कम्युनिस्ट माओवाद्यांनी विकास विरोधी भूमिकेतून केली दिनेश गावडेची हत्या…
Maoists kill 32-year-old tribal in Gadchiroli
दिनेश गावडे रा लाहेरी टोला, लाहेरी ता. भामरागड जिल्हा.गडचिरोली येथील तरुण छत्तीसगड राज्यातील मंगुर या गावात कामानिमित्त जात होता त्यावेळी धोडराज पोलिस स्टेशन हद्दीत छत्तीसगड राज्याच्या सिमेजवळ माओवाद्यांनी (maovadi) त्याचे अपहरण करून हत्या केली आहे.
दिनेश हा त्याच्या घरातील एकमेव कमवता व्यक्ती होता,तो शेती करत ट्रॅक्टर चालवून घर सांभाळायचा.त्याच्या घरी आई-वडील व एक बहिण असून त्याचे नुकतेच लग्न जमले होते.नुकतेच लग्न जमलेल्या मुलाचा मृतदेह आई-वडिलांना दिवाळीच्या सणात माओवाद्यांनी पाहायची वेळ आणली आहे.हातचा करता पोरगा गेल्यावर काय स्थिती होत असेल त्या अडाणी माय-बापाची…
याची कल्पना पण सामान्य व्यक्ती करू शकत हे असहनिय दुःख आहे. हे संविधान विरोधी व हिंसक कारवाया मार्फत आपला असफल दबदबा निर्माण करू पाहणाऱ्या माओवाद्यांना कधीच लक्षात येणार नाही.अशाच असहणीय दुःखाची झालर पांघरून गेली चाळीस वर्ष झालं नक्षलग्रस्त भागातील स्थानिक आदिवासी बांधव जीवन जगत आहे.
मुख्यमंत्री जिल्ह्या दौऱ्यावर असताना तरुणाची हत्या करून माओवाद्यांनी त्यांची विकास विरोधी भूमिका व निष्पाप लोकांची हत्या करून बळी घेऊन स्थानिक नक्षलग्रस्त भागातील आदिवासी मुलांनी शिकू नये, त्यांना रोजगार मिळू नये अन् जो शिकला तो पोलीसांचा खबरी झाला, जो पोलीस भरतीत सामिल झाला तो पोलीसांचा हस्तक झाला, जो छोटी मोठी नोकरी करून चार पैसे कमवून आपल्या पाल्यांना पुढील शिक्षणासाठी शहरात पाठवू लागला…तो आदिवासी बांधव आणि त्यांच्या कुटूंबीयांचा बळी घेऊन आपली दहशत पसरविण्यासाठी माओवादी हे कृत्य नेहमीच करत आले आहेत.
स्वत:ला आदिवासी बांधवांचे रक्षक म्हणवून घेणारे हे माओवादी बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानानुसार नि:शस्त्र आणि शिक्षण रुपी वाघिणीचे दूध पिवून नव्या उमेदीचे स्वप्न उराशी बाळगून असणाऱ्या तरुण मुलांचा/मुलींचा बळी घेत आहेत.माओवाद्यांकडून करण्यात आलेल्या तरुणाच्या निर्दयी हत्येनंतर तरी समस्त संविधान प्रेमी जनतेने एकवटून या देशद्रोही माओवाद्यांना कायमचा धडा शिकविण्यासाठी सरकार वर दबाव आणला पाहिजे.
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात उद्योगाधारित प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी तसेच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा विकास करण्यासाठी राज्य शासन, जिल्हा प्रशासन व टाटा टेक्नालॉजी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने सेंटर फॉर इन्व्हेंन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन ॲण्ड ट्रेनिंग सेंटर (सीआयआयआयटी) चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल लोकार्पण करण्यासाठी जिल्ह्यात आले होते.या दौऱ्या दरम्यान जिल्ह्यातील वंचित ,आदिवासी बांधवांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले.त्यावेळीच स्थानिक आदिवासी तरुणाची हत्या करून माओवाद्यांनी त्यांचं परत एकदा विकास विरोधी व स्थानिक आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या शासनाच्या भूमिका विरोध करून खरं अमानवी हिंसक रूप समाजासमोर दाखवून दिलं आहे.
नक्षलवाद मुर्दाबाद…माओवाद मुर्दाबाद….
लेखक :- अशोक तिडके (विवेक विचार मंच)