
आरे कॉलनीत( aarey colony) असणाऱ्या राम मंदिराशेजारील(ram mandir) कब्रस्तान(kabristan) हटवण्याच्या मागणीसाठी सकल हिंदू समाजाकडून आंदोलन करण्यात आले. ‘लँड जिहादा’ विरुद्ध मोर्चा काढण्यात आला यावेळी आंदोलक व पोलिसांची झटापट देखील झाली.
आरे कॉलनी… बरोबर ओळखलंत…
मेट्रो कारशेडमुळे(metro car shade) वादात अडकलेली आरे कॉलनी… पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या वेळी मात्र ही आरे कॉलनी “लँड जिहादचा “अड्डा बनत चालली आहे…
‘कब्रस्तान हटाओ, आरे कॉलनी बचाओ’, ‘नही बनेगा, नही बनेगा, मंदिर के बाजु में कब्रस्तान नही बनेगा,’ अशा गगनभेदी घोषणांनी रविवारी, दि. १२ फेब्रुवारी आरे कॉलनीतील राम मंदिर परिसर दुमदुमला होता. सकल हिंदू समाजाच्यावतीने आयोजित हिंदू जनआक्रोश मोर्चात हजारोंच्या संख्येने सकल हिंदू समाज सहभागी झाला होता.
आरे कॉलनीत एकवटला सकल हिंदू समाज…

मुस्लीम(muslim) कब्रस्तानाला विरोध करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्यावतीने आरे कॉलनीत काढण्यात आलेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने हिंदूंनी सहभाग नोंदवला होता. प्रस्तावित कब्रस्तानला विरोध करण्यासाठी काढण्यात आलेल्या या हिंदू जनआक्रोश मोर्चात सर्व उत्सव मंडळे, समित्या तसेच नागरिकांच्या आणि हिंदूंच्या हितासाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
दरम्यान, या आधीही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ‘लव्ह जिहाद’(love jihad) आणि ‘लॅण्ड जिहाद’(land jihad) तसेच दररोजच्या कर्णकर्कश भोंग्यांच्या आवाजाने त्रासलेल्या सकल हिंदू समाजाने या मोर्चात सहभागी होत आपला विरोध दर्शविला आहे.
आरे कॉलनीत काढण्यात आलेल्या हा मोर्चा आरे कॉलनीतील पुरातन मंदिरांपैकी एक असलेल्या श्रीराम मंदिराच्या शेजारी होत असलेल्या प्रस्तावित मुस्लीम कब्रस्तानाला विरोध करण्यासाठी काढण्यात आला होता. हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन सकल हिंदू समाज, मुंबईद्वारे करण्यात आले होते.
या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी आंदोलक व पोलिसांत झटापटीची घटना घडली. पोलिसांनी बळाचा वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
“आंदोलकांना आरे कॉलनीजवळील राम मंदिरापासून मरोळपर्यंत मोर्चा काढायचा होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आम्ही मोर्चाला मंदिराजवळ जाऊ दिले नाही,” असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
सूत्रांनी सांगितले की, आंदोलकांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना मागे ढकलले. त्यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र सकल हिंदू समाजाने आपल्या मागण्यांचे पत्र पोलीस उपायुक्त आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले.
या मेळाव्यात विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी श्रीराज नायर, मोहन सालेकर यांनी मुस्लिम कब्रस्तानचे बांधकाम कोणत्याही परिस्थितीत रोखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत हे विशद केले आणि सकल हिंदू समाजाला एकजूट राहण्याचे आवाहन केले.
गेल्या काही महिन्यात सकल हिंदू समाजाने लव्ह जिहादविरोधात संपूर्ण महाराष्ट्रभरात “जन आक्रोश मोर्चे” काढले आहेत. जबरी धर्मांतरण आणि कथित लव्ह जिहाद यांच्या विरोधात कडक कायद्याची मागणी केली आहे.
हिंदू समाज हा सहिष्णू असल्याने धर्मांध मुस्लिम त्याच्या सहिष्णुतेचा कायमच गैरफायदा घेत आले आहेत. मुस्लिम कब्रस्तानाची जागा राम मंदिरा शेजारीच का? सबंध आरे कॉलनीत एवढी एकच जागा मिळाली का कब्रिस्तान करायला?

लँड जिहादची सुरुवात ही याच पद्धतीने होत असते. आजच्या घडीला देशामध्ये सगळ्या प्रकारच्या सरकारी जमिनीवर अशा प्रकारचे बेकायदेशीर बांधकाम आपणास आढळून येईल. रेल्वे, सैन्याच्या जमिनी, पडीक जागा यावर असे बेकायदेशीर मशिदी, मजारी, थडगे बांधून जागा गिळंकृत करण्यात येते. उत्तराखंडातील हलद्वानी येथील रेल्वेची बळकावलेली जागा हे लँड जिहादचे ताजे उदाहरण आहे. कराची लाहोर येथे सुरुवात अशी झाली असेल ना? हिंदूंनी त्याकडे डोळे झाक केल्यामुळेच तर ही शहरे आपल्या हातून निसटली…
लैंड जिहादचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची निर्मिती होय. सहिष्णू हिंदूंना अंधारात ठेवून झालेला हा लँड जिहाद आज अत्यंत धोकादायक होऊन बसला आहे.

अनधिकृत दर्गे, मजारी बांधून उघडपणे कायद्याचे उल्लंघन केले जाते; मात्र त्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही, कायदा फक्त हिंदूंसाठीच आहे का? रेल्वे फलाटावर दिसणाऱ्या मजारी या कशा उभ्या राहिल्या असतील? कोणत्या मुसलमान महापुरुषाने तेथे समाधी घेतली असावी? की त्या मजारीवर रेल्वेने अतिक्रमण केलेले आहे असे म्हणावे?
फक्त आणि फक्त सहिष्णू हिंदूंना हुसकावून लावण्यासाठीच असे बेकायदेशीर उद्योग केले जातात. आज मात्र सकल हिंदू समाज आपल्या न्याय हक्कासाठी एकवटला आहे. त्याला अडवण्याची हिंमत कोणाचीही नाही आणि कुणी अडवण्याची हिंमत केल्यास त्याचा कपाळमोक्ष निश्चित…
मुंबईची(mumbai) कराची होणे नाही आणि पुन्हा आमच्या प्राणप्रिय मातृभूमीचे विभाजन होणे नाही ही काळया दगडावरची रेघ आहे…