देवी-देवतांचे फोटो काढण्याचे आदेश देणाऱ्या धुळ्याचा लाचखोर शिक्षणाधिकारी मोहन देसलेचा बोलवता धनी कोण?
माध्यमिक शाळांमधून विद्येची देवता सरस्वतीचे फोटो तत्परतेने काढण्याचे आदेश कोणाला खुश करण्यासाठी?
धुळे(dhule) जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी ६ जानेवारी २०२३ रोजी नाशिक(nashik) विभागातील सर्व शाळा आणि महाविद्यालयातील देवी सरस्वतीचे फोटो (sarasvati photo) काढण्याचे आणि राष्ट्रपुरुषांचे फोटो लावण्याचा फतवा काढला होता. नंतर तो ताबडतोब माघारी घेण्यात आला . पण मग इतक्या घाईने हा निर्णय शाळा महाविद्यालयांवर लादून शिक्षणाधिकारी मोहन देसलेला (mohan desle ) कोणाला खुश करायचे होते?
कोणाच्या इशा-यावर मोहन देसले नाचत असावेत ?
भारतभर देवी सरस्वतीचे( mata sarasvati) पूजन शाळांमधून करण्यात येऊ नये, यासाठी विशिष्ट कंपू कार्यरत आहेत. शिक्षणाचे भगवेकरण झाले आहे असे बोंबलणारेच , या देवी सरस्वतीचे फोटो हटाव मोहिमेच्या पाठीमागे आहेत , हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.
ज्या पवन कोराटे याच्या पत्रावर कार्यवाही करावी असे या शिक्षणाधिकारी मोहन देसलेला वाटले , तो अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा अध्यक्ष आहे. ज्याने २८ सप्टेंबर २०२२ रोजी देवी सरस्वतीचे फोटो हटवून तेथे राष्ट्रपुरुषांचे फोटो लावावेत असे पत्र शिक्षण विभागाला दिले होते.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या २६ सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या( फक्त दोन दिवस आधी) कार्यक्रमात व्यासपीठावरुन बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री छगन भुजबळ यांनी “आम्ही सरस्वती देवीला शाळेत का पुजावे, ती कधी आम्हाला शिकवायला आली होती का? शिकवलं असेलच तर ३% लोकांना शिकवले असेल. शाळेत फक्त राष्ट्रपुरुषांचेच फोटो लावायला हवेत ” असे आवाहन केले होते.
पवन कोराटे , अखिल भारतीय महात्मा फुले( mahatma phule)समता परिषदेचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी तो आदेशच असावा.त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी सरसावणे हे त्यांचे कर्तव्यच. पण शिक्षणाधिकारी मोहन देसलेला इतक्या तत्परतेने कारवाई करण्याची घाई का झाली होती?
अजूनही मेकॉलेच्या औलादी शिक्षणक्षेत्रात कार्यरत आहेत याचाच हा एक नमूना म्हणता येईल. मेकॉलेला त्याच्या हयातीत हिंदू संस्कृती संपविण्याचा डाव पुर्ण करता आला नव्हता, तो पुर्ण करण्यासाठी त्याचे हे वारसदार काळे इंग्रज असे कार्यरत असतात.
https://www.lokmat.com/vasai-virar/daslechis-ups-and-downs-teachers-role-broker/
कोण आहे हा मोहन देसले?
धुळे जिल्हा परिषदेचा शिक्षणाधिकारी असलेला हा मोहन देसले , पालघर येथे बदलीवर असताना, एका अनुसूचित जातीच्या शिक्षकाला कायम करण्यासाठी लाच घेताना सापळा रचून रंगेहाथ पकडला गेला होता. त्याच वेळी त्याच्या धुळे येथील घरात छापा टाकला असता मोठे घबाडच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती आले . १४ लाखांची तर नुसती रोकडच घरात सापडली आणि सर्वांचे डोळेच विस्फारले तसेच कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. दोन दिवसांची पोलीस कोठडी तातडीने सुनावण्यात आली होती.
२०१९ साली हे भ्रष्ट देसले महाशय त्यामुळे चर्चेत आले होते. शिक्षणक्षेत्राला लागलेली ही कीड वाळवी आहे . पण हे कुणाचातरी वरदहस्त असल्याशिवाय धाडस करतील काय? आपला बाप आपल्याला सोडवेल याची याला खात्री असणारच. आणि म्हणूनच अल्पावधीतच पुन्हा शिक्षणाधिकारी म्हणून रुजू झाला.
त्यात जर विशिष्ट विचारधारेने प्रेरित होऊन मॅकॉलेचे उर्वरित स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरसावलेल्या हिंदूद्वेष्ट्यांना तर वरदहस्त लाभलेला असणारच , त्याशिवाय का इतकी तत्परता या लाचखोर मोहन देसलेने दाखवली असणार.
हा मोहन देसले हिंदूद्वेष्टा आहेच म्हणून तर इतकी तत्परता दाखवली फतवा काढण्यासाठी.
कर्नाटकात हिजाब प्रकरणाच्या वेळी शाळा महाविद्यालयात सरस्वतीच्या मुर्ती फोडण्यात आल्या होत्या.
बंगालमध्ये तर सरस्वती पुजेवरच बंधनं आणली गेली.
राजस्थानातील शाळेत मुस्लिम बहुसंख्य असल्याने सरस्वतीचे फोटो हटण्याची मागणी करण्यात आली होती.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून विद्येची देवता सरस्वतीचे फोटो शाळांमध्ये लावण्यात येत असावेत , पण देवी सरस्वतीला विद्येची देवता न मानण्याचे फॅड वा खूळ मागील १०/१५ वर्षात जोर धरू लागले तेच मुळी या आधुनिक मेकॉलेंच्या वारसदारांमुळे .
मोहन देसले हा भ्रष्ट शिक्षणाधिकारी लाचखोरी(corruption) प्रकरणात तुरुंगात जातो आणि पुन्हा शिक्षणक्षेत्रात कार्यरत होतोच कसा? तो ही नाशिक विभागातील धुळे जिल्हा परिषदेत , म्हणजे आपल्याच जिल्ह्यात.
हा विषय वाटतो तितका सरळ नाही, देसलेचा बोलवता धनी कोण?
दाल में काला नहीं, यहाँ तो पुरी दाल ही काली है..