख्या जवळपास ३,००,००० लाख एवढी लक्षणीय आहे.या समुदायाच्या विकासासाठी तेथे ऑफिस देखील चालवले जाते.विल्यम नावाच्या ६९ वर्षीय गोऱ्या माणसाने या कुर्दिश ऑफिसमध्ये घुसून तेथील ३ कुर्दिश कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या केली.
या घटनेच्या निषेधार्थ पॅरिस मधील कुर्दिश समुदायाने निदर्शने करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ही निदर्शने शांतता प्रिय असली तरी नंतर कायदा सुव्यवस्थेची स्थिती झपाट्याने ढासळण्यास सुरुवात झाली, आंदोलकांनी बॅरिकेट्स तोडण्याचा प्रयत्न केला. मोठ्या प्रमाणात कारच्या तसेच खिडकीच्या काचा देखील फोडल्या. पोलिसांवर देखील हल्ला व गोळीबार करतानाचे व्हिडिओ समोर आले आहेत.
यापूर्वी जानेवारी २०१३ मध्ये पॅरिसमध्ये तीन महिला कुर्दिश कार्यकर्त्यांची अशाच पद्धतीने हत्या करण्यात आली होती. तेव्हा देखील कुर्दिश समुदायाने पॅरिसमध्ये हिंसाचार माजवला होता..
कुर्दीश म्हणजे कोण ?
कुर्द हा मध्य पूर्व आशियातील (तुर्की,अरब,सीरियन ) चौथा सर्वात मोठा वांशिक गट आहे.मुख्यतःसुन्नी मुस्लिमांचा समावेश आहे, ते आर्मेनिया, सीरिया, इराण, इराक आणि तुर्कीच्या सीमेवर विखुरलेले आहेत.पहिल्या जागतिक युद्धाच्या समाप्तीनंतर आणि ऑट्टोमन साम्राज्याच्या पतनानंतर स्वतंत्र राष्ट्र देण्याचे वचन ब्रिटन ने दिले होते मात्र अजूनही ते वचन कागदावरच आहे.
तुर्कस्तानच्या लोकसंख्येच्या अंदाजे २०% कुर्द लोक आहेत. तरी देखील तुर्की मध्ये कुर्दीश भाषेच्या वापरावर निर्बंध, कुर्दीश पोशाख आणि कुर्दीश नावांवर बंदी आहे. तुर्की सरकारने कुर्दीश स्वातंत्र्य वा स्वायत्तता स्पष्ट शब्दात नाकारली आहे. तुर्की राष्ट्रपती आर्दोगन यांनी तर “आम्ही रक्तपातास तयार आहोत” असेच म्हटले आहे.कुर्दीश मुसलमानांवर तुर्की मध्ये अमानुष,अमानवीय,अत्याचार केले गेले आहेत.म्हणूनच कुर्दीश समुदायाला तुर्की सोडून इतरत्र आश्रय घ्यावा लागतोय.
जेव्हा कुर्दीश तुर्कस्तान मध्ये मार खात होते,तेव्हा फ्रान्स ने कुर्दीश समुदायाला मोठ्या मनाने आपलेसे केले.अन्न ,वस्त्र,निवारा,शिक्षण देऊन त्यांना प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला.आजच्या घडीला निर्वासित कुर्दिश समुदाय मोठ्या प्रमाणावर फ्रान्स मध्ये आहे.एवढे करून सुद्धा फ्रान्सचेच खायचे आणि त्यांच्याच जीवावर उठायचे हीच कुर्दीश समुदायाची विकृत मानसिकता यावरून दिसून येते.ही उग्र इस्लामिक देशद्रोही जिहादी मानसिकता फक्त फ्रान्स मधेच नव्हे तर संपूर्ण जगभरात आढळून येते. ज्यावेळेस भारत-पाक क्रिकेट मॅचमध्ये पाकिस्तान जिंकतो तेव्हा भारतातील काही ठराविक वस्त्यांमध्ये,मोहल्यांमध्ये अश्याच प्रकारचा हैदोस,उच्छाद घातला जातो.या देशद्रोह्यांकडून आनंद प्रकट केला जातो.हि राष्ट्रद्रोही वर्तवणूक म्हणजे “जिस थाली में खाना, उसी में छेद करना…”
https://www.telegraph.co.uk/world-news/2022/12/23/paris-shooting-gunman-opens-fire-france/
फक्त फ्रान्सच नाही तर संपूर्ण युरोप या शरणार्थींमुळे त्रस्त आहे.सुरुवातीला स्वस्त लेबर म्हणून मोठा फायदा युरोपीय अर्थव्यवस्थेला झाला मात्र आज परिस्थिती वेगळी आहे.कोरोना, महागाई आता त्यात भर म्हणजे रशिया-युक्रेन युद्धामुळे संपूर्ण मानवसमाजच घायकुतीला आला आहे.
फ्रान्समध्ये लागलेला वणवा यूरोपातील आणखी किती देशात विस्तारतो यावर संपूर्ण जगाचे लक्ष्य लागले आहे..
म्हणतात ना :-
“When France sneezes, the rest of Europe catches a cold,”:-Metternich, Austrian chancellor.