
पीठ नाही, पेट्रोल(petrol) संपलेले, दिवसेंदिवस कमी होणारी परकीय गंगाजळी, मोठ्या प्रमाणावर अराजकता, धर्मांध आतंकवाद, ठिकठिकाणी होणारे बॉम्बस्फोट.. म्हणजेच इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान..
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥
भारतीय संस्कृतीत कर्मसिद्धांताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. किंबहुना आपली संस्कृतीच या सिद्धांतावर आधारित आहे. तुम्ही ज्या प्रकारचे कर्म कराल,तशीच फळे तुम्हाला मिळतात.चांगल्या कर्माची चांगली आणि वाईटाची वाईट फळेच मिळताच. याच सिद्धांताप्रमाणे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानही(pakistan) आपल्या कर्माची फळे भोगत आहे.भारताला अस्वस्थ आणि अस्थिर ठेवण्यासाठी दहशतवादावर खोऱ्याने खर्च करणाऱ्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची अर्थव्यवस्था आता गंभीर झाली आहे.
इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमधील एखादी लहानशी राजकीय घडामोडही अर्थव्यवस्थेसाठी मोठा धोका ठरू शकते, इतपत या देशाची अवस्था बिकट झाली आहे. इम्रान खान यांची सत्ता उलथवून आलेल्या आघाडी सरकारसमोर देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचे मोठे आव्हान आहे. वाढती महागाई, जगातील प्रमुख चलनांच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाचे मोठ्या प्रमाणात होणारे अवमूल्यन, इंधनाच्या वाढत्या किमती, झपाट्याने घसरत जाणारा विदेशी चलनसाठा तसेच मोठ्या प्रमाणात घेतलेल्या कर्जाचा फास पाकिस्तानभोवती आवळला जात आहे.

जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर
अर्थव्यवस्था(economy) संकटात येण्यासाठी चुकीची आर्थिक धोरणे कारणीभूत ठरली असली तरी, पावसाळ्यात महापुराने घातलेल्या थैमानाने इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचे कंबरडे मोडले. एफएटीएफने (Financial Action Task Force -FATF) अलिकडेच इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला ग्रे यादीच्या बाहेर काढले. मात्र, त्याचा फारसा फायदा इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला होणार नाही. या यादीतून बाहेर आल्याने इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानसाठी कर्जाचा रस्ता मोकळा झाला आहे. मात्र, या देशात परतफेडीची क्षमता नसल्याने मोठाली कर्जे मिळणे कठीण आहे.
इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानवर मोठ्या प्रमाणात कर्ज आहे. पाकिस्तानी स्टेट बँकेच्या आकडेवारीप्रमाणे, ऑक्टोबर २०२२ पर्यंत या देशावर ५०, १५१.८० अब्ज पाकिस्तानी रुपयांचे कर्ज होते. कर्जाची जबाबदारी पार पाडणे हे पाकिस्तानसमोरील सर्वांत मोठे आव्हान आहे. मात्र, अशा परिस्थितीतही हा देश सैन्यावर मोठ्या प्रमाणात खर्च करीत आहे.

रोजचा खर्च भागवणे कठीण होत असताना हा देश दहशतवाद्यांना पोसतो.इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्ताननें कोणतेही निर्णय आर्थिक परिणामांचा विचार करून घेतले नसल्याचा या देशाचा राजकीय इतिहास आहे. भूतकाळात केलेल्या चुका नेहमी वर्तमान आणि भविष्यात मानगुटीवर बसतात, याचे भान पाकिस्तानी सत्ताधार्यांनी कधीच ठेवले नव्हते. इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान अल्ला, आर्मी आणि अमेरिकेच्या बळावर चालतो, असे पूर्वी म्हटले जायचे.
आता जागतिक पातळीवरील राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलली आहे. अफगाणिस्तानच्या मुद्यावर इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानने केलेली फसवणूक अमेरिकेच्या लक्षात आल्यावर या देशाची लष्करी आणि आर्थिक मदत हळूहळू बंद करण्यात आली. त्यानंतर भिकारी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानने आपला मोहरा चीनच्या दिशेने वळवला.

भारताला त्रस्त करण्यासाठी शक्तिशाली देशाचा वरदहस्त आवश्यक आहे, इतकाच संकुचित विचार पाकिस्तानने केला. मात्र, इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या रूपात आयते सावज चीनच्या हाती आले होते. चीनने पाकिस्तानला कर्जसापळ्यात पूर्णतः अडकवले आहे.चीनचे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानवर जवळपास ८७.७ अब्ज डॉलर्सचे कर्ज आहे. बीआरआयच्या(Belt and Road Initiative:-BRI) गोंडस नावाखाली चीनने अत्यंत महाग दराने (जवळपास ८%) दिलेल्या या कर्जामुळे पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आला आहे.
इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची स्थापना झाली, त्या काळापासूनच इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला अर्थ मंत्रालय चालविण्यासाठी या देशातील बहुतांश पक्षांचे सरकार केवळ बँकर्स आणि चार्टर्ड अकांऊंटटवर अवलंबून राहिले,त्यातच इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानात लोकशाही केवळ नावालाच आहे. जनरल झिया उल हक आणि परवेझ मुशर्रफ यासारखे भ्रष्टाचारी क्रूर हुकूमशहा देखील इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला लाभले.
लष्कराची(pak army) निरंकुश सत्ता या देशाच्या अधोगतीचे मुख्य कारण ठरली आहे. लष्करी अधिकार्यांचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा देखील आर्थिक अडचणीचे एक मोठे कारण आहे. हा भ्रष्टाचार इतका खोलवर मुरला आहे की, इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानी लष्कर व्यवसाय करणारे जगातील पहिले लष्कर ठरले आहे. विसंगत आर्थिक धोरणे, चुकीच्या प्राधान्यक्रमांचा पाठपुरावा आणि खराब प्रशासनामुळे या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळेच मागील ७५ वर्षांमध्ये इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचा फारसा विकास झालेला नाही. वित्तीय धोरणांमध्येही सुसंगतपणाचा अभावच दिसून आला आहे.

कालच इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानात पेशावर येथील मशिदीत (Peshawar Bomb Blast) नमाज सुरू असताना बॉम्ब स्फोट झाला.या स्फोटात आतापर्यंत ४१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. लोक नमाज पठण करण्यासाठी जमले असताना हा स्फोट झाला. या स्फोटामध्ये मशिदीचा छत कोसळल्याने अनेक लोक त्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे.तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे..
यावरून आपल्या लक्षात आलेच असेल की ,इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानात सत्तेत असलेल्या सरकारांनी धर्मांध आतंकवाद्यांना प्राधान्य,प्रोत्साहन देण्यासाठी आपली धोरणे बदलली, ज्यामुळे अस्थिर आर्थिक परिस्थिती निर्माण झाली. केवळ भारतावर दबाव वाढवण्यासाठी आर्थिक वाढीकडे दुर्लक्ष करीत दहशतवाद पोसणे आणि चीनच्या कह्यात जाणे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला भोवले आहे. सकारात्मक धोरणे राबवून वेगाने ढासळत जाणारी अर्थव्यवस्था सांभाळणे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानसाठी आता अत्यंत जिकिरीचं झाले आहे.

लवकरात लवकर परिस्थिती न सावरल्यास इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान आणखीनच गर्तेत जाणार हे निश्चित ..
म्हणतात ना :- कालाय तस्मै नमः