IslamNewsReligion

‘पांडवांचे निवासस्थान’ इस्लामी धर्मांधांच्या ताब्यात

“एकचक्रनगरी” एरंडोल (जिल्हा:-जळगाव )मधील पांडववाडा म्हणजे पांडवांचे अज्ञातकाळातील वास्तव्य! हिंदूंच्या उदासिनतेमुळे १२५ वर्षांपूर्वी इस्लामी धर्मांधांनी हळूहळू त्यावर मालकी हक्क प्रस्थापित केला. आज हिंदू समाज जागृत झाला आहे, तरीही हिंदूंना धर्मांधांच्या ताब्यातून पांडववाडा परत घेण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. प्रस्तुत लेखात याबद्दल चर्चा केली आहे.

पांडवकालीन असलेला ‘पांडववाडा’ ही हिंदूंसाठी अभिमानाची बाब!

‘पांडववाडा'(pandavwada) जळगाव शहरापासून २७ किमी अंतरावर आहे.एरंडोल हे गाव म्हणजे महाभारतकालीन एकचक्रनगरी. एरंडोलचे प्राचीन नाव अरुणवेल किंवा अरुणावती होते, जे अंजनी नदीच्या काठावर वसलेले आहे. महाभारताच्या काळात जेव्हा पांडव वनवासात होते. यावेळी ते या एकचक्र नगरीमध्ये वास्तव्यास होते. ते ज्या वाड्यात राहिले, तो वाडा म्हणजे पांडववाडा! आजही हा वाडा एरंडोलमधील ऐतिहासिक वास्तू म्हणून प्रसिद्ध आहे.

एरंडोलपासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या पद्मालयात जाऊन भीमाने बकासुराचा वध केला.आजही पद्मालयापासून दीड किलोमीटर अंतरावर भीमकुंड, भीमकी चक्की, भीम(bheem) आणि बकासुर यांच्यातील युद्धाच्या खुणा आपल्या आढळून येतात. एरंडोलमध्ये आजही भीमवाटिका दिसते. वाड्याजवळ असलेल्या विहिरीला द्रौपदी कूप असेही म्हणतात. अनेक पर्यटक महाभारतकालीन पांडववाडा आणि पद्मालयाला भेट देतात. या महाभारतकालीन पांडववाड्याचा सरकारी राजपत्रात उल्लेख ‘पांडववाडा’ असा आहे.एरंडोलमधील हा पांडववाडा सर्व हिंदूंसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

काय आहे या पांडवाड्यामध्ये ?

पांडववाडा फक्त हिंदूंचा आहे, याचा दाखला देणारी उदाहरणे !

पांडववाड्यातील वास्तूने ४५१५.९ चौरस मीटर क्षेत्रफळ व्यापले आहे. पांडववाड्याच्या प्रवेशद्वारावरील पहिल्या दगडांवर प्राचीन कोरीवकाम असून त्यात कमळाच्या फुलांचे नक्षीकाम आपल्याला स्पष्टपणे दिसते.आत शिरल्यावर दोन्ही बाजूला मोकळी जमीन आहे. भिंतींमध्ये अनेक खिडक्या आहेत. या प्राचीन खिडक्यांवर दिवे आणि कमळाच्या आकाराचे नक्षीकाम आहे. वाडयाच्या शेवटी मंदिरासारखे गर्भगृह असून त्याच्या शेवटी मूर्ती ठेवण्याची जागा आहे. हे ठिकाण हिंदू स्थापत्यशास्त्राशी मिळतेजुळते आहे.या वाड्याजवळच धर्मशाळा देखील आहे.

इस्लामी धर्मांधांनी कश्या प्रकारे मिळवला पांडवाड्यावर ताबा ?

पांडववाड्याच्या मागील बाजूस जुम्मा मशीद (masjid) होती. १८८० मध्ये पावसामुळे ती मशीद कोसळली. त्यावेळी जुम्मा मशीद ट्रस्टने तत्कालीन ब्रिटिश सरकारच्या वकिलांशी रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर २५ वर्षांचा करार करून गवत, लाकूड इत्यादी साहित्य ठेवण्यासाठी भाड्याने जमिनीचा तुकडा घेतला होता. त्याचे भाडे वार्षिक दोन रुपये होते. पालिकेकडून ही जागा केवळ साहित्य ठेवण्यासाठी घेतल्यानंतर तेथे विविध प्रकारची ऐतिहासिक बांधकामे पाडण्यात आली. तेथे नक्षीकाम असलेले खांब, दगडी खिडक्यांच्या लोखंडी जाळ्या आणि दीडशे वर्षे जुनी झाडे तोडण्यास सुरुवात करण्यात आली. कोरीव दगड फोडून चबुतरा व व्हरांडा बांधण्यात आला. तिथले कोनाडे बुजवले गेले ही सर्व बांधकामे विनापरवाना करण्यात आली आहेत. पांडववाड्यासाठी ‘प्राचीन स्मारक कायदा’ लागू आहे. त्यामुळेच हा गुन्हा दखलपात्र होता. या संदर्भात, जुम्मा मस्जिद ट्रस्टचे संदेखान रहिमखान यांनी लिहिलेला माफीनामाही उपलब्ध आहे, त्यानंतर देखभाल सर्व्हेअरने पुढील कारवाईसाठी एरंडोल तहसीलदारांकडे तक्रार केली.

सरकारी गलथान कारभार

पांडववाडा वास्तूच्या नावाबाबत अधिकृत कागदपत्रांमध्येही देखील संभ्रम दिसून येतो. चौकशी नोंदणी नोंदवहीच्या उताऱ्यामध्ये ‘पांडववाडा’ नावाचा उल्लेख आहे, तर पावतीच्या उतारेमध्ये ‘सरकार’ आणि नगर भूमापनाच्या रचनेत ‘जामा मशीद’ असा उल्लेख आहे. भूमापन नकाशात सुरुवातीला पांडववाड्याचा उल्लेख होता. त्यानंतर काही दिवसांनी पांडववाडा आणि मशीद असा उल्लेख आला. आणि काही वर्षांनंतर या नकाशात पांडववाडा आणि जुम्मा मशीद बदलण्यात आली आणि सध्या भूमापन नकाशात फक्त जुम्मा मस्जिदचा उल्लेख आहे.सिटी सर्व्हेनुसार, पांडववाडा (C.S. No.1100) वास्तू महाराष्ट्र शासनाच्या नियंत्रणाखाली आहे; पण जुम्मा मस्जिद ट्रस्टचा मालक असल्याचा कोणताही कागदोपत्री पुरावा नाही. त्यानंतरही इस्लामी धर्मांध त्यावर मालकी हक्क दाखवत आहेत.

पांडववाड्याचा हिंदू आणि इस्लामी धर्मांध यांच्यातील संघर्ष !

पांडववाड्याला इस्लामी धर्मांधांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी हिंदू अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. या संदर्भात सन १८८० पासूनची कागदपत्रे उपलब्ध आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि स्थानिक हिंदू यासाठी लढा देत आहेत. 2 जून 1995 रोजी एरंडोल येथे करवीर पीठाचे शंकराचार्य स्वामी श्री विद्याशंकर भारती यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय संत यात्रा सुरू केली होती. गावात पांडववाडा असल्याची माहिती मिळताच संत कुतूहलाने वाडा पाहायला गेले. या काळात दरवाज्याची चावी मागण्यासाठी इस्लामी धर्मांधांकडे गेलेली व्यक्ती 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ होऊनही परत आली नाही. सर्व संतांना बराच काळ राहावे लागले. त्यामुळे बंद केलेले प्रवेशद्वार शंकराचार्यांच्या उपस्थितीत सर्व संतांनी उघडले. त्यावेळी पोलिसांनी सर्व संतांना पोलीस ठाण्यात बोलावले. शंकराचार्यजींना जमिनीवर बसावे लागले. त्यांना अतिशय अपमानास्पद वागणूक देण्यात आली. पोलिसांनी संतांवर विविध कलमे लावून त्यांना दोषी ठरवले.

सध्याची परिस्थिती:-

सध्या येथे नमाज अदा केली जाते. हा पांडववाडा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सर्वांसाठी खुला करण्याचे आदेश नगर परिषदेने दिल्यानंतरही हिंदूंना अधूनमधून प्रवेश मिळतो. बहुतेक वेळा मुख्य दरवाजा बंदच असतो. मागच्या दाराने इस्लामी धर्मांधांचेच वर्चस्व आहे. पांडववाड्याच्या मुख्य गर्भगृहात हिंदूंना प्रवेश नाही; कारण तिथे नमाज अदा केली जाते. आतील भागात मजल्यावरील पायऱ्या आहेत. हातपाय धुण्यासाठी प्लॅटफॉर्म व नळाचे बांधकाम करण्यात आले आहे. मूर्ती ठेवण्याच्या ठिकाणी नमाज पठणाचे साहित्य ठेवण्यात आले आहे. मोठमोठे स्पीकर लावण्यात आले आहेत.

पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, महाराष्ट्र शासन, नाशिक विभागाने या अनधिकृत मशिदीचे सुशोभीकरण्याची निविदा प्रसिद्ध केली आहे. (निविदेची प्रत येथे जोडण्यात आली आहे )

https://drive.google.com/file/d/1kU6L0SxpxEr_bLWQ0XGaVQez1ySWCLLz/view?usp=sharing

सुशोभीकरणाचा तपशील पुढीलप्रमाणे :-

  • दिवे कनेक्शन
  • पिण्याच्या पाण्याची सुविधा
  • शू रॅक
  • शौचालये
  • रिसेप्शन काउंटर
  • अन्नछत्र / कॅन्टीन / कॅफेटेरिया
  • स्मरणिका दुकान
  • सीसीटीव्ही

मुळातच हा संपूर्ण परिसर पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असल्याने तेथे कोणताही आणि कोणालाही बदल करण्याची परवानगी नाही मग हे बदल झाले कसे ?

आणि कळस म्हणजे ह्या अनधिकृत मशिदीच्या संवर्धनाच्या बांधकामाला सरकार पैसे देणार ?

सध्या महाराष्ट्रात “हिंदुत्ववादी” सरकार सत्तारूढ आहे. संबंधित मंत्रालयाला अंधारात ठेवून, विभागीय स्तरावर हा निर्णय परस्पर घेतल्याचे जाणवते. संबंधित माननीय मंत्री महोदय ,माननीय उपमुख्यमंत्री महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय तातडीने व जातीने लक्ष घालून हिंदू समाजाच्या भावनांचा आदर करतील अशी आशा आहे..

https://www-hindujagruti-org.translate.goog/news/18963_pandava-wada-a-burning-issue-for-hindus.html?_x_tr_sl=en&_x_tr_tl=hi&_x_tr_hl=hi&_x_tr_pto=tc,sc

Back to top button