
कोरेगाव भीमा हा देशाच्याच नव्हे तर जगाच्या पटलावर आला आहे, तोच मुळी कोरेगाव भीमा येथे झालेल्या १ जानेवारी २०१८ च्या दंगलीमुळे , हे दुर्दैवच म्हणावे लागेल. हे सर्व घडवून आणले गेले यात शंकाच नाही , यामागे वेगवेगळ्या राष्ट्रविघातक शक्तींचे हितसंबंध आहेतच, ते नक्की कोण? त्याचा तपास सुरु आहे. अर्बन नक्षलवादी म्हणजेच शहरी नक्षलवादी यामागे असावेत, असा पोलिसांचाही कयास आहे. कारण वेगवेगळे हितसंबंध असणाऱ्या राष्ट्रविघातक शक्तींनी , बंदी घातलेल्या CPI माओवादी गटाच्या कबीर कला मंचने एल्गार परिषदेचे ३१ डिसेंबर २०१७ रोजी शनिवार वाडा येथे केलेले आयोजन , वाटण्यात आलेली पत्रके व देशभरातील नक्षलवादी वक्त्यांची भडकाऊ भाषणं आणि दिशाभूल करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांवर दाखल करण्यात आलेल्या तक्रारी . हे एक जाणीवपूर्वक रचण्यात आलेल्या षडयंत्राचा भाग असल्याचे धागेदोरे भारतभरातील शहरी नक्षलवाद्यांपर्यंत पोहोचलेले आहेत , हे पोलिस तपासातून निष्पन्न होत आहे.
१ जानेवारी १८१८ या रोजी झालेल्या कोरेगाव भीमा येथील लढाईच्या २०० व्या वर्षपूर्तीनिमित्त जयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी, शौर्य दिनाचे आयोजन करून त्याच्या आडोशाने जातीजातीतील दरी वाढविण्याचा या राष्ट्रविघातक शक्तींचा प्रयत्न तर नव्हता ना? असे वाटण्यास भरपूर वाव आहे.

काय झाले होते १ जानेवारी १८१८ रोजी?
यात दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत
अनुसूचित जाती संघटना व त्यांची दिशाभूल करणा-यांनी असा इतिहास पेरलेला आहे की ,
५०० महार सैनिकांनी पेशव्यांविरुद्ध लढलेली ही जातीअंताची लढाई होती
मनुस्मृतीनुसार मारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराजांचा बदला घेण्यासाठी ही लढाई लढली गेली.
सिदनाक महार यांनी यात शौर्याचा पराक्रम केला
महार रेजिमेंट ब्रिटिशांच्या बाजूने लढत होती
५०० महार सैनिकांनी २८ हजार पेशव्यांना ( ब्राह्मणांना ) कापून काढले व ही लढाई जिंकली .
त्या शौर्याचे प्रतीक म्हणून हा जयस्तंभ कोरेगाव भीमा उभारण्यात आला आहे.
दुसरा मतप्रवाह हे मुद्दे पुराव्यानिशी खोडून काढतो
या जयस्तंभाचे इनचार्ज जमादार खंडोजीबीन गगोजी माळवदकर यांचे सातवे वंशज एडवोकेट रोहन जमादार माळवदकर यांनी १ जानेवारी १८१८ कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव ही एक पुस्तिका पुराव्यानिशी सादर केली आहे व खरा इतिहास समोर आणण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे म्हटले आहे . त्यांच्या अभ्यासानुसार जे त्यांनी पुस्तिकेत पुराव्यानिशी व संदर्भ देऊन लिहिले आहे ते असे,
कोरेगाव भीमा ही लढाई नव्हती ती केवळ एक चकमक होती
ब्रिटिश सैन्य व मराठ्यांचे सैन्य प्रवास करताना आमने-सामने आल्यामुळे झालेली एक अनिर्णायक चकमक होती.
दोन्ही सैन्यामध्ये अठरापगड जातीचे आणि धर्माचे लोक होते.

स्वतः छत्रपती प्रताप सिंह राजे भोसले (सातारा)हे बाजीराव पेशव्यांसोबत यावेळी तिथे छावणीत उपस्थित होते.
मराठा साम्राज्यासाठी लढणाऱ्या पेशव्यांसोबत मोठ्या प्रमाणात अरब , रामोशी , भिल्ल व मराठे सैन्यात होते . तर ब्रिटिशांच्या सैन्यात इंग्रज ,मराठे, बारा बलुतेदार, मद्रासी ,मुस्लिम असे सैनिक होते.
महार रेजिमेंट १९४१साली स्थापन झाली ,त्यामुळे तिचा या लढाईशी काहीही संबंध नाही
सिदनाक महार हे नेहमीच मराठा साम्राज्याकडून लढले व पराक्रमही गाजवला. कोरेगाव भीमाच्या लढाईशी त्यांचा दुरान्वयानेही संबंध नाही . पानिपत आणि खर्ड्याच्या लढाईत त्यांनी नक्कीच शौर्य गाजवले होते.
रात्री ९ वाजेपर्यंत ही चकमक चालली व त्यानंतर मराठा सैन्याने छत्रपती प्रताप सिंह राजे भोसले यांना घेऊन साता-याकडे कुच केली. ही लढाई निर्णय न होताच संपुष्टात आली .
जयस्तंभावरील कोरीव मजकुरात त्या वेळच्या घटनेचा स्पष्ट उल्लेख आहे .ही संरक्षणा ( defence) करता झालेली चकमक असल्याची त्यात नोंद आहे.
आपल्या पुस्तिकेत एडवोकेट रोहन जमादार माळवदकर यांनी या लढाईच्या आधीची पार्श्वभूमी, यात लढत असलेले सैन्याची वर्गवारी , त्या संदर्भातले सर्व पत्रव्यवहार याद्वारे खऱ्या इतिहासाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे . त्यात काही चुका असल्यास पुराव्यानिशी खोडण्याची विनंती केलेली आहे.
क्रमशः