CultureECONOMYHinduismNews

दीन दीन दिवाळी.. अर्थव्यवस्था उजाळी..

Diwali sees record trade of Rs 3.75 lakh crore:-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीच्या सणांमध्ये स्थानिक पातळीवर बनवलेल्या वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले होते, ज्याचा मोठा परिणाम संपूर्ण देशात दिसून आला आहे .

दिवाळीच्या (Diwali) पाच दिवसांच्या सणावेळी देशभरात ३.७५ लाख कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल झाली आहे. कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा आकडा ४.२५ लाख कोटींचा पल्ला पार करेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले ‘Vocal For Local’ या आवाहनाला देशभरातील जनतेने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने या दिवाळीत चीनचे दिवाळे निघाले आहे. व्होकल फॉर लोकल या योजनेचा चीनमधील बाजारपेठेला मोठा फटका बसला आहे. स्वदेशी वस्तूंची धूम आहे. ग्राहकच नाही तर वितरक पण या दिवाळीत स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देत आहे. चीनला या देशी स्वॅगचा प्रचंड मोठा फटका बसला आहे. चीनचे १ लाख कोटींचे नुकसान झाले आहे.

धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत १५-२५ % वाढ झाली. महानगरे तसेच शहरांमधून सोन्याला वाढती मागणी होती. भारतीय अर्थव्यवस्थेत होत असलेली वाढ, सोन्याच्या गुंतवणुकीत मिळणारा चांगला परतावा तसेच येणाऱ्या लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोने खरेदीत वाढ झाली, असे मानले जाते.

धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर देशभरात तब्बल ५०,००० कोटींहून अधिक रुपयांचा व्यवसाय झाल्याचे दिसून आले आहे. ज्यामध्ये लोकांनी ३०,०००कोटी रुपयांचे सोने किंवा दागिने खरेदी केले आहेत.देशभरात ग्राहकांनी सुमारे ४२ टन सोने आणि ४०० टन चांदीची खरेदी केली आहे. या वर्षी सोन्या-चांदीची नाणी ‘ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरही (Ecommerce platforms) उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यालाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

Confederation Of All India Traders अर्थात कॅटच्या “इंडियन प्रॉडक्ट्स-सबका उस्ताद” मोहिमेला देशभरातील ग्राहकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. CAIT चे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी भरतिया यांनी सांगितले की, यंदाच्या दिवाळी हंगामात देशभरातील बाजारपेठांमध्ये ३.७५ लाख कोटी रुपयांहून अधिकचा विक्रमी व्यवसाय झाला. गोवर्धन पूजा,लक्ष्मीपूजन, भाऊबीज , छठ पूजा, तुलसी विवाह आणि कार्तिक पौर्णिमेला सुमारे ५० हजार कोटी रुपयांचा अधिक व्यवसाय होण्याची शक्यता आहे. म्हणजेच हा आकडा ४.२५ लाख कोटी रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

अंदाजानुसार, ३.५० लाख कोटी रुपयांच्या सणासुदीच्या व्यापारात सुमारे १३% अन्न आणि किराणा, ९% दागिने, १२% कपडे आणि वस्त्रे, ४% सुका मेवा, मिठाई आणि नमकीन, ३% गृह फर्निशिंग, ६% सौंदर्यप्रसाधने, ८% इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल, ३% पूजासमाग्री आणि पूजा साहित्य, ३% भांडी आणि स्वयंपाकघर उपकरणे, २% मिठाई आणि बेकरी, ८% भेटवस्तू, ४% फर्निशिंग आणि फर्निचर आणि उर्वरित २०% ऑटोमोबाईल, हार्डवेअर, इलेक्ट्रिकल, खेळण्यांसह इतर अनेक वस्तू आणि सेवांवर ग्राहकांनी खर्च केले आहेत.

दिवाळीच्या निमित्ताने झालेली जबरदस्त विक्री ही भारतीय अर्थव्यवस्थेसाठी (Indian economy) अर्थातच सकारात्मक संकेत आहे. येत्या काही महिन्यांत ती कायम राहण्याची शक्यता आहे. दिवाळीतील या जोरदार विक्रीने देशभरातील विक्रेते तसेच उत्पादकांना कोरोना नंतर बळ मिळाले आहे. विविध क्षेत्रांतील वाढती मागणी हे अर्थव्यवस्थेत होत असलेल्या सुधारणा तसेच ग्राहकांच्या वाढत्या भावनांचे प्रतिबिंब आहे.

भारतात सणासुदीचा हंगाम सप्टेंबरच्या मध्यावर गणेश चतुर्थीपासून सुरू होतो आणि तो डिसेंबरपर्यंत चालतो. आमचा धर्म युगानुयुगे अर्थव्यवस्थेला चालना, प्रोत्साहन देणारा आहे. उदाहरण द्यायचे झालेतर भारतात ५००० टन कापूर दरवर्षी लागतो. यावरूनच तुम्हाला भारतीय बाजाराची ताकद लक्षात येईल.

हिंदू नववर्ष विक्रम संवत २०८० च्या मुहूर्ताच्या सत्रात ‘BSE‘ निर्देशांक ४०० अंकांनी वधारला, तर ‘NIFTY‘ ५०० अंकांनी वधारला, मुहूर्ताला शेअर बाजाराने दिलेला सकारात्मक प्रतिसाद भारतीय अर्थव्यवस्थेसाठी पोषक आहे.

प्रभू रामचंद्रांच्या जन्माअगोदर संबंध चराचरात चैतन्य, मांगल्य ,पावित्र्य ,उत्साह ,उल्हास ओसंडून वाहत होता त्याच प्रमाणे २२ जानेवारीला भक्तवत्सल, जगत्पालक भगवान रामलला आपल्या भव्य मंदिरात विराजमान होणार आहे. त्याआधी भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड शुभशकुन म्हणून समजायला हरकत नाही.

शेवटी इतकंच म्हणू इच्छितो की :-

“अवसर तेरे लिए खडा है,
तू आत्मविश्वास से भरा पडा है,
हर बाधा, हर बंदीश को तोड,
अरे भारत उठ, आत्मनिर्भरता के पथ पर दौड“..

Back to top button