IslamNewsReligion

OIC खबरदार… रामभक्तांच्या वाटेला जाऊ नका ..

रामनवमीच्या दिवशी भारताच्या विविध भागात झालेल्या हिंसाचारावर, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (Organisation of Islamic Cooperation ) अर्थात (OIC) या मुस्लिम देशांच्या संघटनेने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. यासंदर्भात संघटनेने निवेदन जारी केले आहे. भारतात रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचाराबद्दल आम्ही चिंतित आहोत, असे त्यात म्हटले आहे.

बिहारच्या घटनेचा उल्लेख :-

ओआयसी जनरल सेक्रेटेरीएटने जारी केलेल्या निवेदनात बिहारच्या बिहार (BIHAR) शरीफमध्ये ३१ मार्च रोजी झालेल्या हिंसाचाराचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. या घटनेत मदरश्याला आग लावण्यात आल्याचा आरोप आहे. निवेदनात इस्लामोफोबियाचाही उल्लेख करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे या निवेदनात भारत सरकार आणि स्थानिक प्रशासनाने दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय नालंदा येथील हिंसाचारावरही या निवेदनात चर्चा करण्यात आली आहे. नालंदा पोलिसांनी हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत ५० जणांना अटक करण्यात आल्याचे म्हटले आहे.

मुळात OIC म्हणजे काय ?

१९६७ च्या अरब-इस्रायल युद्धानंतर सप्टेंबर १९६९ मध्ये OIC ( Organisation of Islamic Cooperation ) ची स्थापना झाली. पॅलेस्टाईनला मदत करणे आणि इस्रायलच्या पर्यायाने यहुदींच्या तावडीतून मुक्त करणे हा त्याचा उद्देश होता. त्याची सुरुवात ३० देशांनी केली, आज तब्बल ५७ देश त्याचे सदस्य आहेत. त्यांची एकूण लोकसंख्या सुमारे १८० कोटी आहे. साधारणपणे OIC वर सौदी अरेबियाचे वर्चस्व राहिले आहे. याची दोन कारणे आहेत. पहिले – मुस्लिमांच्या श्रद्धेची दोन मोठी केंद्रे म्हणजे मक्का आणि मदिना ही फक्त सौदीमध्ये आहेत. दुसरे म्हणजे – आर्थिकदृष्ट्या अन्य कोणताही मुस्लिम देश सौदीच्या जवळ-पास देखील नाही.

भारत OIC चा सदस्य देखील नाही :-

थायलंड आणि रशियासारख्या तुलनेने कमी मुस्लिम लोकसंख्या असलेल्या देशांनाही OIC ने निरीक्षक दर्जा दिला आहे, परंतु सुमारे २० कोटी मुस्लिम लोकसंख्या असलेल्या भारताला हा दर्जा नाही. १९७० मध्ये भारताच्या शिष्टमंडळाला पहिल्या ओआयसी परिषदेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्या शिष्टमंडळात पुढे जाऊन भारताचे राष्ट्रपती झालेल्या फक्रुद्दीन अली अहमद यांचा देखील समावेश होता. मात्र, इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या आक्षेपानंतर भारताला दिलेले निमंत्रण रद्द करण्यात आले.

मर्यादापुरुषोत्तम श्रीराम (SHREE RAM) भारताचा आत्मा आहे. अयोध्येतील रामजन्मभूमीवर मर्यादापुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचे भव्य मंदिर उभे होत असताना श्रीरामनवमीला देशाच्या काही भागात रावणी मानसिकतेच्या काही मुस्लिम धर्मांधांनी जो धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला, त्याचा करावा तेवढा निषेध कमी आहे आणि OIC या धर्मांध मुस्लिमांची बाजू घेऊन भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न जाणूनबुजून करीत आहे.

रामसेवक देशात रामराज्य आणण्याचा प्रयत्न करीत असताना धर्मांध मुस्लिमांना मात्र ते मान्य नाही. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये, गुजरातमधील बडोदा येथे, तसेच पश्चिम बंगालमधील हावडा येथे रामनवमी शोभायात्रेत दगडफेक करून सांप्रदायिक तणाव निर्माण करण्याचा काही धर्मांध मुस्लिमांचा प्रयत्न होता हे त्रिवार सत्य आहे. “यह संयोग नहीं, प्रयोग था” असे म्हणायला पूर्णपणे वाव आहे.

बिहारची घटना वगळता अन्य राज्यांत रामभक्तांनी संयम दाखवला, तसेच पोलिसांनी कौशल्याने परिस्थिती हाताळल्यामुळे अनुचित घटना टळल्या ही वस्तुस्थिती असली, तरी रामनवमी शोभायात्रेत अडथळा आणण्याची काही जणांची हिंमतच कशी होते, हा खरा प्रश्न आहे.

म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतो; तशातलाच हा प्रकार म्हटला पाहिजे. महाराष्ट्रातील जुन्या औरंगाबाद शहराचे नाव बदलून नुकतेच छत्रपती संभाजीनगर करण्यात आले. नामांतराचा हा प्रकार या शहरातील काही औरंगजेबी मानसिकतेच्या शक्तींना रुचला नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे रामनवमीचे निमित्त करून या शहरात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न धर्मांध मुस्लिमांनी केला. पोलिसांच्या गाड्यांसह अनेक गाड्या पेटवण्यात आल्या. सरकारचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. यावर मात्र OIC मूग गिळून बसली आहे.

गुजरातमधील बडोदा येथे रामनवमी निमित्त काढण्यात आलेल्या दोन शोभायात्रांवर दगडफेक करण्यात आली. शोभायात्रेत सहभागी तरुणांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याचाही आयोजकांचा आरोप आहे. पश्चिम बंगालमध्येही रामनवमीच्या शोभायात्रांवर धर्मांध मुस्लिम समाजाच्या वस्तीतून दगडफेक करण्यात आली. कोणत्याही मुस्लिम मोहल्ल्यातून रामनवमीची शोभायात्रा नेऊ नये, असा मुख्यमंत्री ममता दीदींचा प्रयत्न होता. ममता दीदींना बहुदा विस्मरण झाले असावे की नेमकी अशीच परिस्थिती भारताच्या विभाजनाच्या वेळीस देखील बंगालमध्ये निर्माण करण्यात आली होती. फरक फक्त इतकाच आहे की, तेव्हा हिंदुस्थानावर हिंदू समाजाचा द्वेष करणारे, आमच्या मातृभूमीच्या फाळणीसाठी उत्सुक असलेले ब्रिटिश शासन करत होते आणि आज रामभक्तांचा आदर राखणारे, देशाच्या एक एक इंच भूमीच्या रक्षणासाठी कटिबद्ध असलेले खमके सरकार केंद्रात विराजमान आहे.

ममता बॅनर्जीनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी मुस्लिम समाजाचे हवे तेवढे लांगूलचालन करावे पण असे करताना देशातील बहुसंख्य हिंदूंच्या भावनांचा अनादर कदापि करू नये. हिंदुस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देशात श्रीरामनवमीची शोभायात्रा काढता येत नसेल तर त्यापेक्षा दुर्दैवी दुसरे काही म्हणता येणार नाही…

हिंदूंचा (HINDU) तेजोभंग करण्यासाठी तसेच त्यांच्या स्वाभिमानाचे आणि आत्मविश्वासाचे खच्चीकरण करण्यासाठी इतिहासात अयोध्येतील राममंदिरापासून देशातील शेकडो धार्मिक स्थळांवर हल्ले चढवण्यात आले; त्यांची नासधूस करण्यात आली. हे कमी की काय म्हणून हिंदूंच्या धार्मिक स्थळांचे मशिदीत रूपांतरण करायलाही या मुजोर शक्तींनी मागेपुढे पाहिले नाही. त्यामुळे अयोध्येची रामजन्मभूमी मुक्त करण्यासाठी देशातील हिंदूंना तब्बल ५०० वर्षे संघर्ष करावा लागला.

गेल्या काही वर्षांत मात्र देशातील हिंदू जागृत आणि संघटित होत आहे. आपल्यावर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचारांचा प्रतिकार करण्यासाठी त्याने दंड थोपटले आहेत. मात्र, इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान (islamic republic of pakistan) भारतात अस्थिरता आणि अशांतता निर्माण करण्याचे आपले प्रयत्न थांबवत नाही.भारताला प्रत्यक्ष युद्धात आपण पराभूत करू शकत नाही, याची खात्री असल्यामुळे अशा शक्तींना हाताशी धरून भारताविरुद्ध छुपे युद्ध करण्याचा इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचा प्रयत्न असतो.भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करण्यापेक्षा OIC ला आमचा असा प्रामाणिक सल्ला आहे की त्यांनी भिकेला लागलेल्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला आर्थिक मदत करावी.

हिंदू बहुसंख्यांक असलेल्या भारतात मोहरम, ईदच्या मिरवणुकीला कुठलीही आडकाठी येत नाही. याउलट इस्लामिक रिपब्लिक असलेल्या पाकिस्तानातील कराची आणि लाहोर सारख्या महानगरांमध्ये मात्र मोहरम मिरवणुकीच्यावेळी इंटरनेट बंद करावे लागते,मोठा फौजफाटा तैनात करावा लागतो.

रामाला विरोध केला तर या देशात राहणे आपल्याला कठीण होऊन जाईल, याची जाणीव धर्मांधांनी ठेवली पाहिजे. आपल्या धर्मांधतेला वेळीच आवर घातला नाही तर या मानसिकतेला ‘हे राम’ म्हणण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही.

Back to top button