News

मणिपूर आणि चर्चचा न्यूनगंड

मैतेई-कुकी संघर्षाचं जगभर मार्केटिंग करण्यामागे चर्चचा(church) हेतू आणि देश विदेशात हिंदुफोबिया पसरवण्याला कारणीभूत कम्युनिस्ट (communist) आणि चर्चच्या न्यूनगंडाचं एक आकलन!

(०५-मणिपुरच्या अशांततेवरील लेखमालेतील पाचवा लेख )

मणिपूर विषयाच्या चौथ्या लेखात आपण नॉर्थ ईस्ट(north east), म्यानमार भागातील चीनच्या सुप्त आकांक्षा आणि त्याला भारताच्या वाढत्या प्रभावाची भीती यामुळे चाललेल्या जिओपोलिटीकल शह काटशहाच्या खेळाचे मणिपूरवर होणारे परिणाम काय आहेत याची चर्चा केली. या लेखात आपण मणिपूर हिंसेचे हिंदूंना आणि भारताला बदनाम करण्यासाठी जगभर मार्केटिंग करण्यामागे चर्च आणि कम्युनिस्ट यांची मानसिकता काय असेल याची चर्चा करू.

कम्युनिस्ट विचारधारेने जगभरात १० कोटी आणि भारतात बंगालच्या मारीचझापीच्या ५००० हिंदू नामशूद्र दलित हत्याकांडापासून केलेली कित्येक हत्याकांडे आणि चर्चने आजपर्यंत “माग्दालिन लाऊंड्रिज” सारखे केलेले कोट्यावधी महिलांचे क्रूर नरसंहार यामुळे या दोघांच्या मनात मोठा न्यूनगंड निर्माण झालेला आहे. या न्यूनगंडातून बाहेर येण्यासाठी कम्युनिस्ट आणि चर्च प्रत्येक ठिकाणी हिंदूंना त्याच प्रकारच्या आरोपात घेरण्याचा प्रयत्न करत असतात, जसा आत्ता मणिपूरच्या निमित्ताने जगभर सुरु आहे, त्याचाच हा संक्षिप्त आढावा…

भाजप – ख्रिश्चन मतदार संबंध आणि चर्चची दुविधा!

नॉर्थ ईस्ट मध्ये भाजपचा हिंदु राष्ट्रवाद विकला जाणार नाही या भ्रमात चर्च जगत होतं. आसाम वगळता अन्य सहा राज्यात हिंदू पॉलिटिकल “पोल पोझिशनला” नव्हते यामुळे इथे भाजपची डाळ शिजणार नाही हा सिद्धांत! पण २०१४ ला दिल्लीत भाजप आल्यावर २०१६ ला भाजपने आसाम जिंकलं आणि हिमंत बिस्व सरमानी आपले जुने संबंध, राजकीय प्रतिभा वापरून एक एक राज्य आपल्या ताब्यात घ्यायचा सपाटा लावला. यात भाजपने मणिपूर सुद्धा जिंकलं.

आता भाजप केरळसह दक्षिण भारतात ख्रिश्चन समाजात हात पाय पसरतोय. कित्येक नावाजलेले कॅथलिक बिशप शेकडो कोटींच्या भ्रष्टाचार, करचुकवेगिरी, जमीन घोटाळे यात गळ्यापर्यंत फसलेले आहेत. त्यांच्या चौकशा सुरु आहेत. यामुळे सामान्य ख्रिश्चन आणि चर्च नेतृत्व यात मोठं अविश्वासाचं वातावरण आहे. कित्येक केंद्रीय संस्था यात खोलात गेल्या आहेत. आणि एवढं असूनही चर्च याविरुद्ध जराही बोंब मारू शकत नाही. चर्च यामुळे दुविधेत आहे.

फॉरेन काँट्रिब्युशन रेग्युलेशन ॲक्ट FCRA च्या वेदना!

Foreign contribution regulation ActFCRA) कायद्या अंतर्गत भारतात २०२१-२२ या वर्षात २२,००० कोटी आले यापैकी ९९.९९% पैसा चर्च संबधित संस्थांना आला आणि यातील ९५% पैसा ज्या हेतूने आणला तो वळवून धर्मांतर, राजकीय प्रचार, खोट्या कोर्ट केसेस यासाठी चर्च खर्च करत होता. लीगल राईट्स ऑब्जर्व्हेटरी (legal rights observatory-LRO) ने २०२० ते २०२२ या काळात ६५० चर्च संबंधित संस्थांच्या खोट्या खेळांचे पुरावे जमा करून सरकारला दिले आणि त्यावर मोठ्या कारवाया होऊन आजपर्यंत सुमारे १६,००० संस्थांचे एफसीआरए परवाने रद्द झाले आहेत. चर्चसाठी हा झटका जीवघेणा आहे. याचा परतावा चर्च जगभर भाजप विरोधी राळ उठवून करणार, त्यासाठी मणिपूर ही आजपर्यंत मिळालेली सगळ्यात मोठी संधी आहे!

चर्च आणि कम्युनिस्ट मिडीयाला मणिपूरची सुवर्णसंधी!

मणिपूरच्या रूपाने चर्चला या धडक कारवाईचा सूड उगवण्याची नामी संधी हाती आली आहे. भाजप शासित राज्यात “मैतेई हिंदू” भाजप राज्य सरकारच्या मदतीने “कुकी ख्रिश्चन” समाजाचं शिरकाण करत आहेत या खोट्या धरतीवर जगभर चर्चचा अपप्रचार सुरू आहे.

प्रत्यक्षात भारत म्यानमार सीमेवरच्या मोरेह शहरात असलेल्या तमिळ हिंदूंच्या मंदिरापासून ते कांगपोकपी, चुराचांदपुरच्या हिंदू मंदिरापर्यंत शेकडो मंदिरे गेल्या ३ महिन्यांच्या ख्रिश्चन हिंसाचारात उध्वस्त झालेली आहेत. मोरेह शहरात गेली दोन तीनशे वर्ष राहणारे तमिळ हिंदू मोठे व्यापारी म्हणून ओळखले जातात आणि सध्या त्यांची लोकसंख्या सुमारे १७,००० आहे. हे तमिळ तिथे ब्रिटिश काळापासून आहेत. (या तमिळ हिंदूंना तिथे “काला लुम्यो” म्हणतात) पण या मंदिर विध्वंसाची बातमी लपवून फक्त चर्च पाडल्याच्या खोट्या बातम्या कम्युनिस्ट प्रभावित, चर्च प्रायोजित भारतीय आणि जागतिक इंग्लिश मीडिया भारतात आणि जगात पसरवत आहे.

प्रत्येक घटनेचा वापर करून जगभरातून पैसे जमवायचे हा चर्चचा जुना धंदा आहे. ओपन डोअर युके या चर्च चारीटी संस्थेने तात्काळ मणिपूरच्या ख्रिश्चन पीडितांच्या नावाने देणग्या जमा करायची सुरुवात केलेली आहे. प्रत्येक पिडीतासाठी १७ ब्रिटिश पौंड आणि प्रत्येक पिडितासाठी घर बांधून देण्यासाठी ५० पौंड द्या असं ते अपील आहे. त्यांच्या साईटवर हा मजकूर दिलेला आहे,

“Christians in Manipur, India, are facing a crisis after an outbreak of ethno-religious violence earlier this month. At least 60 believers have been killed, hundreds of churches and other Christian buildings have been burned down and more than 10,000 Christians have had to flee their homes. “Many churches were burned in front of us, and it has been very difficult to see this unfold before us,” says Viren*, a local Christian caught up in the violence. “We want to be strong. Pray that God helps us.”
Today, will you help your Indian brothers and sisters as they face a new crisis?
Every £17 could provide emergency food and aid for a believer in India affected by violent persecution.
Every £50 could help provide shelter for a believer displaced by violent persecution.

थोडक्यात काय निर्णय कोर्टाचा, दंगा सुरु झाला कुकी बहुल चुराचांदपुरला आणि दोष हिंदू मैतेई समाजाचा! हेच लॉजिक “गोध्रा हत्याकांड” झाल्यावर वापरलं गेलं आणि आजही ट्रेन कुणी आणि का जाळली यावर कुणी बोलत नाही! मणिपूर हिंसेनंतर याच संधीचं सोनं करण्यासाठी परत एकदा दोघे एकत्र आहेत. मणिपूर वरून हिंदूंची, भाजप आणि संघाची, मोदी – शहांची बदनामी करण्याची संधी मिळाल्याचा आनंद यांच्या बोलण्यात आणि लिखाणात ओसंडून वाहत असताना सहज दिसू शकतो, इथे त्यापैकी काही उदाहरणे बघू!

चीनी दूतावासाच्या पैशावर चालणारा इंग्लिश पेपर द हिंदू लिहितो “मणिपूर हिंसाचाराने केरळ मधील भाजप, चर्च हनिमूनची समाप्ती (BJP honeymoon ends in Kerala).

डेक्कन हेरॉल्ड म्हणतो “केरळच्या बिशपची मणिपूर हिंसाचारावरून मोदींवर टीका” (Kerala bishop takes pot-shots at Modi over Manipur violence)

https://www.deccanherald.com/national/south/kerala-bishop-takes-pot-shots-at-modi-over-manipur-violence-1232426.html

लेफ्टिस्ट प्रपोगंडा पोर्टल द वायर म्हणतो, “मणिपूर हिंसाचारामुळे मोदींच्या ख्रिश्चन संपर्क मोहिमेला धक्का” (Manipur Violence Is a Setback for Modi’s Christian Outreach Moves in Kerala)

अरुण पुरीचा इंडिया टुडे म्हणतो, “ख्रिश्चन धर्माचा भारतातून निप्पात करणं अशक्य, केरळी आर्चबिशप” (Christianity cannot be wiped out of India, says Archbishop Cleemis Archbishop and Kerala Catholic Bishop Council president Cardinal Mar Baselios Cleemis slammed the Centre for not being able to restore peace in violence-hit Manipur)

मॅटर्स इंडिया, “मणिपूर हिंसाचार ख्रिश्चनांच्या उच्चाटनासाठी” (Manipur violence aims at eliminating Christians, say MP)

ख्रिश्चनीटी टुडे “मणिपूर हिंसाचाराने आम्ही हादरलो आहोत” (‘The Violence Has Shattered Us’ Many from India’s tribal Kuki community have fled their homes. Amid ongoing violence, returning isn’t an option)

ही झाली काही उदाहरणे. यावरून लक्षात येतं की मणिपूरचे दुर्दैवी हिंसाचार पीडित आणि त्यांची दुःख राहिले एका बाजूला आणि त्याचा वापर करून देशात आणि जगभरात हिंदू आणि भारताविरुद्ध चर्च आणि कम्युनिस्टांची घाणेरडी मानसिकता एका बाजुला.

युरोपियन संसदेत मणिपूर हिंसेवर चर्चा, प्रस्ताव आणण्यामागे भारत विरोधी प्रचार आणि त्याद्वारे विषय सर्वदूर पसरवुन पीडित ख्रिश्चनांच्या नावाने अफाट पैसा कमावणं हा प्रधान उद्देश आहे.

कम्युनिस्ट आणि चर्चचं समान चरित्र- हिंसेच्या माध्यमातून सत्ता आणि प्रसार!

युरोपियन ख्रिश्चन पहिल्यांदा अमेरिकेत गेले तेव्हा त्यांनी रेड इंडियन समाजाचा ज्या क्रूरपणे नायनाट केला त्याला तोड नाही! तीच पद्धत कम्युनिस्ट शासनकर्ते चीन, रशियात वापरत आले आहेत आणि तोच प्रकार भारतीय कम्युनिस्टांनी बंगाल, केरळ मध्ये वापरला आहे.

१९७९, कम्युनिस्टांनी केलेलं मारीचझापी (सुंदरबन) येथील हिंदू दलित हत्याकांड..

१९७९ हजारो विस्थापित नामशूद्र हिंदू दलित बंगालच्या सुंदरबन भागातील मारीचझापीच्या बेटांवर येऊन राहू लागले. ज्योती बसूच्या कम्युनिस्ट सरकारने त्यांच्यावर पोलीस अत्याचार करून ५००० नामशूद्र हिंदू दलित ठार मारून त्यांची प्रेते नदीत फेकून दिली. एकूण १४,३८८ दलित परिवार तिथे आले होते, यापैकी हत्याकांडाने घाबरलेले १०,२६० परिवार पळून गेले आणि ४१२८ परिवार गायब झाले. याचा अर्थ एकूण मृत व्यक्तींच्या मृत्यूचा आकडा ५००० नसून तो त्याच्या कित्येक पट जास्त होता. या भीषण हत्याकांडावर दीप हलदर यांचं “ब्लड आयलंड” नावाचं पुस्तक आहे. वर ज्योती बसुनी हे “सीआयए षडयंत्र” असल्याचं घोषित केलं!

चर्चने इतिहासात केलेल्या हत्याकांडाची यादी नं संपणारी आहे. गोव्याच्या अमानवीय “गोवन इंक्विझिषन” बद्दल आपल्याला माहीत आहेच. पण ख्रिश्चन अत्याचारापैकी व्यभिचाराच्या नावाखाली “फॉलन वूमन” ना १८३७ ते १९९२ मध्ये डांबून ठेवून लैंगिक, शारीरिक, मानसिक अत्याचार करून जन्मभर तुरुंगात डांबलेल्या आयर्लंडच्या “माग्दालिन लाऊंड्रिज” सगळ्यात कुप्रसिद्ध आहेत. यात हजारो मुली, महिला कॅथोलिक फादर्स, बिशपच्या वासनेच्या शिकार झाल्या, त्यांचे गर्भपात करून शेकडो अर्भके तिथेच गाडली गेली, वेड्या, भ्रमिष्ट झालेल्या अत्याचारित महिला सडून सडून मेल्या! याबद्दल पोपला त्याच्या दौऱ्याच्या वेळी नाक घासावं लागलं होतं.

आपला इतिहास क्रूर आणि रक्तरंजित आहे हे माहीत असल्यानेच कम्युनिस्ट आणि चर्च प्रत्येक वेळी हिंदू विरोधात हिंसेचे आरोप करतात. संघटना हिंसेशिवाय वाढूच शकत नाही या धारणेपायी एका कम्युनिस्ट माजी खासदार महिला नेत्रीने मणिपूर मधील एका भाजप नेत्याचा संघ गणवेशातला फोटो प्रसारित करून संघ आणि नग्न धिंड, बलात्कारी यांचा संबंध जुळवण्याचा प्रयत्न केला.

चर्च आणि कम्युनिस्ट पराकोटीचे हिंसक आणि विकृत आहेत. त्यांचे हात करोडोंच्या रक्ताने बरबटलेले आहेत त्यावर पांघरूण घालून दुसऱ्याला हिंसक ठरवणं याला आपण काय म्हणाल? या जोडीच्या खोट्या, विषारी प्रचारापासून आपण कायम सावध राहिलं पाहिजे.

पुढील लेखात आपण मणिपूर हिंसाचाराला जबाबदार कोण? भाजप? नॉर्थ ईस्ट मधला हिंदू राष्ट्रवादाचा प्रसार? का संघ संबंधित संस्थांचा सांस्कृतिक राष्ट्रवाद? या विषयांची चर्चा करू.

लेखक :- विनय जोशी

(ICRR Assam & North East)

https://www.icrr.in/Encyc/2023/7/25/Manipur-Conflict-marathi-article-church-and-communist-role.html

Back to top button