InternationalNewsWorld

रशिया-युक्रेन युद्ध आणि Indian Diplomacy..

russia-ukraine war

रशिया-युक्रेन युद्धाचा(russia-ukraine war) आज ५२६ वा दिवस आहे. एकीकडे या इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जग व्याकुळ, निराश, हतबल झाले आहे. आणि दुसरीकडे मात्र आत्मनिर्भर भारत (aatmnirbhar bharat) गगन भरारी घेण्यास सज्ज होत आहे.

भारताची डिप्लोमसी (indian diplomacy)..

Indian Diplomacy: Dr. S.Jaishankar

आपल्या जवळपास २५ हजार विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी भारताने ” ऑपरेशन गंगा“( operation ganga) लॉन्च केले. भारताच्या युक्रेन, रोमानिया, स्लोव्हाकिया, हंगरी, पोलंड येथील दूतावासाने अविश्रांत मेहनत घेऊन हजारो भारतीय विद्यार्थ्यांचा जीव वाचवला.

भारत सरकारने भारतीय विद्यार्थ्यांचा जीव वाचवला असे नव्हे तर ज्यांनी ज्यांनी मदत मागितली त्या त्या सर्व देशांची भारताने यथोचित मदत केली. अगदी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान ( islamic republic of pakistan) या जन्मजात शत्रूची सुद्धा…

जवळपास ९० फ्लाइट्स मधून सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांना भारतात परत आणले गेले. त्यासाठी युक्रेनच्या सीमा रेषेवर भारतीय राजदूत तळ ठोकून बसले होते. भारतीय विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास, इजा होता कामा नये याची संपूर्ण खबरदारी भारत सरकारने घेतली होती.

भारतीय नागरिकांसह युक्रेनमधून सुटका झालेल्या अमेरिका,ब्रिटन,ब्राझील,फ्रान्स आणि इतर अनेक देशातील दूतावासाने ,नागरिकांनी पंतप्रधानांशी संवाद साधला आणि आपले अनुभव कथन केलं. त्यांना सामोरे जावे लागलेल्या आव्हानांप्रमाणेच इतक्या कठीण परिस्थितीत भारतानं केवळ मानवतेच्या उदात्त दृष्टिकोनातून राबविलेल्या या मोहिमेबद्दल त्यांनी आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली.

इतकेच नव्हे तर कीव मध्ये अडकलेल्या काही विद्यार्थ्यांसाठी खुद्द रशियाने काही काळ युद्ध थांबवले आणि भारतीय विद्यार्थ्यांना मॉस्को मार्गे भारतात परत आणण्यासाठी महत्वपूर्ण मदत केली.काही काळासाठी दोन्ही देशांनी युद्ध थांबवणे हे भारतीय डिप्लोमसी, वाढलेल्या ताकदीचेच यश आहे. असा प्रसंग आजवर ऐकिवात किंवा इतिहासात शोधूनही सापडत नाही.

‘आजचे युग युद्धाचे नाही’..

आजचे युग युद्धाचे नाही. हे रशियाला ठणकावून सांगण्याची हिम्मत फक्त भारताकडे आहे. आश्चर्य म्हणजे, भारताच्या भूमिकेचे गेल्या वर्षभरात तरी रशियाने व युक्रेननेही स्वागतच केले आहे. तटस्थता बाळगतानाच नरेंद्र मोदी यांनी पुतिन (vladimir putin) यांना लढाईऐवजी संवादाचा मार्ग स्वीकारा, असा सल्ला उघडपणे दिला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आम सभेत दोन वेळा युक्रेनच्या प्रश्नावर चर्चा झाली तेव्हा त्या चर्चेवर बहिष्कार टाकणे भारताने श्रेयस्कर मानले.

रशियन वेपन्सशिवाय भारताचे काही खरे नाही.. चीन (china)

शस्त्रास्त्रांचा सर्वात मोठा आयातदार( arm importer) देश अशी ओळख असलेला भारत शस्त्रास्त्रांची गेल्या काही वर्षांत विक्रमी निर्यात करू लागला. गेल्या आर्थिक वर्षात भारताने संरक्षण क्षेत्रात २.१ अब्ज डॉलरची निर्यात केली आहे. २०२५ पर्यंत ही निर्यात पाच अब्ज डॉलर करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवले आहे. देशाची वाढती आर्थिक शक्ती, जागतिक बाजारपेठेत संरक्षण उत्पादनांची वाढती मागणी आणि संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाला चालना देण्यावर सरकारचे लक्ष यांसह अनेक कारणांमुळे भारताच्या संरक्षण निर्यातीत वाढ होत आहे. देशात तांत्रिक कौशल्याचा खजिना असलेला मजबूत संरक्षण उद्योग आहे. योग्य रणनीती आणि अंमलबजावणीसह, भारत आपले पाच अब्ज डॉलरचे संरक्षण निर्यातीचे लक्ष्य सहज गाठू शकतो आणि जगाला संरक्षण उत्पादनांचा प्रमुख पुरवठादार बनू शकतो, संरक्षण क्षेत्रातील ही आत्मनिर्भरता निश्चितच कौतुकास्पद आहे.

भारतीय डिप्लोमसीचे “ऑपरेशन गंगा” हे अनुपम उदाहरण संपूर्ण जगाला प्रेरणा देत राहील यात तिळमात्र शंका नाही.भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी होत असलेली प्रतिमा तसेच भारताची भूमिका स्थैर्य व नेतृत्व याला आज आंतरराष्ट्रीय क्षेत्रात मान्यता मिळाली आहे. भारताचा पाया मजबूत असल्यामुळे येत्या काळात ‘इंडिया शायनिंग’च राहणार!

भारत माता की जय !

Back to top button