“क्रीडा से निर्माण चरित्र का , चरित्र से निर्माण राष्ट्र का…”
खेळाडू, विद्यार्थी, पालक आणि समाजामध्ये खेळाबद्दल अधिकाधिक आवड निर्माण करण्यासाठी क्रीडा भारती (krida bharti) चेतन्य कश्यप फाउंडेशन यांच्या सहकार्याने ३ ऱ्या ऑनलाईन अखिल भारतीय पातळीवरील “क्रीडा ज्ञान परिक्षेचे” आयोजन येत्या रविवारी ३ सप्टेंबरला करत आहे.
क्रीडा भारती..
क्रीडा भारतीची स्थापना १९९२ मध्ये “फिट इंडिया – हिट इंडिया” (fit india hit india) या संकल्पनेने करण्यात आली. क्रीडा भारती प्रस्थापित खेळांसह पारंपारिक खेळांना प्रोत्साहन देऊन सर्व भारतीयांचा सहभाग आणि विकासाचा विचार करते. क्रीडा भारतीचे ध्येय खेळाद्वारे चारित्र्यनिर्मिती आणि चारित्र्यनिर्मितीद्वारे राष्ट्र उभारणीचे सक्षमीकरण करणे आहे.
क्रीडा भारती आंतरराष्ट्रीय क्रीडा व्यासपीठावर भारताला एक आघाडीचे राष्ट्र बनवण्यासाठी आणि देशभरात स्वदेशी क्रीडा संस्कृती विकसित करण्यासाठी समर्पितपणे कटिबद्ध आहे.
क्रीडा ज्ञान परीक्षा..
तारीख:- ३ सप्टेंबर २०२३
लॉग-इन वेळ: – सकाळी 10 ते दुपारी 1 दरम्यान
परीक्षेची वेळ:- ३० मिनिटे प्रश्न:– ५०.
पात्रता – १२ वर्षे ते २५ वर्षे
परीक्षा फी – रु. फक्त 20
अनिवार्य – संगणक, मोबाईल, लॅपटॉप, टॅब्लेट
नोंदणी :-
1 वैयक्तिक नोंदणी
- गट नोंदणी (कुटुंब, मित्रांचा गट, वर्गातील विद्यार्थी)
- मोठ्या प्रमाणात नोंदणी (क्रीडा-भारती प्रतिनिधीद्वारे केली जाईल) नोंदणीकृत नाव आधार रेकॉर्डशी जुळले पाहिजे.
Registration link :-
https://kreedabharatikgp.org/Pages/frmIndivisualRegistration.aspx
पुरस्कार:
पहिला पुरस्कार – रु. १ लाख फक्त – १ पुरस्कार.
दुसरा पुरस्कार – रु. ५०हजार फक्त – २ पुरस्कार.
तिसरा पुरस्कार – रु. २५हजार फक्त – ६पुरस्कार.
चौथा पुरस्कार – रु. ११ हजार फक्त – ११ पुरस्कार. (संस्थेच्या अकरा क्षेत्रांमध्ये प्रत्येकी एक.)
नेट कनेक्टिव्हिटी गमावल्यास, सहभागी परीक्षेच्या कालावधीत पुन्हा सामील होता येईल .
मिळालेल्या गुणांनुसार पुरस्कार दिले जातील, समान गुणांच्या बाबतीत, लागणारा वेळ हा निकष असेल.
*स्थिर इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे, नेटवर्क समस्यांसाठी क्रीडा-भारती जबाबदार राहणार नाही.
नमुना प्रश्न पत्रिका..
- भारत अब तक ओलंपिक में कुल कितने स्वर्ण पदक जीत चुका है?
A. 10
B. 9
C. 11
D. 8 - ओलंपिक में भारत की ओर से भाग लेने वाला पहला खिलाड़ी कौन था?
A. पी.टी. उषा
B. के.डी. जाधव
C. नॉर्मन प्रिचर्ड
D. मिल्खा सिंह - ओलंपिक में कुश्ती में पहला पदक जीतने वाले भारतीय खिलाड़ी थे?
A. सुशील कुमार
B. के.डी. जाधव
C. योगेश्वर दत्त
D. साक्षी मलिक - ओलंपिक में लॉन टेनिस में लिएंडर पेस ने कौन सा पदक जीता है?
A. स्वर्ण पदक
B. कांस्य पदक
C. रजत पदक
D. कोई पदक नहीं - कबड्डी के मैदान की लंबाई X चौड़ाई क्या होती है?
A. 10X13 मी
B. 11X13 मी
C. 12X14 मी
D. 10X13.50 मी
कृपया या स्पर्धेत अधिकाअधिक संख्येने सहभागी व्हावे हे आवाहन..