News

काला अंब (आम)….पानिपतच्या देदिप्यमान शौर्याचा साक्षीदार

पानिपत…

मराठी(marathi) मनाला हेलावून टाकणारा शब्द , धमन्यांमधे रक्ताभिसरणाची क्रिया या एकाच उच्चारणात जोरात सुरु होते आणि प्रत्येक मराठी मन त्या शूरवीरांपुढे नतमस्तक होतो . १४ जानेवारी १७६१ ( मकरसंक्रांत) रोजी उत्तरेच्या रक्षणार्थ झेपावलेल्या व कामी आलेल्या शूरवीरांचे वर्णन “लाख बांगडी फुटली ,दोन मोती गळाले, २७ मोहरा हरवल्या तर चिल्लर खुर्दा किती सांडला यांची गणतीच नाही” असे बखरीत आढळते. या देदीप्यमान पराजयाचे वर्णन राम गणेश गडकरींनी (गोविंदाग्रज):-

कौरव पांडव संगरतांडव द्वापारकाली होय अती।
तसे मराठे गिलचे साचे कलित लढले पानपती ।। असे केले आहे.

अब्दालीचा केविलवाणा विजय आणि मराठ्यांच्या देदीप्यमान पराजयाचा साक्षीदार असलेल्या “काला आम”(kaala aam) ची ही कहाणी…

https://hindi.nativeplanet.com/panipat/attractions/kala-amb/

पानिपत युद्ध ,(panipat war) ज्याचा खोलवर परिणाम भारतीय (india) इतिहासावर झाला आहे . कारण पानिपतावर विजय दृष्टीक्षेपात असतानाच हातातोंडाशी आलेला विजय दुर्दैवाने मराठ्यांच्या हातून निसटला होता. जर पानिपतावर मराठे(maratha) जिंकले असते तर कदाचित ब्रिटीशांना भारतात शिरकाव करणे अवघड झाले असते, असे जाणकारांचे मत आहे. मराठे झुंजता झुंजता धारातीर्थी पडले पण अब्दालीच्या सैन्याचे मराठ्यांनी कंबरडे मोडले होते. अहमदशहा अब्दाली(abdali) पुर्णतः पंगु झाला जिंकूनही दिल्लीच्या (delhi)तख्तावर बसता आले नाहीच आणि वायव्येकडून येणा-या इस्लामी टोळधाडी पण कायमच्या बंद झाल्या.

पानिपतावरील पराजयाची सल मराठ्यांच्या मनात होती आणि प्रतिशोध घेण्यासाठी आसुसलेल्या मराठ्यांनी पुढील दहा वर्षांतच विश्वासघात करणा-या नजीबखानाच्या खानदानाचा शोध घेऊन एकेकाला संपवले आणि नजीबखानाची तर कबरच खोदून उद्ध्वस्त केली . दिल्लीचे तख्त फोडले आणि मराठा साम्राज्याचा जरीपटका पुन्हा एकदा डौलाने फडकावला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ” उत्तरक्रिया ” या पुस्तकातून मराठ्यांनी घेतलेल्या या प्रतिशोधाची महती सांगितली आहे.

पानिपतचे तिसरे युद्ध १७६१च्या जानेवारीतील कडाक्याच्या थंडीत लढले गेले. सदाशिवराव भाऊंच्या(sadashivrao bhau) नेतृत्वाखाली हे युद्ध लढले गेले. हरियाणातील पानिपत जवळच असलेल्या आणि आता काला अंब( आम/आंबा) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागेवर लढले गेले. सदाशिवराव भाऊ येथे छावणी टाकून होते. काही मराठा सरदार कुमक घेऊन पोहचण्याची ते वाट पहात होते. पण जसजसे दिवस सरु लागले छावणीतील धान्यसाठा कमी होत गेला. अब्दालीनेही गोविंदपंत बुंदेले यांच्याकडून होणारी रसद बंद पाडली होती. छावणीतील सैन्य आणि सोबतीला आलेल्या फौजफाट्याची उपासमार होऊ लागली. त्यात दाट धुक्याचा फायदा घेत यमुनेच्या पलिकडच्या तीरावरील अब्दालीच्या सैन्याने छावणीकडे कूच केली.

कडाक्याची थंडी आणि उपासमार सहन करत बसण्यापेक्षा रणांगणात उतरुन लढावे यासाठी सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव, जनकोजी , तुकोजी यांनी बंदुकधारी अब्दालीचे सैन्यावर धाबा बोलला . इब्राहिम खान तोफखाना घेऊन आघाडीवर होते. कडाक्याच्या थंडीतही उपाशीपोटी मराठे त्वेषाने लढले आणि अब्दालीने जवळजवळ माघार घेतली होती पण ऐनवेळी १५००० ताज्या दमाचे सैनिकांची कुमक त्याने उपाशीपोटी लढणा-या मराठा सैन्यावर सोडली . विश्वासरावांना गोळी लागली तसेच सदाशिवराव भाऊ हत्तीवरुन लढण्यासाठी खाली उतरले होते पण आपल्या सैन्याला ते पडले असा गैरसमज झाला . आणि थकलेल्या उपाशी सैन्यातील चलबिचल पहाताच अब्दालीच्या ताज्या दमाच्या सैन्याने क्रौर्याची परिसीमा गाठली.

https://panipat.gov.in/hi/tourist-place/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95/

आताचे ” काला आम पार्क ” हीच ती जागा होती जिथे मराठा सैन्याची छावणी पडली होती. ती आज काला आम पार्क म्हणून ओळखली जाते कारण तिथे अंब म्हणजे पंजाबीत आंब्याचे झाड होते त्याखालीच मराठी सैन्याच्या रक्तमासाचा चिखल झाला होता. अशी माहिती येथील स्थानिक सांगतात की, त्या आंब्याच्या झाडाला नंतर काळे आंबे येत असत. कारण मराठ्यांच्या रक्तात येथील जमीन माखली होती, कित्येक फुटांवर जमीन खोदल्या वर लाल दिसून येत असे. काळे आंबे येत असल्याने या परिसराला काला अंब (काला आम) म्हणूनच ओळखले जाते. पानिपत जवळच ८ किलोमीटरवर ही जागा आहे. येथे सरकारने आता ऐतिहासिक पर्यटन स्थळाचा विकास केला आहे. येथे मराठ्यांच्या शौर्याची आठवण म्हणून एक स्तंभ उभारण्यात आला आहे. तसेच या युद्धप्रसंगाचे वर्णन करणारे भित्तीचित्रे आणि माहिती कोरण्यात आली आहे. त्या काळातील काही वृक्ष आजही येथे निष्पर्ण अवस्थेत उभे आहेत.

ऐन मकरसंक्रांतीला(makarsankranti) झालेल्या या जीवघेण्या पराजयाच्या प्रतिशोधाच्या अग्नीत जळणा-या मराठ्यांनी अब्दाली आणि त्याच्या सहका-यांना कायमचे नेस्तनाबूत करत त्यांची उत्तरक्रिया पुढील १० वर्षांतच केली. तसेच अब्दालीला साथ देणा-या रोहिल्यांचा पत्थरगड बेचिराख करून त्यांचे नामोनिशाण मिटवून मराठ्यांनी सगळा हिशोब चुकता केला..

Back to top button