News

पुढचा अफगाणिस्तान होणार…”युक्रेन”

युक्रेन“( ukraine )ची अवस्था बघून मला अटलजींच्या कवितेच्या ओळी आठवल्या त्या पुढीलप्रमाणे :-

अमेरिकी शस्त्रों से अपनी आजादी को दुनिया में कायम रख लोगे, यह मत समझो

दस बीस अरब डालर लेकर आने वाली बरबादी से तुम बच लोगे यह मत समझो।

“Henry Kissinger” once quipped “it may be dangerous to be America’s enemy, but to be America’s friend is fatal.”

या पद्धतीचे अमेरिकेचे वर्तन विशेषत: दुसऱ्या महायुद्धानंतर ७५ वर्षात पाहायला मिळाले आहे. यात एक दोन वर्ष अधली मधली सोडली,तर सतत जगाला युद्धामध्ये गुंतवणे आणि त्यातून प्रचंड आर्थिक लाभ तसेच फक्त आपलाच वरचष्मा कसा राहिल, या दृष्टिकोनातूनच अमेरिकेचे वर्तन असते.

अमेरिका(USA) हा एकमेव असा देश आहे की, हा सर्व जगात सर्व देशांचा जणू शेजारीच आहे असे वर्तन ठेवतो. प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीमध्ये आपले स्थान मध्यवर्ती असलेच पाहिजे, अशा अहंकाराने भारलेले वर्तन घडते आणि त्याला जग आता कंटाळले आहे . सध्या युक्रेनचे युद्ध सुरू आहे आणि त्याला अफगाणिस्तानच्या युद्धाची पार्श्वभूमी आहे. बायडेन (Joe Biden) यांनी अफगाणिस्तानमधून सैन्य काढण्याचा निर्णय घेतला. पण दुसरीकडे रशिया-युक्रेन संघर्षात युद्धाचा पर्याय निवडला. हे करताना केवळ तात्कालीक वर्तमानातला किंवा नजीक भविष्यातलाच फायदा तात्पुरत्या स्वरूपातला पाहिला. त्यात दूरगामी योजना नव्हती. परिणामी युद्ध लांबत गेले.

निर्बंधांमुळे अर्थव्यवस्था (ECONOMY) ढासळून रशियाची जनता पुतीन यांच्याविरुद्ध उभे राहील, हाही अंदाज पूर्ण फसला. याउलट रशियन रुबलचा भाव मोठ्या प्रमाणावर वधारला.आर्थिक बाजू भक्कम असल्यामुळे युद्धाच्या शस्त्रसज्जतेत कुठलीही कमी झाली नाही.रशियाने संरक्षणाचा खर्च वाढता ठेवून हे युद्ध चालूच ठेवले.अशा प्रकारच्या युद्धाला युरोप मात्र मानसिकदृष्ट्या तयार ही नव्हता.युक्रेनच्या जनतेची परवड सुरु आहे. दिवसेंदिवस हे युद्ध युक्रेनच्या बाजूने कसे चालू ठेवावे, हा मोठा प्रश्न ‘नाटो’ला पडला आहे.

रशिया -युक्रेन युद्धामुळे अमेरिका पर्यायाने ‘नाटो’च्या मर्यादा उघड झाल्या आहेत.या परिस्थिचा पुरेपूर फायदा फायदा चीनने घेतला.आज चीन रशियन मार्केट आपल्या ताब्यात ठेवून आहे. इतकेच नव्हे तर स्वस्त तेलाच्या मोबदल्यात आपले शास्त्रत्र भांडार देखील चीनने रशियासाठी खुले केले आहे. त्यातून आर्थिक लाभ तर होणारच आहे पण रशिया चीनचा कायमस्वरूपी अंकित होणार हे साधे गणित पश्चिमी धोरणकर्त्यांच्या लक्षात येवू नये याचेच आश्चर्य वाटते.

झेलेन्स्कींच्या संपत्तीत लक्षणीय वाढ :-

युक्रेनचे सरकार स्वतःचे अपयश, भ्रष्टाचार ही बाब युद्धात लपवून ठेवत आहे. या युद्धात जवळपास २५० ते ३०० अब्ज डॉलरची मदत मिळवली आहे. ती वेगवेगळ्या स्वरुपामध्ये आहे. ती मदत प्रत्यक्ष युद्धामध्ये निम्मी पण युक्रेनसाठी वापरली गेली की नाही ? हा मोठा प्रश्न आहे. दिवसेंदिवस झेलेंन्स्की आणि त्याचे काही मंत्री यांची संपत्ती मात्र वेगाने वाढत आहे.असे म्हणतात की,”झेलेन्स्की कडे १५ घरे, ३ खाजगी विमाने आहेत आणि त्यांचे मासिक उत्पन्न ११ दशलक्ष डॉलर्स आहे. इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचे उदाहरण आपल्या समोर आहे. अफगाणिस्तान आणि आतंकवाद यांची ढाल पुढे करून इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानी राजनेत्यांनी अमाप माया कमवली. आज त्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची दयनीय अवस्था आपल्या समोर आहे.

युरोपने नाटोवर गरजेपेक्षा जास्त अवलंबून राहिल्यामुळे संरक्षणसज्जता कमी झाली. त्यामुळेच बेसावध असलेला युरोप या युद्धात विनाकारण अडकला.

ब्रिटनने जी शस्त्रे पाठवली त्यापैकी निम्म्याहून अधिक वापरण्याच्या लायकीची नव्हती.साडेतीन लाख नागरिक मृत्युमुखी पडले आहे युद्ध लढणारे युक्रेनचे सैन्य हे केव्हाच संपलं आहे. आताचे असणारे सैन्य म्हणजे सामान्य जनता असून त्यांना बळजबरीने पंधरा दिवसाचे प्रशिक्षण देत युद्धात ओढले जात आहे. या उलट रशियाने सैन्यबळात तिपटीने वाढ केली आहे. ती कमी म्हणून की काय ? रशियाने सीरियाचे भाड्याचे सैनिक देखील तयार ठेवले आहेत,या जोरावर रशिया सैन्याला केव्हाही सीमेवर उतरवू शकतो, अशी व्यवस्था करून ठेवली आहे. अप्रशिक्षित सैन्याच्या बळावर युक्रेन रशियाच्या आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या सैन्याचा मुकाबला कसा करेल ?

युरोपची अर्थव्यवस्था दहा वर्ष मागे

या संघर्षामुळे युरोपची अर्थव्यवस्था किमान दहा वर्षे मागे गेली आहे. या युद्धाचे दूरगामी परिणाम युरोप “नाटो” सदस्य देश, अमेरिका या सर्वांना भोगावे लागणार आहेत. हे युद्ध पुतीन अणुबॉम्ब टाकून संपवतील की काय? अशी भीती जगात आहे. कदाचित त्यातून तिसरे महायुद्ध सुरू होईल की काय? अशीही धास्ती आहे. बायडेन यांच्या काळात अशा पद्धतीचे बेजबाबदार वर्तन अमेरिकेकडून सातत्याने होत असल्याने अमेरिकेचे नेतृत्व लयाला जात आहे. एकुणातच युक्रेन बेचिराख झालाय व युद्ध चालू राहिले तर अजून होत राहणार.

युक्रेनचे भविष्य (future of ukraine) :-

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या चुकीची किंमत युरोप पर्यायाने ‘नाटो’ मोजेल आणि याची परिणती म्हणजे युक्रेनचा ‘अफगाणिस्तान’ होईल. अफगाणिस्तानमधून ‘नाटो’ फौजा निघून गेल्या, तसे इथेही ‘नाटो’च्या फौजाही माघार घेतील. दोन तुकड्यात विभागलेला युक्रेन त्याची जबर किंमत मोजेल हे निश्चित.

“Somewhere Europe has to grow out of the mindset that Europe’s problems are the world’s problems but the world’s problems are not Europe’s problems.:- S Jaishankar

Back to top button