श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंती निमित्त ५ भागांची विशेष मालिका (४-५)
चक्रधर स्वामींनी दिले मराठीला धर्मभाषेचे स्थान…
मराठीला (marathi) धर्मभाषेचे स्थान चक्रधर स्वामींनी ( shree chakradhar swami) दिले. अभिजात मराठीसाठी आज प्रयत्न होत आहेत. मात्र, मराठीला दर्जा प्राप्त करून देण्याचा प्रयत्न चक्रधर स्वामींनी केला. महानुभावांचे (mahanubhav panth) साहित्य मूलभूत विचार मांडणारे आहेत. यातून जीवनाला प्रेरणा मिळते. मराठी भाषेला, तसेच समस्त समाजाला उन्नत करण्यासाठीच विविध ग्रंथांची निर्मिती करण्यात आली आहे.
प्रमुख तीर्थस्थाने :- पैठण, डोमेग्राम, सिन्नर, बेलापूर, वेरूळ, सावखेडा(खडकुली) जाळीचादेव.
प्रमुख आचार्य- १) नागदेवाचार्य. २) बाईदेवव्यास. ३) भास्करभट्ट बोरीकर (कविश्वरव्यास). ४)परशुरामव्यास.
विद्यमान १३ आम्नाय आचार्य –१) बिडकर २) खामनिकर ३) लासूरकर ४) लोणारकर ५) यक्षदेव ६) ऋद्धपुरकर ७) साळकर ८)पैठणकर ९) गुंफेकर १०) जामोदेकर ११) मेहकरकर १२) कोठी
प्रमुख ग्रंथ कर्ते-
१) आचार्य श्री नागदेव- महानुभाव पंथाचे प्रथम आचार्य सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामींनी उत्तरदिशेला प्रयाण केल्यानंतर आचार्यपदाची धुरा त्यांनी समर्थपणे संभाळली. त्यांच्या जवळ सातशे ते आठशे शिष्य राहत असत, त्याकाळी त्यांची ‘वेधवंती नागदेव’ म्हणून प्रसिद्धी होती. अनेक ग्रंथ त्यांच्या देखरेखी खाली रचले गेले.
२) पंडित म्हाइंभट्ट- षड्शास्त्र संपन्न, संस्कृत विद्वान, घरी गर्भश्रीमंती होती. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील विद्वानांना वाद-विवादात पराजित केले होते. श्रीचक्रधरस्वामींपासून परमेश्वर ज्ञानाचा संचार झाल्यावर ते श्रीगोविंदप्रभुंजवळ अनुसरले, त्यांनी मराठी साहित्याला अनमोल देणगी आद्यचरित्र्यग्रंथ ‘लीळाचरित्राच्या’ रूपाने दिली नंतर श्रीगोविंदप्रभू चरित्र लिहिले. बरेचसे स्फुटकाव्ये निर्माण केली.
३) केशीराजव्यास- संस्कृत भाषेवर हातखंडा. नागदेवआचार्यांची भेट झाली व संन्यास घेतलानंतर ‘लीळाचरीत्रा’तून श्रीचक्रधरस्वामींनी निरुपण केलेली सूत्रे संकलित करून ‘सुत्रपाठ’ ग्रंथ, दृष्टांतावर दृष्टांतीक, काल्पनिक, मुर्तीप्रकाश, अवस्थाभूतगीत इत्यादी मराठी रचना व रत्नमालास्तोत्र, दृष्टांतस्तोत्र, ज्ञानकलानिधीस्तोत्र, इत्यादी संस्कृत रचना त्यांनी केली.
४) कविश्वरव्यास (भास्करभट्ट बोरीकर)- अत्यंत रसाळ आणि मंत्रमुग्ध प्रवचनासाठी ते प्रसिद्ध होते. संस्कृत रचना एकदम झटपट करत असत. जसे आकाशात लिंबू फेकून ते खाली येईपर्यंत नवीन श्लोक तयार करायचे. त्यांनी शिशुपालवध व उद्धवगीता हे काव्यग्रंथ व नरविलापस्तोत्र, संस्कृत पूजावसर, मुर्तीवर्णनस्तोत्र, श्रीयाष्टक, विरहाष्टक, मराठी पुजावसर, चालिसाख्यस्तोत्र इ. रचना त्यांनी केल्या.
५)महादाईसा- रूपाईसा हे मूळ नाव. श्रीचक्रधरस्वामींच्या सहवासात असताना सतत प्रश्न विचारत असत म्हणून स्वामींनी तिची प्रशंसा करताना म्हणाले की ‘ही चर्चक, जीज्ञासक आहे’ आद्य मराठी स्त्री कवयित्रीचा मान हा महादाईसाकडे जातो. तिने ‘धवळे’ नावचे श्रीकृष्ण-रुक्मिणी विवाहवर्णनपर रचना केली.
६) पंडितबास- एक भावनिक कवी, गीतकार, श्रीनागदेव आचार्यांनी प्रथम गीत गाण्याला प्रतिबंध केला. परंतु त्यांची आर्तता, करूणा ऐकून त्यांना गाण्याला अनुज्ञा दिली. त्यांनी ‘वच्छाहरण’ हा काव्य ग्रंथ व धुवे, चौपद्या आरती इत्यादींची रचना केली.
७) परशरामबास, मुरारीमल्लबास, गुर्जरशिवव्यास इत्यादी अनेक ग्रंथ कर्ते आहेत.
साहित्य–चरित्रग्रंथ
ग्रंथ लेखक सन
१) लीळाचरित्र (श्रीचक्रधरस्वामी चरित्र)पं. म्हाइंभट्ट शके १२०४ इ.स. १२८२
२) श्रीगोविंदप्रभू चरित्र पं.म्हाइंभट्ट शके १२१० इ.स. १२८८
३) स्मृतीस्थळनरेंद्रबास शके १२३५ इ.स. १३१३
४) धवळे (काव्य)महदंबा ( महादाईसा ) शके १२०८ इ.स. १२८६
तत्वज्ञानपर मुख्यग्रंथ –
१) श्रीमद्भगवद्गीता- श्रीकृष्ण निरोपित
२) सुत्रपाठ -पं. केशीराजव्यास शके १२१२ -१३ इ.स. २९०-९१.
३) स्थळपोथी, महाभाष्य, बंद.
साती ग्रंथ :-
१) रुक्मिणी स्वयंवर- नरेंद्रबास- १२१५-१२९३.
२) शिशुपालवध- भास्करभट्ट बोरीकर- १२३४-१३१२.
३) उद्धवगीता- भास्करभट्ट बोरीकर- १२३५- १३१३.
४) वच्छाहरण- पंडितबास- १२३८- १३१६.
५)सह्याद्रीवर्णन- रवळोव्यास- १२७५- १३५३.
६) ज्ञानबोध-विश्वनाथबास बाळापुरकर- १३४०- १४१८.
७)ऋद्धपूर वर्णन- नारायणव्यास बहाळीये- १३४०-१४१८.
चार प्रमाण वाक्य-
१) श्रुती : श्रीचक्रधरस्वामींची लीळा-वचने.
२) स्मृती: नागदेवाचार्यांचे सांगणे व त्याकाळातील घटना.
३) वृद्धाचार : परसरामबासांपर्यंतच्या घटना.
४) मार्गरूढी: परसरामबासांनंतरच्या घटना.
क्रमशः
संदर्भ :-
https://maharashtratimes.com/mahanubhav/articleshow/46414940.cms