If anybody wants to beat me, let them run a world record :- Steve Prefontaine
IMF दारी २३ वेळा चकरा मारुन इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्ताननं भीक मागण्याचाही विश्वविक्रम केलाय !
आपल्याला वाचून आश्चर्य वाटले असेल की असाही विश्वविक्रम असतो का..? हो… आपल्या शेजाऱ्यांनी तो करून दाखवलाय…
एकीकडे आत्मनिर्भर भारताची अर्थव्यवस्था दररोज नवनवीन शिखरे पादाक्रांत करत आगेकूच करत आहे… भारत विकासाभुमिख, हरित अर्थव्यवस्था आणि आर्थिक क्षेत्राला गती मिळण्यासाठी भरीव गुंतवणूक करीत आहे… ‘पंतप्रधान गती शक्ती योजने’ची जोड देत पायाभूत सुविधांवर भर देण्यासाठी ७.५० लाख कोटींवरून १० लाख कोटींवर गेला आहे… भविष्यात रस्ते, रेल्वे, हवाई मार्ग आणि बंदर इत्यादींचे जाळे देशभर विस्तारण्यासाठी याचा फायदा निश्चित देशाला होईल… परिणामी, भारत प्रगत राष्ट्र होण्यास मदतच होणार आहे…
तर दुसऱ्याबाजूला इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची (Pakistan) अर्थव्यवस्था दिवसेंदिवस खालावते आहे… इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानी राजकारण्यांनी दहशतवादाला प्रथम प्राधान्य दिल्यामुळं इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान मध्ये आज त्राहीमाम माजले आहे… इतकी भीषण परिस्थिती आहे की. दोन वेळच्या जेवणाचीही सोय नागरिकांसाठी करता येत नाहीये… मोठ्या आशेने इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आएमएफ) (IMF) कडे पाहतो आहे… मात्र इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला IMF ने पुन्हा एकदा धक्का दिला आहे…
बेलआउट पॅकेजसाठी आयएमएफशी संपर्क साधणारे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी सादर केलेली प्रस्तावित कर्ज योजना नाकारण्यात आली आहे… पाकिस्तानने आएमएफ कडे २३ वेळा मदतीसाठी आग्रह केला आहे… हे करत त्यांनी भीक मागण्याचा नवा विक्रम केला आहे… यावेळी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानसाठी परिस्थिती सर्वात कठीण आहे… इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानने आयएमएफचे कर्ज मिळवण्यासाठी अमेरिकेचीही मदत घेतली आहे… चीनकडून कर्ज मिळाले आहे पण त्यावरचे व्याज इतके जास्त आहे की ते फेडणे दुरापास्त आहे… धर्माच्या आधारावर भारताचे लचके तोडून निर्माण झालेला हा देश आता पूर्ण विघटनाकडे वेगाने वाटचाल करतो आहे…
नोव्हेंबरपासून सस्पेन्स…
इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचा आयएमएफकडे कर्जासाठी असलेला प्रस्ताव गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून स्थगित आहे… कर्जासाठी आवश्यक असलेल्या आयएमएफच्या अटी मान्य करण्यास अर्थमंत्री इशाक दार यांनी नकार दिला होता… त्याच वेळी, दार यांनी बाजार-निर्धारित विनिमय दर आणि वित्तीय तूट(fiscal deficit) कमी करण्यासाठी उपाययोजना लागू करण्यास असमर्थता व्यक्त केली होती… चालू आर्थिक वर्षात इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या बजेटमध्ये ७.४ ट्रिलियन रुपयांचे महसूल लक्ष्य ठेवण्यात आले होते… यामध्ये ५२ टक्के कर्ज परतफेडीसाठी आणि ३३ टक्के संरक्षण आणि पेन्शनसाठीच्या निधीची तरतुद करण्यात आली होती… अशा परिस्थितीत इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानकडे फारच कमी पर्याय उपलब्ध आहेत…
इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या आर्जवाला IMF दाद देईल?
२०० अब्ज रुपयांचा अतिरिक्त कर लागू करण्याचा इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान सरकारचा विचार आहे… पण आयएमएफची मुख्य चिंता वित्तीय तूटीबद्दल आहे… ही तूट एकूण जीडीपीच्या ६.५ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते… देशातील करातून मिळणारे उत्पन्न खूपच कमी, नाममात्र आहे… कर्जाचा आकडा गगनाला भिडला आहे… अशा स्थितीत आयएमएफ इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचे म्हणणे ऐकून घेईल की नाही अशी शंका आहे…
पुरामुळे अडचणी वाढल्या…
इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानात यंदा न भूतो न भविष्यती असा पूर आला… देशाचा जवळपास एक तृतियांश भाग अजून पाण्याखालीच असल्याचं तज्ज्ञ सांगतायत… या पुरामुळे अर्थव्यवस्थेवरील संकट अधिकच गडद झाले… या पुरामुळे अर्थव्यवस्थेचे सुमारे ३० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले… सर्वांत चिंतेची बाब म्हणजे ३६ लाख एकरावरच्या शेतीचं नुकसान झालं आहे… आंतरराष्ट्रीय देणगीदारांनी देशाला ९ अब्ज डॉलर्स देण्याची घोषणा केली आहे… देशाचा परकीय चलन साठा २.३ अब्ज डॉलर या नीचतम पातळीवर पोहोचला आहे… हा आकडा खूपच चिंताजनक असून फक्त ३ आठवड्यांच्या आयातीसाठी पुरेसा आहे…
IMF आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान…
इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानने ६.५ अब्ज डॉलर्स कर्जाची मागणी केली होती… ही मागणी मंजूर देखील झाली होती मात्र… आएमएफकडून टप्प्याटप्प्याने मिळणाऱ्या या कर्जाचा पहिला २.५ अब्ज डॉलर्सचा हप्ता इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला २०१९ मध्ये मिळाला… २०२१ च्या सुरुवातीलाच या कर्जाचा दुसरा २ अब्ज डॉलर्स चा हप्ता इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला मिळाला… मात्र या कर्जातील उरलेला शेवटचा दोन अब्ज डॉलर्स चा हप्ता द्यायला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी तयार नाही… कारण इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान हे कर्ज कसे फेडणार हेच आय एम एफ ला कळत नाहीये… आय एम एफ च्या अत्यंत वरिष्ठ अधिकारी गीता गोपीनाथन यांनी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला हे कर्ज घेण्यास सुरुवातीपासूनच कडाडून विरोध दर्शवला होता… एका फक्त दहशतवादाचे उत्पादन आणि निर्यात करणाऱ्या देशाला आपण जगाचा पैसा का द्या? असा त्यांचा रोकडा सवाल होता… मात्र अमेरिकेच्या प्रचंड दबावापुढे गीता गोपीनाथन यांचा युक्तिवाद थिटा पडला आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला हे कर्ज मिळाले…
पाकिस्तानला आधीच ३.९ अब्ज डॉलर्स मिळाले आहेत… चीन, सौदी अरेबिया आणि यूएईकडून इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला ही आर्थिक मदत मिळाली आहे… ठेवी आणि क्रेडिट्ससह ही मदत १० अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचली आहे… गेल्या महिन्यात इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला यूएईकडून ३ अब्ज डॉलर्सची मदत मिळाली आणि त्यामुळे ते दिवाळखोर होण्यापासून बचावले… सौदी अरेबियाने इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला १ अब्ज डॉलर्सची मदत दिली आहे… ही रक्कम १ महिन्याची तेल आयात भागवण्यासाठी देखील पुरेशी नाही…
इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानी अर्थव्यवस्था कमकुवत होण्याचा अर्थ पाकिस्तानी लष्कर कमकुवत होणं असाही होतो… इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या सैन्याच्या बजेटमध्ये घट करण्यात आलीये… त्यामुळे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या सैन्यात प्रचंड अस्वस्थतेचे वातावरण निर्माण होतं आहे… गव्हाच्या संकटापासून ते वीज आणि पेट्रोलच्या टंचाईपर्यंत ही परिस्थिती दिवसेंदिवस बिघडते आहे… त्यातच नुकत्याच पेशावरमध्ये पोलीस स्टेशन शेजारी झालेल्या बॉम्ब हल्ल्यामुळे पोलिसांमध्ये देखील प्रचंड भीतीचे वातावरण आहे…
चीनी कर्जाचा सापळा
इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या वीज क्षेत्रावरील कर्ज ८.५ अब्ज डॉलरवर पोहोचले आहे… चीन हा इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला सर्वाधिक कर्ज देणारा देश आहे आणि चीनचे हे एकूण कर्ज ३० अब्ज डॉलरचे आहे… हे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या एकूण कर्जाच्या ३० टक्के आहे… चीनचे व्याजदर आणि आयएमएफच्या अटींच्या कात्रीत इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान सध्या अडकला आहे… आता मदतीसाठी कोण पुढे येते हे पाहावे लागेल…
एकाच वेळी स्वतंत्र झालेले भारत आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान हे दोन देश आज किती विरुद्ध दिशेला… विरुद्ध ध्रुवांवर उभे आहेत ते बघा….एक आपल्या संपूर्ण ताकदीसह महासत्ता होण्याच्या दिशेने अष्टौप्रहर कार्यरत आहे… तर दुसरा कोणत्याही क्षणी दिवाळखोर ( bankrupt ) होण्याची शक्यता आहे…
धर्माच्या आधारावर वेगळी भूमी मागून… आमच्या प्राणप्रिय मातृभूमीचे लचके तोडून… लक्षावधी हिंदूंच्या प्रेतावर उभे राहिलेले इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान आज आपल्या पापाची फळे भोगत आहे असेच म्हणावे लागेल… इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची आजच्या अवस्थेचं वर्णन एका वाक्यात करायचे झाल्यास… “जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर”…