पुलाच्या कामावरील तीन वाहने जाळली
नक्षलवाद हा विकासविरोधी आहे :- पी चिदंबरम ( १२ मार्च २०१०)
गडचिरोलीत (Gadchiroli ) रस्ते, पुलाच्या कामाला नक्षल्यांकडून( naksalvadi) होणारा विरोध कायम आहे. हे काम हाणून पाडण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हेडरीजवळ सशस्त्र नक्षल्यांनी २ मार्च रोजी रात्री ३ वाहने जाळून दहशत माजवली. यावेळी तेथे काम करणाऱ्या मजुरांना देखील बेदम मारहाणदेखील केली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
हेडरी येथून ७ किलोमीटर अंतरावरील पुरसलगोंदीजवळ सार्वजनिक बांधकाम विभाग, नागपूर(Public Works Department nagpur) यांच्यामार्फत रस्ता व पुलाचे काम सुरू आहे. पुरसलगोंदी – आलेंगा या नदीवर १.५ महिन्यापासून सुरू असलेले हे विकास काम नक्षल्यांच्या डोळ्यात खुपत होते. ३ कोटी रुपये खर्च करून पूल उभारणीचे काम रायशी कन्स्ट्रक्शन कंपनीने घेतलेले आहे. हे काम प्रगतिपथावर असतानाच २ मार्च रोजी रात्री ८ वाजता १०-१५ सशस्त्र नक्षली आले. नक्षल्यांनी सर्वात आधी मजुरांकडीलन मोबाईल काढून घेतले. त्यानंतर जेसीबी, पोकलॅन व सिमेंट टँकर अशी पूल बांधणीतील ३ वाहने डिझेल टाकून पेटवली आणि मजुरांना बेदम मारहाण देखील केली.
या गरीब मजुरांनी दहशतीत काढली रात्र…
नक्षल्यांनी सुरुवातीला मजुरांना मारहाण केली, त्यानंतर मोबाईल हिसकावून घेतले. मजुरांनी अक्षरशः संपूर्ण रात्र नदीकाठी दहशतीत काढली.
वरील घटनेवरून आपल्या लक्षात आलेच असेल की आता नक्षलवादी च(व)ळवळ आता शेवटच्या घटका मोजत आहे. सध्याच्या घडीला गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या दलमची संख्या ४८० वरून ७० पर्यंत खाली आहे. (“दलम” माहितीच्या आधारावर कारवाई करणारा शस्त्रसज्ज आणि गणवेशात वावरणारा सदस्य म्हणजे दलमचा सभासद होय.) तर यातील फक्त १० ते २० दलम सक्रिय असल्याचे सांगितलं जात आहे. तसेच गडचिरोली पोलिसांच्या माहिती नुसार मागच्या काही वर्षात नक्षलवादी चळवळीत नवीन भरती झाली नसल्याचे सांगितले. त्यामुळे नक्षलवाद्यांची ताकद आता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
याचे मुख्य कारण म्हणजे पोलिसां बरोबर उडालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांच्या मोठ्या लीडर म्हणवल्या जाणाऱ्या मिलिंद तेलतुंबडेचा (milind teltumbde) झालेला खातमा. अनेक नक्षलवादी आपले शस्त्रे खाली टाकून मुख्य प्रवाहात येत आहेत. मागच्या काही वर्षांत गडचिरोली पोलिसांनी ५४ नक्षलवाद्यांना यमसदनी धाडले आहे. २०१७ ते ३१ ऑगस्ट २०२२ या ५ वर्षांच्या कार्यकाळात १९६ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे तर ९० नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.
मागच्या काही वर्षांमध्ये गडचिरोली जिल्ह्यात नवीन नक्षलवादी भरती झाली नाही. याच कारण म्हणजे पोलिसांचा तरुणांशी असलेला संपर्क आणि त्यांच्यासाठी करण्यात येत असलेली रोजगार भरती. मागील २ वर्षांत ६ हजार तरुणांना हॉटेल मॅनेजमेंट, ऑटोमोबाईल, नर्सिंग, व्यवसाय विकास आणि इतर क्षेत्रात व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आले.त्यामुळे त्यांना विविध क्षेत्रात नोकऱ्या मिळाल्या आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील पायाभूत सुविधा आणि दळणवळण सुधारणे हे देखील नक्षलग्रस्त भागांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहेत. तसेच राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांतर्गत अनेक रस्ते आणि पूल बांधण्यात असल्याने आपल्या भागात विकास होत असल्याची भावना स्थानिक तरुणांमध्ये आहे.
नागरिकांचा विश्वास संपादन केल्य़ाशिवाय सरकारला नक्षलवादा विरुद्धची लढाई जिंकता येणार नाही, हे जाणून घेऊन सरकारने (central government) या भागासाठी विशेष योजना राबविल्या जात आहे. याशिवाय रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि नवे तंत्रज्ञान या मुलभूत सुविधा आता जनतेपर्यंत पोहचत आहे.यामुळेच नक्षली चळवळ हळू-हळू लोप पावत जाणार हे निश्चित…
नक्षलवाद्यांचा कोणत्याही सरकारविरुद्धचा सर्वात मोठा आक्षेप असतो तो म्हणजे वनवासी भागाला अविकसित ठेवणे आणि भ्रष्ट प्रशासन.
तर मग आजच्या केंद्रातील मोदी सरकारने वनवासी क्षेत्रात पोचवलेली विकासाची गंगा तसेच कोणत्याही केंद्रीय योजनेची आर्थिक मदत ही लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणे, अर्थात भ्रष्टाचार(corruption) मुक्त प्रशासकीय यंत्रणा यांचे खरे म्हणजे नक्षल्यांनी दिलखुलास स्वागत करायला हवे होते. कारण केंद्र सरकारच्या या सर्व योजना त्यांच्या सर्व मागण्यांची परिपूर्ती करणाऱ्या आहेत.
मग या देशद्रोही नक्षल्यांचा या विकास कामांना विरोध का? त्यातही श्रमजीवी गरीब मजुरांना मारहाण का करण्यात आली? हाच का तुमचा वंचितांसाठीचा लढा?
“हर भारतवासी का यही है सपना,
नक्षलवाद मुक्त बने देश अपना।”
https://www.aajtak.in/india/story/naxalism-is-anti-development-chidambaram-43178-2010-03-12
https://www.marathisrushti.com/articles/urban-maoism-realities-and-solutions/